Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Share : नवीन वर्षात हे शेअर्स करु शकतात मालामाल, ही रणनीती ठरु शकते फायद्याची

Share : नवीन वर्षात हे शेअर्स तुम्हाला फायदेशीर ठरतील..

Share : नवीन वर्षात हे शेअर्स करु शकतात मालामाल, ही रणनीती ठरु शकते फायद्याची
छप्परफाड कमाईImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 31, 2022 | 6:51 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षांत गुंतवणुकीचा (Investment) संकल्प सोडला असेल तर शेअर बाजारात (Share Market) तुम्हीही नशीब आजमावू शकता. 2022 मध्ये शेअर बाजारावर सर्वच घटकांचा परिणाम झाला. तरीही गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. शेअर बाजाराविषयी गुंतवणूकदार अलर्ट आहेत. नवीन वर्षात, 2023 मध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल याविषयी गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम आहे. तज्ज्ञांनी नवीन वर्षात काही स्टॉक छप्परफाड कमाई (Good Return) करतील, असा अंदाज व्यक्त केला आहे.

शेअर बाजारात 2022 मध्ये चांगली तेजी दिसून आली होती. काही शेअर्सचे भाव वधारले होते. तज्ज्ञांचे मते, नवीन वर्षांत 2023 मध्ये तेजीचे सत्र कायम राहू शकते. टेक कंपन्यांपासून ते बँकिंग, न्यू एनर्जी आणि इतर क्षेत्रातील शेअर्स कमाल दाखवतील असा तज्ज्ञांचा व्होरा आहे.

नवीन वर्षात Adani चा शेअर छप्परफाड कमाई करुन देईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2022 मध्ये अदानी समूहाच्या सुचीबद्ध 7 कंपन्यांनी जोरदार परतावा मिळवून दिला हाोता. यामध्ये अदानी विल्मरचा शेअरने बाजारात येताच हंगामा केला होता. 2023 मध्ये या समूहाचे शेअर पुन्हा दणक्यात परतावा देतील असा अंदाज आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांच्या मते अंबुजा सिमेंट आता अदानी सिमेंट झाली आहे. याचा शेअर 2023 मध्ये चांगला परतावा देईल. यामुळे कंपनी त्यांचा सिमेंटचा व्यापार एकिकृत करण्यावर भर देत आहे. क्वांटम सिक्योरिटीजचे नीरज दीवान यांच्या मते अदानी ग्रुपचे अदानी विल्मर आणि अदानी पोर्ट हे दोन शेअर येत्या वर्षात जोरदार परतावा देतील.

IIFLचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी 5 टॉप शेअर्समध्ये गुंतवणुकीची सल्ला दिला आहे. 2023 मध्ये हे शेअर सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय ठरतील. सुझलॉन एनर्जी 20 रुपये, आयडीएफसी फर्स्ट बँक 100 रुपये, रेणुका शुगर 120 रुपये, एनसीसी 150 रुपये तर रेल्व विकास निगम 120 रुपये लक्ष गाठू शकते. पीएनबी, फेडरल बँक आणि नॅशनल अॅल्युमिनियम सारखे शेअर्सही मल्टीबॅगर ठरु शकतात.

ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या मते पुढील वर्षात गुंतवणूकदारांची कमाई होईल. SBI, ITC, Titan, Infosys, L&T, Maruti Suzuki, UltraTech cement या कंपन्या छप्परफाड कमाई करतील. या कंपन्या चांगला परतावा देतील. तर टेक कंपन्यांचे शेअर्सही चांगला परतावा देतील. या कंपन्यांचा व्यवसाय पाहता गुंतवणूकदार जोरदार कमाई करतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

तर पोर्टफोलिओ मॅनेजर पवन पारेख यांनी पुढील वर्षात ऑटो सेक्टर, केमिकल आणि फार्मा कंपन्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याचा अंदाज वर्तविला आहे. मिडकॅप सेगमेंटमधूनही चांगला परतावा मिळू शकतो. तज्ज्ञांनी हा गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. वैयक्तिक अभ्यास आणि गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने तुम्ही तुमची गुंतवणूक करु शकता.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.