Devanshi Sanghvi : वडिलांची 300 कोटींची संपत्ती झुगारुन 9 वर्षांच्या देवांशीने घेतला संन्यास!

Devanshi Sanghvi : वडिलांची कोट्यवधींची संपत्ती असताना, सूख पायाशी लोळण घेत असताना या मुलीने अध्यात्माचा मार्ग निवडला..

Devanshi Sanghvi : वडिलांची 300 कोटींची संपत्ती झुगारुन 9 वर्षांच्या देवांशीने घेतला संन्यास!
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली : खेळण्या-बागडण्याच्या वयात एका मुलीने अवघ्या 9 व्या वर्षी संन्यास घेतला. वाचून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, पण ही गोष्ट अगदी खरी आहे. टॉईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील एका मोठ्या हिरे व्यापाऱ्याच्या (Diamond Businessman) मुलीने सर्व सूख लाथाळून संन्यास स्वीकारला. जगाच्या मोहमायेपासून तीने फारकत घेतली. गुजरात राज्यातील (Gujrat) या मुलीने सर्व सूख पायाशी लोळण घेत असताना जैन धर्मानुसार संन्यासी होण्याची दीक्षा घेतली. हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.  लहानपणापासून या मुलीला अध्यात्माचा ओढा असल्याने तिने मर्जीने तिचा मार्ग निवडला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

देवांशी संघवी असे या मुलीचे नाव आहे. ती सुरत येथील रहिवाशी आहे. तिचे वडील कोट्यवधीच्या संपत्तीचे मालक आहेत. देवांशीचे वडील धनेश संघवी हे हिऱ्याच्या एका जुन्या कंपनीचे मालक आहेत. धनेश संघवी अँड सन्स कंपनी त्यांचे वडील महेश संघवी यांनी स्थापन केली आहे.

या हिरा कंपनीच्या अनेक शाखा देश-विदेशात आहेत. या कंपनीचा कोट्यवधींची उलाढाल आहे. देवांशी ही त्यांची मोठी मुलगी आहे. कंपनीची जबाबदारी भविष्यात तिलाच मिळणार होती. परंतु, संपत्तीचा त्याग करुन देवांशीने अध्यात्मिक मार्ग निवडला. कोट्यवधींची संपत्ती असूनही संघवी कुटुंब अत्यंत साधे जीवन जगते.

हे सुद्धा वाचा

देवांशीने धार्मिक शिक्षणात विशेष प्राविण्य मिळविले. त्यावर आधारित प्रश्नमंजुषेत तिने सुवर्णपदक पटकावले. तिचे हिंदी, इंग्रजी, संस्कृत, जरवाडी आणि गुजराती भाषांवर प्रभुत्व आहे. याशिवाय तिने संगीत, भरतनाट्यम आणि योगाचे शिक्षण घेतले आहे. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, देवांशीने आजपर्यंत कधीही टीव्ही पाहिला नाही.

14 जानेवारी रोजी देवांशीने दीक्षेसाठी सुरुवात केली. गेल्या बुधवारी 35000 हजार लोकांच्या साक्षीने तिने जैन धर्माची दीक्षा घेतली. राजकुमारी सारखे आयुष्य जगणाऱ्या देवांशीने साधारण कपडे घातले. डोक्यावरील केस काढले.

या दीक्षा कार्यक्रमात, 4 हत्ती, 11 उंट आणि 20 घोड्यांचा सहभाग होता. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, देवांशीला लहानपणापासूनच अध्यात्माची आवडी होती. तिने 500 किमीची पदयात्राही पूर्ण केली आहे.

देशातील मोठे हिरे व्यापारी धनेश सघंवी यांची ती ज्येष्ठ कन्या आहे. धनेश यांना दोन मुली आहेत. धनेश हे त्यांचा वडिलोपार्जित हिऱ्यांचा व्यापार सांभाळतात. 1981 मध्ये धनेश यांनी वडिलांनी स्थापन केलेल्या फर्ममध्ये कामाला सुरुवात केली होती. या कंपनीची कोट्यवधींची उलाढल आहे. या संपत्तीची उत्तराधिकारीने आता संन्यास घेतला आहे.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.