रेणुका जगतियानी आता तर नावच काफी आहे, श्रीमंतांच्या यादीत अशीच नाही धडक मारली
Renuka Jagtiani : फोर्ब्सच्या भारतातील श्रीमतांच्या यादीत यंदा 25 नवीन अब्जाधीश आहेत. यामध्ये एक नाव रेणुका जगतियानी हे पण आहेत. त्यांच्या जीवनात चढउतार आहेत. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांचे दिवगंत पती मिकी जगतियानी हे लंडनमध्ये कॅब चालक होते. त्यावरुन हा संघर्ष तुमच्या लक्षात येईल.
फोर्ब्सने भारतीय अब्जाधीशांच्या यादीत यंदा 25 जणांनी उमेदवारी केली आहे. त्यांनी अब्जाधीशांच्या यादीत स्थान पटकावले आहे. या श्रीमंतांच्या यादीत रेणुका जगतियानी हे एक नवीन नाव जोडल्या गेले आहेत. रेणुका या यादीत 44 व्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 5 अब्ज डॉलर इतकी आहे. पण इथपर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. त्यांचे पती मिकी जगतियानी हे लंडनमध्ये कॅब चालक होते. त्यांनी मधातच रेणुका यांची साथ सोडली. त्यानंतरचा मोठा पल्ला रेणुका यांनी गाठला. त्या अब्जाधीशांच्या यादीत चमकल्या.
लँडमार्क समूहाच्य सीईओकडे संपत्ती तरी किती
- Forbes’s Top 100 Indian Richest मध्ये रेणुका जगतियानी 44 व्या क्रमांकावर आहेत. रेणुका जगतियानी लँडमार्क समूहाच्या सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 4.8 अब्ज डॉलर वा जवळपास 40,000 कोटी रुपयांहून अधिक आहे. लंडमार्क समूहाचा कारभार अनेक देशांमध्ये पसरला आहे. लँडमार्कचे मुख्यालय दुबईमध्ये आहे. या कंपनीची स्थापना रेणुका यांनी दिवगंत पती मिकीसोबत केली होती.
- फोर्ब्सच्या 2024 मधील श्रीमतांच्या यादीत नाव कोरलेल्या लँडमार्क समूहाच्या सर्वेसर्वा रेणुका यांनी त्यानंतर मोठा पल्ला गाठला. व्यवसायात त्यांनी केलेल्या अमूल्य कामगिरीबद्दल 2007 मध्ये आऊटस्टॅडिंग एशियन बिझनेस वुमन ऑफ द इअर आणि 2012 मध्ये बिझनेस वुमन ऑफ द इअर सारख्या पुरस्काराने रेणुका यांना सन्मानित करण्यात आले आहे. आज श्रीमंतीचा ताज डोई चढवणाऱ्या रेणुका यांनी त्यासाठी मोठी मेहनत घेतली आहे.
हे सुद्धा वाचा
पतीने चालवली कॅब
- रेणुका आज भलेही भारतीय श्रीमंतांच्या यादीत विराजमान झाल्या असतील. पण त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या पतीने मोठे कष्ट उपसले आहे. आयुष्यात या पती-पत्नीने मोठे चढउतार पाहिले. रेणुका यांचे दिवंगत पती मिकी जगतियानी लंडनच्या रस्त्यावर कॅब चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. 1970 मध्ये ते लंडनमध्ये कॅब ड्रायव्हर होते. त्यानंतर त्यांनी बहरीन आणि दुबई गाठले. तिथे एक मोठे व्यापाराचे साम्राज्य उभे केले. आता त्यांची पत्नी रेणुका जगतियानी हा कारभार हाकतात.
- आई-वडील, भावाचे अचानक मृत्यू ओढावला. लंडनमध्ये कॅब ड्रायव्हर असताना, 1973 मध्ये मिकी यांना बहरीनला जावे लागले. तिथे भावाच्या खेळण्याची दुकान मिकी सांभाळायला लागले. एक दशकाहून अधिक काळ त्यांनी ही दुकान चालवली. या दरम्यान त्यांचे Toy’s Outlets पण वाढले. त्यांनी पुढील 10 वर्षांत 6 खेळण्याची दुकाने सुरु केली. दुबईमध्ये पुढे त्यांनी लँडमार्क समूहाची सुरुवात केली.
Non Stop LIVE Update