5G : पुढच्या मार्चपर्यंत इतक्या शहरात 5G चा झंझावात, या शर्यतीत सरकारची ही कंपनीही मागे नाही

5G : पुढच्या मार्च महिन्यापर्यंत देशातील या शहरात 5G चा झंझावात येणार आहे..

5G : पुढच्या मार्चपर्यंत इतक्या शहरात 5G चा झंझावात, या शर्यतीत सरकारची ही कंपनीही मागे नाही
5G ची सेवा इतक्या शहरातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 5:17 PM

नवी दिल्ली : देशात पुढच्या मार्च महिन्यात 5G चा झंझावात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशात 5G सेवेचे उद्धघाटन केले. दिल्ली येथील प्रगती मैदानावर सध्या इंडिया मोबाइल काँग्रेसचे (India Mobile Congress-IMC2022 ) आयोजन करण्यात आले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्या शहरात ही सुविधा कधी येणार ते..

दरम्यान दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Telecom minister Ashwini Vaishnaw) यांनी सांगितले की, मार्च 2023 पर्यंत देशातील 200 हून अधिक शहरांमध्ये 5G ची सेवा मिळेल. तर 15 ऑगस्ट 2023 रोजीपर्यंत बीएसएनएल (BSNL) ही मैदानात उतरणार आहे. बीएसएनएलची 5G सेवा सुरु होईल.

दूरसंचार मंत्र्यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन वर्षांत म्हणजे 2024 पर्यंत देशातील 80 ते 90 टक्के भागात 5G सेवा सुरु झालेली असेल. सरकारी दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited-BSNL) देशात 5G सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे हे जाळे मजबूत होईल आणि सर्वदूर 5G सेवा सुरु होईल.

हे सुद्धा वाचा

रिलायन्स जिओने देशात स्वस्त दरात 5G सेवा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे स्वस्तात 5G सेवा देण्यासाठी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत आता कोणती कंपनी सर्वात स्वस्त प्लॅन देणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

रिलायन्स जिओ या दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई यासारख्या चार प्रमुख शहरात 5G सेवा सुरु करणार आहे. तर एअरटेल ने या सेवेची चाचणी अगोदरच सुरु केली आहे. देशातील 8 प्रमुख शहरांमध्ये सेवा देण्याची घोषणा कंपनीने अगोदरच केली आहे. तर व्होडाफोन-आयडियाने 5G सेवेविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

देशातील प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी 5G सेवा सेवा सुरु करण्याची आणि शहरांची नावेही सांगून टाकली आहेत. परंतु, या कंपन्यांनी 5G सेवेसाठी किती पैसे मोजावे लागतील याची माहिती दिलेली नाही. 5G प्लॅनचा दर काय असेल याची माहिती दिलेली नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.