कोण असणार रतन टाटा यांचा वारसदार, या 4 जणांची नावे आली पुढे ?
ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झालेल्या हुरुन इंडिया रिट लिस्टनुसार रतन टाटा यांच्या जवळ टाटा सन्स मधील 0.83 टक्के भागीदारी होती. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 7,900 कोटी रुपये असल्याचे समजते. टाटा यांच्या पश्चात त्यांचा उत्तराधिकार कोण होणार ? यावर चर्चा होत आहे.
अलिकडेच टाटा कंपनीचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे मुंबईत 86 व्या वर्षी एका इस्पितळात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या उत्तराधिकारी कोण असणार ? यावर बराच खल सुरु आहे. आता या संदर्भातील माहिती पुढे येत आहे. ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर झालेल्या हुरुन इंडिया रिच लिस्ट अनुसार रतन टाटा यांच्या जवळ टाटा सन्समध्ये 0.83 हिस्सेदारी होती. त्यामुळे त्यांची एकूण संपत्ती 7,900 कोटी असल्याचे सांगण्यात येते. तर टाटाच्या उर्वरित संपत्तीला मिळून पाहीले तर त्यांची एकूण संपत्ती 10 हजार कोटींहून अधिक आहे.
उत्तराधिकारी म्हणून या चार जणांची नावे
रतन टाटा यांनी इच्छापत्रात आपली वारसदारांची नावे निश्चित केलेली आहेत. त्याच्या इच्छापत्रानुसार जबाबदारीचे वाटप त्यांची नजीकचे लोक करणार आहेत. या इच्छापत्रात त्यांची सावत्र बहिणी शिरीन आणि डायना जिजीभॉय, वकील दारायस खंबाटा आणि घनिष्ट मित्र मेहली मिस्री यांच्या नावाचा समावेश आहे.अर्थात हे इच्छापत्र सार्वजनिक केलेले नाही.परंतू हे स्पष्ट आहे की टाटाच्या संपत्तीचा मोठा वाटा चॅरिटीसाठी समर्पित केलेला आहे.टाटा यांच्या जीवनाच्या परोपकारी दृष्टीकोणाचे हे प्रमाण आहे.
कोण आहेत मेहली मिस्री ?
मेहली मिस्री हे टाटाचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी टाटा ट्र्स्ट सोबत अनेक वर्षे काम केलेले आहे. टाटा ट्रस्ट मध्ये टाटा सन्सचा 52 टक्के हिस्सा असून कंपनीच्या संचलनात महत्वाची भूमिका टाट ट्रस्टची आहे. टाटा ट्रस्टचे काम सामाजिक आणि परोपकारी कामात गुंतवणूक करणे आहे. जे टाटांच्या विचारधारेनुसार काम करते.
काय म्हणतात वकील ?
वकील दारायस खंबाटा यांनी स्पष्ट केले आहे की त्यांनी इच्छापत्राचा ड्राफ्ट तयार केला नव्हता किंवा या संदर्भात कोणताही सल्ला दिला नव्हता. वकील दारायस खंबाटा यांच्या मतानुसार त्यांनी टाटांच्या इच्छापत्राला त्यांच्या निधानानंतरच पाहीले आहे.अखेर इच्छापत्राच्या एक्झीक्युटरची ही जबाबदार आहेत टाटाच्या अंतिम इच्छेचे पालन व्हावे. टाटा यांचे इच्छापत्र हे स्पष्ट करते की ते संपत्ती पेक्षा परोपराला अधिक महत्व देत होते. त्यांचे जीवन सतत समाजासाठी योगदान देण्यावरच केंद्रीत होते.