FD, RD की NPS, गुंतवणुकीसाठीचा योग्य पर्याय कोणता? अधिक परतावा देणारी योजना कोणती?

कोणत्या योजनेत अधिक परतावा मिळू शकतो? सुरक्षित परताव्यासाठी सर्वात चांगली योजना कोणती? असे अनेक प्रश्न आपल्याला गुंतवणूक करताना पडतात. (Safe Investment Option Plan)

FD, RD की NPS, गुंतवणुकीसाठीचा योग्य पर्याय कोणता? अधिक परतावा देणारी योजना कोणती?
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही अवघ्या सात दिवसांपासून ते दीर्घकालीन गुंतवणूक करु शकता. मात्र, फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करताना काही गोष्टींचे भान बाळगले पाहिजे.
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 12:43 PM

मुंबई : कोरोना काळात प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या काळात प्रत्येकजण भविष्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. कोणत्या योजनेत अधिक परतावा मिळू शकतो? सुरक्षित परताव्यासाठी सर्वात चांगली योजना कोणती? असे अनेक प्रश्न आपल्याला गुंतवणूक करताना पडतात. सध्या बाजारात अनेक गुंतवणुकीच्या योजना उपलब्ध आहे. पण यातील कोणत्याही योजनेवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, असा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते, सध्या गुंतवणुकीसाठी 5 महत्त्वाचे पर्याय आहेत. ज्याद्वारे तुम्हाला भविष्यात चांगली कमाई करता येऊ शकते. तसेच यात पैसे गुंतवल्याने तुम्हाला त्याचा नक्की फायदाही होऊ शकतो. (Which Is Safe Investment Option With Extra Return)

1. फिक्स्ड डिपॉझिट (FD)

फिक्स्ड डिपॉजिट म्हणजे सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूकीचा महत्त्वाचा पर्याय. एफडीमध्ये तुम्हाला गुंतवणूकीसह योग्य व्याजही मिळतो. त्यामुळे तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेवर व्याज मिळत असल्याने तुमची गुंतवणूक वाढते. एफडीमध्ये चक्रवाढ व्याजाच्या पर्यायामुळे काही वर्षानंतर मिळणारी एकरकमी रक्कमेत वाढ होते. त्यामुळे तुम्ही लखपती होऊ शकता. एफडीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था दिली जाते. ज्यात त्यांना नियमित एफडीपेक्षा जास्त व्याज मिळतो. त्यात ते मासिक किंवा वार्षिक असा कमाई मिळविण्याचा मार्ग निश्चित करु शकतात.

एफडीमुळे तुमच्या रोजच्या खर्चावर काहीही परिणाम होत नाही. तुम्हाला यात एक ठराविक रक्कम गुंतवायची असते. तुमच्या रक्कमेवर तुम्हाला व्याज दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला एफडीवर कर्जही घेता येते. एफडीमुळे तुम्हाला कर्जाची रक्कम जास्तीत जास्त वर्ष परतफेड करण्याचा पर्याय मिळतो. तसेच तुम्हाला काही वर्षांमध्ये पैशांची गरज असल्यास तुम्ही एफडी मोडू शकता. त्यामुळे सर्व सुविधांच्या दृष्टीने एफडी हे गुंतवणूकीचे सर्वोत्तम साधन मानले जाते.

2-रेकरिंग डिपॉझिट (RD)

एफडी आणि आरडी या दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे तज्ज्ञ नेहमी सांगतात. रेकरिंग डिपॉझिटमधील गुंतवणूक ही एफडीप्रमाणे सुरक्षित मानली जाते. एफडीमध्ये तुम्हाला एकाचवेळी ठराविक रक्कम गुंतवावी लागते. पण आरडीमध्ये तुम्ही दर महिना ठराविक रक्कम गुंतवू शकता. यासाठी तुम्हाला ठराविक कालावधी निश्चित करावा लागतो. या निश्चित केलेल्या कालावधीनंतर तुम्हाला बँक मूळ रक्कम व्याजासह परत करते.

याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दर महिना 100 रुपयांच्या टप्प्यात कितीही रक्कम गुंतवू शकता. जर तुम्हाला वर्षभरात काही आर्थिक गुंतवणूक करायची असेल, तर हा आरडी हा चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला निश्चित परताव्याची हमी मिळते. त्यामुळे एफडीप्रमाणे आरडी हा चांगला पर्याय मानला जातो. ICICI बँक 50 रुपयांपासून आरडी सुरु करण्याची सुविधा देते.

3-सोने (Gold)

सोने हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जाते. सणासुदीच्या काळात सोन्याची किंमती गगनाला भिडलेल्या असतानाही अनेकजण सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे भारतात सोन्याचे दागिने किंवा त्यातील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. एखादवेळेस घेतलेले सोने हे घरात पडून राहिल, पण त्याच्या किंमतीत काहीही फरक पडणार नाही. काही अपवाद वगळता सोन्याच्या किंमतीत सतत वाढच झाली आहे. तसेच परताव्याच्या बाबतही सोने हे सर्वात उत्तम साधन मानले जाते. जरी शेअर बाजार कोसळला तरी सोन्याच्या किंमतीत लवकर घसरत नाही.

सोन्याची मागणी नेहमी स्थिर राहते. त्यामुळे ज्यांना सोन्यातून जास्त परतावा हवा असेल त्यांनी दागिन्यांव्यतिरिक्त  डिजीटल गोल्ड, गोल्ड बॉन्ड्स किंवा गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात गुंतवणूक करा.

4- जीवन विमा पॉलिसी (LIP)

जेव्हा शेअर बाजारामध्ये चढउतार होत असतात, तेव्हा पैसे बुडण्याची भीती असते. यावेळी तुम्हाला जीवन विमा पॉलिसी दिलासा देऊ शकते. जीवन विमा पॉलिसी, विशेषत: एंडोमेट योजना ही तुम्हाला दोन प्रकारचे फायदे देऊ शकते. त्यात तुम्हाला लाईफ कवरसोबतच मॅच्युरिटीनंतर चांगला परतावा देखील मिळू शकतो. विमा पॉलिसी तुमच्या भविष्यासह  कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करते. जर तुमचा अकास्मित मृत्यू झाला किंवा अपघात झाला तर याचा तुम्हाला फायदा मिळतो. जर तुम्हालाही एखादी विमा पॉलिसी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही त्याचे हफ्ते वेळेवर चुकवले पाहिजे.

5-नॅशनल पेन्शन स्कीम (NPS)

जर एखाद्याला दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी NPS सर्वोत्तम माध्यम आहे. ठेवी भांडवल सुरक्षित असल्यास तुम्हाला परताव्याचीही हमी असते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही योजना भारत सरकारच्या अंतर्गत येते. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर ठेवीदारास निश्चित रक्कम मिळते. त्याचा खर्च सुरळीत चालू ठेवावा या उद्देशाने ही योजना सुरू केली गेली आहे. एनपीएस 7 टक्क्यांपासून ते 10 टक्क्यांपर्यंत व्याज दिला जातो.  तसेच कराच्या बाबतीतही बरीच सुविधा आणि सवलत मिळते.  (Which Is Safe Investment Option With Extra Return)

संबंधित बातम्या : 

खुशखबर, सरकारी कर्मचाऱ्यांना जुलैपासून मोठी पगारवाढ, महिन्याचा पगार किती हजारांनी वाढणार?

SBI चे इंटरनेट बँकिंगसाठी दोन ॲप्स, दोघांमधील फरक काय? तुमच्यासाठी कोणते योग्य?

रोख व्यवहारात कधीही करु नका ‘या’ 5 चुका, अन्यथा भरावा लागू शकतो इन्कम टॅक्स

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.