Crorepati : तुम्ही पण व्हा श्रीमंत! या 7 गोष्टींवर ठेवा लक्ष

Crorepati : श्रीमंत होण्यासाठी केवळ चांगली नोकरी अथवा कमाईचे साधनच आवश्यक नसते. तर त्यासाठी धैर्य, स्वयंशिस्त आणि आर्थिक नियोजनाची पण जोड लागते. जर तुमचे खर्चावर नियंत्रण नसेल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही.

Crorepati : तुम्ही पण व्हा श्रीमंत! या 7 गोष्टींवर ठेवा लक्ष
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 11:10 AM

नवी दिल्ली : कोरडपती (Crorepati) व्हायला कोणाला आवडणार नाही. अनेकांचे कोट्याधीश होण्याचे स्वप्न असते. काही जण त्यासाठी जीव तोड मेहनत पण करतात. काही जण सरकारी नोकरीसाठी धडपड करतात. काहींना गलेलठ्ठ पगाराची खासगी नोकरी मिळते. काही जण धंद्यात, व्यवसायात नशीब अजमावतात. प्रत्यके जण त्याची वाट चोखंदळतो. पण श्रीमंत होण्यासाठी हीच एक गुणवत्ता, पात्रता आहे, हे सगळ्यांचाच भ्रम आहे. श्रीमंत (Rich Person) होण्यासाठी केवळ चांगली नोकरी अथवा कमाईचे साधनच आवश्यक नसते. तर त्यासाठी धैर्य, स्वयंशिस्त आणि आर्थिक नियोजनाची पण जोड लागते. जर तुमचे खर्चावर नियंत्रण नसेल तर तुम्ही कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. बचत आणि गुंतवणूक ही तितकीच महत्वाची आहे. त्याआधारे तुम्ही लवकर श्रीमंत होऊ शकता.

जर तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुमची ध्येय गाठवी लागतील. तुमच्याकडे जितका अधिक पैसा असेल, तेवढा तो कमीच पडतो. वेल्थ क्रिएशन ही झपाटल्यागत स्थिती असली तरी एका ध्येयासाठी तुम्ही पछाडलेला हवे. त्यासाठी येणाऱ्या अडचणींचा सामनाही तुम्हाला करता यायला हवा. तसेच व्यापक दृष्टिकोनाची साथही तुमच्याकडे हवी. त्यासाठी आर्थिक स्वयंशिस्त महत्वाची आहे. त्याआधारे तुम्ही तुमचे इप्सित साध्य करु शकता.

तुम्ही श्रीमंत असाल अथवा गरीब, पण जर तुम्ही मिळकतीपेक्षा वारेमाफ खर्च करत असाल तर तुम्ही संपत्ती कधीच निर्माण करु शकत नाही. आलिशान जीवन जगण्यासाठी तुम्ही नाहकच खर्च करत असाल. सोशल मीडियावर दाखवत असलेली जीवनशैली स्वीकारणार असाल तर मग तुम्ही संपत्ती कधीच निर्माण करु शकणार नाही. केवळ खर्चाने, दिखाऊपणामुळे तुम्ही संपत्तीचे नुकसान तेवढे करणार, संपत्ती निर्मितीसाठी अगोदर गुंतवणुकीचा मंत्र जपणे आवश्यक आहे. मोठी माणसे नेहमी विनयशील, नम्र दिसतात. तर भपकेबाज त्याच्या उलट असतात, हे लक्षात ठेवा.

हे सुद्धा वाचा

आता झटपट कमाईचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. झटपट श्रीमंतीसाठी रिअल इस्टेटमध्ये खरेदी विक्री, शेअर बाजार, क्रिप्टो करन्सी, एनएफटी, मीम कॉईन, ग्रीन टेक्नॉलॉजीज, बीएनपीएल, चीट फंड्स, भीशी, अनेक आकर्षक योजना बाजारात उपलब्ध आहेत. पण त्याठिकाणी सारासार विचार न करता तुम्ही ‘पी हळद आणि हो गोरी’ अशा पद्धतीने गुंतवणूक कराल, तर तुमच्या मेहनतीचा पैसा झटक्यात गायब होईल. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, इतर परंपरागत पर्यायात अभ्यास करुन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दीर्घ कालावधीसाठी नियमीत बचतीचा फंडा अंगिकारा, तरच तुम्हाला भविष्यात मोठी संपत्ती मिळू शकते. एक लक्षात ठेवा, लॉटरी प्रत्येकाला लागते असे नाही. पैसा वाढविण्यासाठी पद्धतशीर गुंतवणूक योजना आखा.

शेअर बाजारात तज्ज्ञांच्या मदतीने चांगल्या कंपन्यांची निवड करा. भविष्यात लंबी रेस का घोडा ठरु शकणाऱ्या कंपन्या हेरा. त्यांची सर्व तांत्रिक माहिती काढा. ठोकताळ्यावर, बाजाराच्या फुटपटीवर त्या कंपन्या किती खऱ्या उतरतात, याचा अंदाज बांधा. या कंपन्यांचे शेअर आताच स्वस्तात घेऊन ठेवा. भविष्यात तुम्हाला मोठा फायदा नक्कीच होईल. गुंतवणूक करताना ती एकाच पर्याय करु नका. त्यासाठी अनेक पर्याय निवडा. प्रत्येक पर्यायात रक्कम गुंतवणूक करण्याची सवय लावा.

चक्रवृद्धी व्याजचा गोल्डन मंत्र नेहमी लक्षात ठेवा. चक्रवृद्धी व्याज हे तुमच्या कमाईचे रॉकेट ठरू शकते. तुमच्या एक रुपयाला 10 ते 100 रुपये करण्याची ताकद या चक्रवृद्धी व्याजात आहे. पण त्यासाठी हा रुल्स, नियम तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. जर चांगली योजना निवडली आणि त्यात तुम्ही नियमीत गुंतवणूक केल्यास चक्रवृद्धी दराने तुमचे एक लाखांचे 10 वर्षांत 10 लाख होऊ शकतात. तर त्याच्या पुढे नियमीत गुंतवणूक वाढवली तर त्याचे 10 कोटी रुपये पण होऊ शकतात. विश्वास बसणार नाही, पण हा चमत्कार करण्याची शक्ती या चक्रवृद्धी च्या मंत्रात आहे. त्याची खूणगाठ तेवढी मनाशी बांधा.

आता आणखी महत्वाचा नियम नेहमी लक्षात ठेवा. एकाच साधनावर अवलंबून राहू नका. उत्पन्न हे अनेक पर्यांयातून आले पाहिजे. तुम्ही केवळ नोकरीतूनच उत्पन्न मिळवत असाल. अथवा केवळ व्यवसायावरच अवलंबून असाल तर मग तुम्हाला श्रीमंत होता येणार नाही. कारण कोरोनाच्या काळात आपण याचा चांगलाचा अनुभव घेतला आहे. अनेकांना या काळात मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. तर काहींनी यापासून धडा घेत, व्यवसाय आणि नोकरीची गुंफण घातली आहे. काहींनी व्यवसाय आणि इतर गोष्टींची, काहींनी शेती आणि जोडधंद्याची सांगड घालण्याचा प्रयत्न केला. त्याचा तुम्हाला फायदा होईल. मेहनतीसोबत पैसाही हाताशी येईल. आता तर ऑनलाईनच्या जमान्यात तुम्हाला मागे राहण्याचे कोणतेच ठोस कारण देता येणार नाही.

सर्वात महत्वाचे, काळ हे प्रत्येक समस्येवरचे रामबाण औषध आहे, हे लक्षात ठेवा. आलेली प्रत्येक अडचण अथवा बॅड पॅच हा एका मर्यादीत काळासाठी असतो, हे लक्षात ठेवा. मेहनत करा. ध्येय समोर ठेवा आणि बदलासाठी धडपड करा. निश्चितच चांगेल काहीतरी हाती येईल. त्यामुळे कोणतीही जोखीम घेताना अगोदर पैसा गाठिशी ठेवा. त्याचे नियोजन करा. वारेमाप खर्च करण्यापेक्षा तो गुंतवा आणि वाढवा. अडचणीच्यावेळी तुम्हाला एक वर्षांची तजवीज करता येईल. निदान इतकी तर तरतूद करुन ठेवा.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.