Top Banking Stocks : अमेरिका सोडा, या भारतीय बँकांमध्ये दडलाय मोठा खजिना! इतका मिळू शकतो शेअरमध्ये परतावा

Top Banking Stocks : अमेरिकेतील बँका बुडाल्या. त्यांच्या गुंतवणूकदारांचे काय होणार, किती नुकसान झाले, औत्सुक्य म्हणून त्याची चर्चा ठीक आहे. पण देशातील बँकांचे शेअर तुम्हाला मालामाल करतील, त्यावर तुम्ही कधी चर्चा करणार?

Top Banking Stocks : अमेरिका सोडा, या भारतीय बँकांमध्ये दडलाय मोठा खजिना! इतका मिळू शकतो शेअरमध्ये परतावा
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 11:16 AM

नवी दिल्ली : अमेरिकेतील बँकिंग प्रणाली (American Banking System) आणि भारतीय बँकिंग प्रणालीत खूप मोठा फरक आहे. तिथल्या बँका बुडाल्या म्हणजे अवघ्या जगातील बँका बुडतील, हा खुळचट विचार मागे टाका. अमेरिकेतील बँका बुडाल्या. त्यांच्या गुंतवणूकदारांचे काय होणार, किती नुकसान झाले, औत्सुक्य म्हणून त्याची चर्चा ठीक आहे. तिथल्या बँकिंग प्रणालीचा तो दोष असू शकतो. आपली बँकिंग प्रणाली मात्र त्यापेक्षा वेगळा आहे. तुम्हाला बँकेतील एफडी, आरडी वा इतर पर्यायात गुंतवणूक करायची नसेल तर या बँकांच्या शेअरमध्ये (Bank Share) गुंतवणूक करुन पाहा. तुम्हाला तगडा फायदा होण्याची शक्यता आहे. देशातील बँकांचे शेअर तुम्हाला मालामाल करतील, त्यावर तुम्ही कधी चर्चा करणार?

भारतीय बँक आरबीआयच्या नियंत्रणाखाली आहे. या बँकांची मूलभूत रचनाही मजबूत आहे. तसेच वेळोवेळी या बँकांच्या व्यवहारांची समीक्षा करण्यात येते. त्यांची शहानिशा करण्यात येते. शेअर बाजारात (Stock Market) बँकिंग सेक्टर सर्वच गुंतवणूकदारांना आकर्षित करते. भारता सारख्या विकसनशील देशांमधील बँकांना विकासासाठी आणि विस्तारासाठी मोठ्या संधी आहेत. बाजारातील बँकांचे शेअर (Banking Stocks) फायदेशीर ठरतात. त्यातून कमाई करता येते. एका वर्षांत गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल.

काही बँकिंग शेअर्सने (Banking Stocks) गुंतवणूकदारांना 20 ते 50 टक्क्यांचा परतावा दिला आहे. इकोनॉमिक्स टाईम्सने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, पुढील 12 महिन्यांत काही बँकिंग शेअर्स मोठी कमाल करतील, असा दावा करण्यात आला. बँकिंग स्टॉक्समध्ये बंधन बँक लिमिटेड (Bandhan Bank Ltd) अग्रेसर आहे. हा शेअर मंगळवारी 206 रुपयांवर बंद झाला. या अहवालानुसार हा शेअर 12 महिन्यात 50.90 टक्क्यांच्या तेजीसह 311 रुपयांवर पोहचू शकतो.

हे सुद्धा वाचा

बँकिंग सेक्टरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या स्टॉकचा अभ्यास करा. त्याविषयीची माहिती घ्या. तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. हा कोणताही गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक नियोजन आवश्यक असते. बँकिंग क्षेत्रातील शेअरची यापूर्वीची कामगिरी आवश्य तपासा.

  1. सिटी युनियन बँकेचा शेअर 43.70 टक्के परताव्यासह हा शेअर 193 रुपयांवर पोहचू शकतो.
  2. करुर वैश्य बँकेचा शेअर 35.30 टक्के उसळी घेऊन 134 रुपयांवर पोहचेल
  3. आयसीआयसीआय बँकेचा शेअर 33.70 टक्के वधारुन 1110 रुपयांपर्यंत जाईल
  4. इंडसंइड बँकेचा शेअर 33.50 टक्क्यांच्या वाढीसह 1420 रुपयांवर पोहचेल
  5. डीसीबी बँक 32.60 टक्क्यांसह 138 रुपयांवर जाऊ शकतो
  6. ॲक्सिस बँक 32.10 टक्के भरारी घेऊन 1100 रुपयांवर पोहण्याची शक्यता आहे
  7. कॅनरा बँक 27.10 टक्के वाढेल. हा शेअर 364 रुपयांपर्यंत भरारी घेईल

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.