कोरोना लढाईत 1125 कोटी देणारे आणि विप्रोला सर्वोच्च स्थानी नेणारे अजीम प्रेमजी नेमके कोण?, वाचा सविस्तर

विप्रो लिमिटेड कंपनीने 100 कोटी रुपये दिले, तर विप्रो एंटरप्रायझेस लिमिटेड 25 कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन 1,000 कोटी रुपये दिलेत. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर उपक्रमांव्यतिरिक्त आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सामान्य कल्याण खर्चाच्या व्यतिरिक्त आहे.

कोरोना लढाईत 1125 कोटी देणारे आणि विप्रोला सर्वोच्च स्थानी नेणारे अजीम प्रेमजी नेमके कोण?, वाचा सविस्तर
Azim Premji
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 9:21 AM

नवी दिल्ली: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात दररोज वेगाने पसरतोय. कोरोनाच्या विषाणूनंही भारतातही पाय रोवलेत. त्यामुळे त्याविरोधात एक लढाच उभारला गेलाय. त्या लढ्यात क्रिकेटपटू, अभिनेते आणि उद्योगपतींसारख्या देशातील सुप्रसिद्ध व्यक्ती पुढे आल्यात. विप्रोचे अजीम प्रेमजी यांनीही कोरोना लढाईत भरभक्कम मदत केली असून, 1125 कोटी रुपये दिलेत.

? प्रेमजी फाऊंडेशनच्या सामान्य कल्याण खर्चाच्या व्यतिरिक्त दान

विप्रो लिमिटेड कंपनीने 100 कोटी रुपये दिले, तर विप्रो एंटरप्रायझेस लिमिटेड 25 कोटी आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशन 1,000 कोटी रुपये दिलेत. ही रक्कम विप्रोच्या वार्षिक सीएसआर उपक्रमांव्यतिरिक्त आणि अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या सामान्य कल्याण खर्चाच्या व्यतिरिक्त आहे. एवढी मोठी रक्कम देणारे अजीम प्रेमजी नेमके कोण आहेत ते जाणून घेऊयात.

? भारतीय आयटी उद्योगाचे सम्राट म्हणून ओळख

भारतीय आयटी उद्योगाचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे अझीम प्रेमजी हे केवळ आयटी उद्योगातील व्यावसायिक म्हणून नव्हे, तर सामाजिक कार्यातही अग्रेसर असलेले व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध आहेत. अजीम प्रेमजी यांनीच विप्रोला देशातील आयटी कंपन्यांमध्ये अग्रणी स्थान मिळवून दिले. विशेष म्हणजे हे करत असताना त्यांनी समाजाप्रति असलेली आपली बांधिलकीही जपली. परोपकाराच्या बाबतीत ते आशियातील पहिल्या क्रमांकाचे उद्योगपती आहेत. यात त्यांचे नाव जगातील पहिल्या 5 व्यावसायिकांमध्ये आहे.

? अझीम प्रेमजी यांच्या वडिलांचा राईस किंग ऑफ बर्मा नावानं लौकिक

अझीम प्रेमजी यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी मुंबईत झाला आणि त्यांचे पूर्ण नाव अझीम हाशिम प्रेमजी आहे. त्यांचे वडील हाशिम प्रेमजी हे सुप्रसिद्ध व्यापारी होते, ज्यांना बर्माचे तांदूळ राजा म्हणून ओळखले जात होते. कारण बर्मा देशातून भारतात तांदळाच्या व्यापारासाठी आले होते. म्हणूनच त्यांना राईस किंग ऑफ बर्मा म्हटले जायचे. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान जिना यांनी त्यांचे वडील हाशिम प्रेमजी यांना पाकिस्तानात येण्यास सांगितले, परंतु हाशिम प्रेमजींनी भारतात राहणेच पसंत केले. अझीम प्रेमजी यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये बॅचरल ऑफ सायन्स ही पदवी घेतलीय, जी अभियांत्रिकी पदवीच्या समतुल्य आहे. ऑगस्ट 1966 मध्ये त्यांना त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर भारतात परत बोलावण्यात आले, त्यावेळी ते 21 वर्षांचे होते, परंतु त्यांनी केवळ त्यांच्या वडिलांनी सोडलेला वारसा पुढे नेला नाही, तर त्यात अनेक प्रगतीचे अध्याय जोडले.

? साबण निर्मितीपासून व्यवसायाला सुरुवात

विप्रो सुरुवातीला साबण आणि भाजीपाला तेलाच्या व्यवसायात होती, पण 1970 च्या दशकात अझीम प्रेमजींनी अमेरिकन कंपनी सेंटिनल कॉम्प्युटर कॉर्पोरेशनशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर विप्रोने कधीच मागे वळून पाहिले नाही. अझीम प्रेमजींनी 1980 मध्ये विप्रोला आयटी कंपनी म्हणून सादर केले आणि कंपनीने पर्सनल कॉम्प्युटर बनवण्याबरोबरच सॉफ्टवेअर सेवा देण्यास सुरुवात केली. यानंतरच कंपनीचे नाव बदलून विप्रो करण्यात आले. याच विप्रोने आज भारताची तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून सन्मान मिळवलाय. विप्रोची आज माहिती तंत्रज्ञानातील दिग्गज कंपन्यांमध्ये म्हणजेच आयटी आणि एफएमसीजी क्षेत्रामध्ये गणना केली जाते.

? अझीम प्रेमजी यांचा सन्मान

? 2010 मध्ये त्याला एशिया वीकने जगातील 20 सर्वात शक्तिशाली पुरुषांपैकी एक म्हणून निवडले होते. ? टाईम मॅगझिनच्या जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा दोनदा समावेश झाला. ? एकदा वर्ष 2004 मध्ये आणि दुसऱ्यांदा 2011 मध्ये स्थान मिळालं. ? वर्ष 2000 मध्ये त्यांना मणिपाल अकादमी ऑफ हायर एज्युकेशनने मानद डॉक्टरेट दिली. ? 2006 मध्ये अजीम प्रेमजी यांना राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबईतर्फे लक्ष्मी बिझनेस व्हिजनरी पुरस्कार देण्यात आला. ? 2009 मध्ये त्यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी मिडलटाऊन, कनेक्टिकट येथील वेस्लेयन विद्यापीठातून मानद डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली. ? 2013 मध्ये त्यांना ईटी जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि 2015 मध्ये म्हैसूर विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टरेट बहाल केली, ? तर एप्रिल 2017 मध्ये इंडिया टुडे मासिकाने त्यांना 2017 च्या भारतातील 50 सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या यादीत 9 वे स्थान दिले होते.

? भारत सरकारने केला सन्मान

या व्यतिरिक्त अझीम प्रेमजींना व्यापार आणि वाणिज्य क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल 2005 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले आणि 2011 मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान करण्यात आले, जो भारत सरकारचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

? अझीम प्रेमजी फाऊंडेशन

2001 मध्ये त्यांनी अझीम प्रेमजी फाऊंडेशनची स्थापना केली. ही एक ना नफा संस्था आहे, जी प्राथमिक शिक्षण क्षेत्रात काम करते. याद्वारे भारतातील 1.3 मिलियन सरकारी शाळांमध्ये प्रणाली बदलण्याच्या शक्यतेवर काम केले जात आहे. डिसेंबर 2010 मध्ये त्यांनी भारतातील शालेय शिक्षणासाठी 2 अब्ज डॉलर्स देण्याचे वचन दिले, जे सर्वात मोठे दान आहे. याशिवाय मार्च 2019 मध्ये प्रेमजींनी त्यांच्याकडे असलेल्या विप्रोच्या 34 टक्के शेअर्स अझीम प्रेमजी फाऊंडेशनला दिले, ज्याची किंमत लाखो डॉलर्स आहे.

? ‘द गिविंग प्लेज’

सध्या अझीम प्रेमजी हे देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि मे 2019 पर्यंत त्यांची संपत्ती सुमारे 21.5 अब्ज डॉलर्स होती. 2013 मध्ये त्यांनी ‘द गिविंग प्लेज’ द्वारे आपली अर्धी संपत्ती दान करण्यास सहमती दर्शविली आणि या अंतर्गत त्यांनी अजीम प्रेमजी फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरुवातीपासून सुमारे 2.2 अब्ज डॉलर्स दान केले आणि भारतातील शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. वॉरन बफेट आणि बिल गेट्स यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेत द गिविंग प्लेजसाठी साईन अप करणारे ते पहिले भारतीय ठरले. रिचर्ड ब्रॅन्सन आणि डेव्हिड सेन्सबरी यांच्यानंतर ते चॅरिटी क्लबमध्ये सामील होणारे तिसरे बिगर अमेरिकन व्यक्ती आहेत.

संबंधित बातम्या

करदात्यांना दिलासा! आयकर विभागाकडून तक्रार दाखल करण्यासाठी नवी सुविधा

आयकर विभागाकडून 45,896 कोटी रुपये परतावा जारी, तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

Who exactly is Azim Premji who paid Rs 1,125 crore in Corona battle and led Wipro to the top spot ?, read more

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.