रिलायन्समध्ये कोणाला सर्वाधिक मेहनताना; नीता, ईशा आणि आकाश? मग तुमचा अंदाज चुकला

Mukesh Ambani Reliance : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहात कोणाला सर्वाधिक मेहनतान मिळतो माहिती आहे का? तुम्हाला वाटेल नीता अंबानी अथवा मुलगी ईशा अंबानी, मुलगा आकाश अंबानी यांना सर्वाधिक पगार मिळत असेल, तर हा अंदाज साफ चुकीचा आहे. या व्यक्तीला मिळतो सर्वाधिक पगार..

रिलायन्समध्ये कोणाला सर्वाधिक मेहनताना; नीता, ईशा आणि आकाश? मग तुमचा अंदाज चुकला
कोणाला मिळतो रिलायन्समध्ये सर्वाधिक पगार
Follow us
| Updated on: Apr 28, 2024 | 9:20 AM

मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची एकूण संपत्ती 9,63,725 कोटी रुपये आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहे. RIL ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. या कंपनीचे बाजारातील भांडवल (M-Cap) 19,74,000 कोटी रुपयांपेक्ष अधिक आहे. रिलायन्सच्या एका छताखाली अनेक व्यावसाय करण्यात येतात. त्यासाठी विविध कंपन्या आहेत. पत्नी नीता अंबानी, मुलं ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्या खांद्यावर कंपनीच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यांच्या अत्यंत जवळचे सहकाऱ्यांमध्ये निखील मेसवानी हे एक आहेत. निखील यांना 24 कोटींपेक्षा अधिकचे वेतन मिळते.

सर्वाधिक वेतन

निखील यांना अंबानी कुटुंबातील इतर सदस्यांपेक्षा आधिक वार्षिक वेतन मिळते. ते रसिकभाई मेसवानी यांचे चिरंजीव आहे. रसिकभाई हे मुकेश अंबानी यांचे पहिले मालक होते. मुकेश अंबानी यांनी जेव्हा व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवले होते, तेव्हा रसिकभाई मेसवानी यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. त्यावेळी रिलायन्स समूह धीरुभाई यांच्या नेतृत्वात वाढत होता.

हे सुद्धा वाचा

असा आहे प्रवास

रसिकभाई हे धीरुभाई अंबानी यांचे भाचे आहेत. रिलायन्स संस्थापकांच्या संचालकांपैकी ते एक आहेत. मुकेश अंबानी यांना त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. रसिकभाई हे समूहात पॉलिस्टर विभागाची जबाबदारी संभाळतात. निखील यांनी पण रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विविध पदावर काम पाहिले. त्यांची कंपनीतील सुरुवात प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून झाली होती. पेट्रोकेमिकल्स विभागावर त्यांची नजर आहे. रिलायन्सला जागतिक नकाशावर आणण्यात निखील यांची मोठी भूमिका आहे. निखील 1986 मध्ये रिलायन्समध्ये दाखल झाले होते 1 जुलै 1988 रोजी ते संचालक मंडळात सहभागी झाले.

इतर ही अनेक क्षेत्रात घातले लक्ष्य

निखील मेसवाणी हे इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट फ्रँचाईज मुंबई इंडियन्स, इंडियन सुपर लीग आणि कंपनीच्या इतर स्पोर्टस इनिशिएटिव्हसंबंधीत काम सुद्धा बघतात. मुकेश अंबानी हे रिलायन्स समूहाचे प्रमुख असले तरी ते वेतन घेत नाहीत. इतर अनुषांगिक लाभातून त्यांची मोठी कमाई होते. कोविड-19 महामारीनंतर पहिले अब्जाधीश हे वार्षिक 15 कोटी रुपयांचे वेतन घेतात.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.