Food Price Repo Rate : अन्नधान्यासह भाजीपाला स्वस्त, तरीही रेपो दर का वाटणार डोक्यावर मिरी!

Food Price Repo Rate : RBI ने किरकोळ महागाई दर 6.5 टक्के ठेवण्याची आग्रही भूमिका घेतली आहे. बाजारात भाजीपाल्यापासून ते अन्नधान्याचे आणि आता खाद्यतेलाचे दर आटोक्यात आहेत. मग आरबीआय पुन्हा रेपो दरात वाढ करण्याची भाषा का वापरत आहे.

Food Price Repo Rate : अन्नधान्यासह भाजीपाला स्वस्त, तरीही रेपो दर का वाटणार डोक्यावर मिरी!
का वाढेल रेपो दर
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 10:17 AM

नवी दिल्ली : देशात महागाईच्या (Inflation) आघाडीवर सर्वच काही अलबेल आहे, असा दावा कोणीही करणार नाही. पण परिस्थिती आटोक्यात आहे, हे निदान सांगता येईल. अन्नधान्य, भाजीपाला, खाद्यतेलाच्या किंमती आटोक्यात आल्या आहेत. पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price) एकदाच वाढवून, त्यानंतर त्यात 22 मे 2022 रोजीनंतर कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यात किरकोळ वाढ होऊन, घसरण होते. ग्राहक मूल्य सूचकांक सातत्याने घसरणीला आहे. एकदमच दिवाळी सारखा आनंद व्यक्त करण्याची स्थिती नाही. पण परिस्थितीत अनुकूल होत आहे. पण तरीही देशाची केंद्रीय बँक, भारतीय रिझर्व्ह बँक रेपो दरात (Repo Rate) वाढ करण्याचा हट्ट का करत आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

भारतीय ग्राहक मूल्य, किंमत निर्देशांक (CPI) या जानेवारी महिन्यात 6.52 टक्के होता. तर फेब्रुवारी 2022 मध्ये फेब्रुवारी महिन्यात हा दर 6.07 टक्के होता. खाद्य वस्तूंचा महागाई दर फेब्रुवारी महिन्यात घसरुन 5.95 टक्क्यांवर आला. जानेवारीपेक्षा हा दर घसरला. परंतु, मीडियातील अहवालानुसार, फेब्रुवारीत किरकोळ महागाई दर घसरला असला तरी तो आरबीआयने निश्चित केलेल्या दरांपेक्षा अधिक आहे. म्हणजे आरबीआयने जो ठोकताळा लावला आहे, त्यापेक्षा महागाई दर अधिक आहे. त्यासाठीच आरबीआय तिचा जालीम उपाय राबविणार आहे.

मीडियातील दाव्यानुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर 2022 वगळता किरकोळ महागाई दर गेल्या वर्षात आरबीआयच्या अपेक्षेपेक्षा जास्तच होता. म्हणजे जवळपास 6 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. आरबीआयने 2022-23 या वर्षासाठी किरकोळ महागाई दर 6.5 टक्के राहील, असा अंदाज बांधला आहे. केंद्रीय बँक हा महागाई दर 4 टक्क्यांपर्यंत खाली खेचण्याचा प्रयत्न करत आहे. पण बँकेला त्यात अद्यापही यश आलेले नाही. महागाईसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत.

हे सुद्धा वाचा

आरबीआयने मे 2022 पासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस प्वॉईंट्सची वृद्धी केली आहे. डिसेंबरपर्यंत रेपो दर 5.90% होता. महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय रेपो दरात वाढ केली. रेपो दर 6.25 टक्क्यांवर पोहचला होता.

सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर 7.41% होता. महागाई दर घसरला. ऑक्टोबर महिन्यात महागाई दराने मागील तीनही महिन्यांचे रेकॉर्ड बदलले. ऑक्टोबर महिन्यात महागाई दर घसरून 6.77% वर आला. खाद्यान्न आणि अन्नधान्यांच्या किंमती झाल्याचा हा परिणाम होता.

7 डिसेंबर रोजी रेपो दरात 35 बीपीएसने वाढ करण्यात आली होती. तर आता या फेब्रुवारी महिन्यात पुन्हा हा दर 25 बीपीएसने वाढला आहे. त्यामुळे रेपो दर 6.50% पर्यंत वाढला आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसणार आहे. यापूर्वी गेल्या वर्षी आरबीआयने रेपो दरात 2.25 टक्के वाढ केली होती. आरबीआय गव्हर्नर यांनी आर्थिक वर्ष 2023 मध्ये भारताचा जीडीपी दर 7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे

चर्चेनुसार, पेट्रोल-डिझेलचे दर जर आटोक्यात आले. त्यात कपात झाली, तर आरबीआयला सध्या रेपो दर वाढीसाठी कसरत करावी लागणार आहे, ती टळू शकते. पण केंद्र सरकार याबाबतीत अद्यापही ठोस निर्णय घेत नसल्याचे समोर येत आहे. रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदीचा निर्णय योग्य असला तरी त्याची फायदा जनतेला होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.