Success Story of Canva : शेकडोंनी केले होते Reject, आज 98 टक्के जग करते Use

Success Story of Canva : जगात आज आधिराज्य गाजवणाऱ्या काही कंपन्या आहेत. पण सुरुवातीच्या काळात त्यांना जगाने नकार दिला होता. प्रत्येक दरवाजा त्यांच्यासाठी बंद होत होता, त्यातीलच एक कॅनव्हाची यशोगाथा..

Success Story of Canva : शेकडोंनी केले होते Reject, आज 98 टक्के जग करते Use
Follow us
| Updated on: Sep 14, 2023 | 3:41 PM

नवी दिल्ली | 14 सप्टेंबर 2023 : तुम्ही पण सोशल मीडियाचा वापर करत असालच. अनेकदा सोशल मीडियावर शुभेच्छांचे बॅनर, पोस्टर दिसतात. फोटो एडिटिंग एपच्या (Photo Editing App) मदतीने ते सजविण्यात येतात. अनेक लोक घरगुती समारंभ, वाढदिवस वा इतर कार्यक्रमासाठी मोबाईलवरच एपच्या मदतीने खास बॅनर, पोस्ट तयार करतात. त्यात फोटो जोडतात, मजकूर टाकतात. ते आकर्षक झाले की मित्रांना पाठवतात. आता पूर्वीसारखे खास ग्राफिक्स डिझायनरकडे जाऊन हे काम करण्याची गरज तितकशी उरली नाही. कॅनव्हा (Canva) या एपच्या मदतीने हे काम खूप सोपं झाले आहे. तर या कंपनीचा इथपर्यंतचा प्रवास अवघड वळणावरुन झाला आहे, हे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ही कंपनी आज जगभरात लोकप्रिय झाली असली तरी एकेकाळी ही संकल्पनाच अनेक दिग्गज कंपन्यांनी नाकारली होती. कसा आहे या कंपनीचा यशाचा प्रवास, कोण आहेत मेलानी पर्किन्स?

किती आहेत युझर्स

आज कॅनव्हा जगभरात लोकप्रिय आहे. कॅनव्हाच्या दाव्यानुसार, जगभरातील 190 देशांमध्ये तिचे वापरकर्ते आहेत. संयुक्त राष्ट्र संघानुसार जगभरात 193 देशांना मान्यता आहे. व्हॅटकिन सिटी आणि पॅलेस्टाईनचा त्यात समावेश केल्यास ही संख्या 195 पर्यंत पोहचते. याचा सरळ अर्थ, कॅनव्हा जगभरातील जवळपास 98 टक्के युझर्स वापरतात. कॅनव्हाच्या दाव्यानुसार वापरकर्त्यांचा आकडा 6 कोटींपेक्षा जास्त झाला आहे.

हे सुद्धा वाचा

या कामासाठी होते मदत

कॅनव्हाच्या दाव्यात अतिशयोक्ती पण वाटत नाही. कारण जगभरात या एपवर काम सुरुच असते. प्रत्येक मिनिटाला लाखो वापरकर्ते त्यावर काही ना काही पोस्टर वा इतर काम करत असतात. या एपमुळे फोटो एडिंट अत्यंत सोपे झाले आहे. कॅनव्हाच्या मदतीने तुम्ही अगदी प्रोफेशनल पद्धतीने फोटो एडिट करु शकता. कॅनव्हा ग्राफिक तयार करण्यासाठी, पोस्टर-बॅनर-टेम्पलेट तयार करण्यासाठी मदत करते. पूर्वी या कामासाठी ग्राफिक डिझायनरची मदत घ्यावी लागत होती.

3 वर्षे नकारघंटा

हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या एका ब्लॉग पोस्टने याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, कॅनव्हाची सुरुवातच नकारघंटेपासून झाली. 3 वर्षांत जगभरातील 100 हून अधिक गुंतवणूकदारांनी कॅनव्हाला नकार कळवला. त्यांना या एपमध्ये पैसा गुंतवणे फायदेशीर वाटले नाही. तरीही कॅनव्हाच्या संस्थापक मेलानी पर्किन्स यांनी त्यांची आयडियाची कल्पना सोडली नाही. त्यावर त्या काम करत राहिल्या. ज्यांनी त्यांना नकार दिला, ते पण या एपचे वापरकर्ते आहेत. अशी सूचली कल्पना

मेलानी आणि कॅनव्हा हा प्रवास 2007 मध्ये सुरु झाला. मेलानी ऑस्ट्रेलियामध्ये शिक्षण घेत होती. ती डेस्कटॉप डिझाईन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देण्याची नोकरी पण करत होती. हे सॉफ्टवेअर गुंतागुंतीचे होते आणि महागडे पण होते. ते समजविण्यासाठी एक सत्र पण कमी पडत होते. त्याचवेळी मेलानी यांनी कॅनव्हाची आयडिया सूचली. या कल्पनेवर त्यांनी काम केले. सर्वांनाच सहज वापरता येईल असे फीचर द्यायचे ते पण अगदी कमी खर्चात, अशी तिची योजना होती. त्यानंतर आज सर्वांसमोर इतिहास आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.