Petrol Diesel Price : किरकोळ महागाई दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. पण पेट्रोल-डिझेल, दुधाच्या आघाडीवर कुठलाच दिलासा मिळाला नाही. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) चढउतार सुरु आहे. भावात घसरण जास्त आहे. इंधन आयात करणाऱ्या कंपन्यांना गेल्या अनेक दिवसांपासून कमी भावात कच्चा माल मिळत आहे. दुसरीकडे रशियाकडून (Russia) आयात वाढवल्याने इतर देशांपेक्षा, पुरवठादारांपेक्षा स्वस्तात इंधन मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मागील तोटा भरुन काढण्यासाठी भरभक्कम नुकसान भरपाई दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. पण जनतेला याचे लाभ मिळाले नाहीत. गेल्या वर्षाभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती झरझर वाढल्या नसल्या तरी, त्या कमीही झालेल्या नाहीत. कंपन्यांची चंगळ सुरु असताना जनतेला स्वस्त पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel Price) कधी मिळेल, याची आस लागली आहे.
15 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) घसरुन 71.94 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलची (Brent Crude Oil) किंमत 77.98 डॉलर प्रति बॅरल आहे. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झाला होता. त्यावेळी उत्पादन शुल्क कपात करण्यात आले होते. त्यानंतर मात्र मोठा बदल झालेला नाही. आज, तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol-Diesel Price) जाहीर केले.
भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.