Ratan Tata यांच्या निधनानंतर कुठे आहे शांतनु नायडू? करतोय काय?

Ratan Tata Shantanu Naidu : भारतीय उद्योगपती रतन टाटा यांच्या अखरेच्या क्षणात शांतनु नायडू हा सोबत होता. त्यांच्या जाण्याने भारतीय उद्योग जगताची मोठी हानी झाली. आता शांतनू नायडू काय करतो, तो कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याचे उत्तर स्वतः नायडू यानेच दिले आहे.

Ratan Tata यांच्या निधनानंतर कुठे आहे शांतनु नायडू? करतोय काय?
शांतनु नायडू रतन टाटा
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 3:39 PM

रतन टाटा यांच्या अखेरच्या क्षणात शांतनु नायडू हा सावली सारखा होता. रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टवर वर्णी लावण्यात आली. ते आल्यानंतर टाटा समूहात अनेक मोठे बदल झाले. अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. पण शांतनु नायडू कुठे गेला. तो काय करत आहे. त्याचा नवीन प्रकल्प काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर स्वतः नायडू यानेच दिली आहे.

बुकीज प्रकल्पावर लक्ष्य केंद्रीत

शांतनु नायडूने बुकीज या प्रकल्पाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, हा त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. त्याने हा प्रकल्प अगोदर मुंबईत सुरू केला होता. त्यानंतर पुणे आणि बंगळुरूमध्ये हा प्रकल्प राबवण्यात आला. आता या प्रकल्पासाठी जयपूर शहराची निवड करण्यात आली आहे. बुकीज हा वाचनप्रेमींचा एक समूह आहे. या प्रकल्पातंर्गत सर्वाजनिक ठिकाणांवर अनेक जण एकत्रित येत शांतपणे, कुठलीही बडबड न करता, त्यांच्याकडील पुस्तकाचे वाचन करतात. टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. आता हा प्रकल्प जयपूर येथे घेऊन जाण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

8 डिसेंबरपासून जयपूरमध्ये श्रीगणेशा

लिंक्डइनवर शांतनू नायडू याने या प्रकल्पाविषयी माहिती दिली. त्याने जयपूरमध्ये बुकीज सुरू करत असल्याची घोषणा केली. “जयपूर, आता वेळ आली आहे. आता आपली भेट रविवारी 8 डिसेंबर रोजी जयपूर बुकीजमध्ये होईल. आपण तिथे भेटू. लाँचसाठी, सहभागी होण्यासाठी खाली साईन-अप करा. मी खूप उत्साहित आहे.” असे आवाहन शांतनुने केले आहे. पुस्तक प्रेमींसाठी ही एक पर्वणी आहे. त्यांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल. त्यांचे नाव नोंदवता येईल.

या शहरात पण बुकीज धडकणार

मुंबई, पुणे, बंगळुरू मध्ये या चळवळीला मोठे यश मिळाले आहे. ही चळवळ आता जोर धरत आहे. नायडू आता जयपूर शहरानंतर दिल्ली, कोलकत्ता, अहमदाबाद आणि सूरत या शहरात या वाचन चळवळीचा विस्तार करणार आहे. “वाचन संस्कृती टिकवण्यासाठी बुकीज महत्त्वाचे साधन आहे. मला वाटते वाचन हे मानवाच्या अनुभवाला समृद्ध करणारे दालन आहे. आपण पूर्वी तीन मिनिटांची रील बघत होतो. आता दीड मिनिटांची रिल सुद्धा बघू शकत नाही.” अशा भावना त्याने व्यक्त केल्या.

रतन टाटा यांचा अत्यंत जवळचा मित्र शांतनु नायडू याला जवळपास सर्वच ओळखतात. रतन टाटा यांच्या निधनानंतर, आता सर्व काही संपलं आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. टाटा गेल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली आहे, ते मोठं आव्हान असल्याचे तो म्हणाला.

एका कार्यक्रमात भेट मग घट्ट मैत्री

रतन टाटा यांचे या 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. शांतनु नायडू हा त्यांचा अत्यंत तरुण मित्र होता. टाटा नसल्याची पोकळी भरून काढणे आव्हान असल्याचे त्याचे मत आहे. एका कार्यक्रमात दोघांची झाली होती भेट, वयात मोठे अंतर असूनही दोघांमध्ये मैत्री झाली. अपघात टाळण्यासाठी तो भटक्या कुत्र्यांचा गळ्यात रिफ्लेक्टिव्ह कॉलर लावायचा. या कल्पनेने रतन टाटा प्रभावित, 2014 मध्ये दोघांची भेट झाली होती. रतन टाटा यांच्यासारख्याच डिट्टो टीशर्टसाठी शांतुनने अर्धा पगार खर्च केला होता.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.