Twitter News : ट्विटरवर बातम्या वाचणे पण होणार मुश्कील! एलॉन मस्कची सुरुच आहे किलबिल
Twitter News : एलॉन मस्क यांनी आता नवीन फतवा काढला आहे, त्यामुळे आता ट्विटरवर बातम्या वाचणे मुश्कील होणार आहे, आता काय आहे ही नवीन किलबिल...
नवी दिल्ली : सोशल मीडियातील दिग्गज कंपनी, ट्विटरचे नवीन मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी अजून एक फतवा काढला आहे. त्यानुसार युझर्सला (user) आता ट्विटरवर (Twitter) बातम्या वाचणे पण अवघड होणार आहे. त्यामागे मस्क बाबाचे डोके आहे. येण केण प्रकारे पैसा ओढण्याचे फंडे मस्कने सुरु केले आहे. आतापर्यंत ब्लू टिक मोफत मिळत होती. पण ब्लू टिकसाठी मस्कने वार्षिक शुल्क आकारणी सुरु केली. अनेक ठिकाणची कार्यालय बंद केली. हजारो कर्मचाऱ्यांना घरी बसवले. एवढंच काय ऑफिसमधील फर्निचर पण विक्री केले. ट्विटरचा खर्च आटोक्या आणला असला तरी कमाईचे गणित मात्र मस्कला जमले नाही. त्यामुळेच आता महसूल गोळा करण्यासाठी त्याने नवीन फंडा शोधला आहे.
बातमीसाठी मोजा पैसा एलॉन मस्क यांनी आता आणखी एक खेळी खेळली आहे. ट्विटरवर जर तुम्हाला बातम्या वाचायच्या असतील. लेख वाचायचे असतील तर त्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. जर युझरने मासिक सदस्य नोंदणी केली नसेल तर त्याला अधिक भूर्दंड सहन करावा लागेल. त्याला अधिक रक्कम मोजावी लागेल. मीडिया पब्लिशर्सला युझरकडून शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातून ट्विटरला पण महसूल मिळणार आहे.
सदस्यत्व मारणार माथी जर तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून लेख, बातमी वाचायची असेल. बौद्धिक खाद्य घ्यायचे असेल तर त्यासाठी पैसा मोजावे लागणार आहे. मस्कने यामध्ये पण एक खेळी खेळली आहे. मीडिया पब्लिशर्सला युझरकडून शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यासाठी एक अट पण ठेवण्यात आली आहे. जे युझर ट्विटरचे मासिक शुल्क भरतील, त्यांना सवलतीत आर्टिकल, न्यूज वाचता येईल. पण जे सदस्य नोंदणी करणार नाहीत. त्यांना अधिक रक्कम मोजावी लागेल. मस्कने याविषयीचे एक ट्विटही केले आहे.
चांगल्या कंटेटसाठी शुल्क मस्क याने सांगितले की, अनेक लोकांना, लेखकांना, बातमीदारांना या लेख, बातम्यांच्या माध्यमातून ट्विटरवर कमाई करता येईल. त्यांच्यासाठी कमाईचा हा महत्वपूर्ण स्त्रोत ठरेल. मीडिया पब्लिशर चांगला कंटेट टाकतील. तो शेअर करतील. त्यामुळे जनतेला ज्ञानाचा खजिना मिळेल. त्यांना या माहितीतून अपडेट होता येईल. चांगल्या कंटेटसाठी ते शुल्क मोजतील.
सब्सक्रिप्शन प्लॅन आहे तरी काय यापूर्वी गुरुवारी ट्विटरने सरकार, सेलिब्रिटी, बिझनेस टायकून, उद्योजक, पुढारी आणि अन्य दिग्गजांच्या खात्यावरुव ब्लू टिक काढली होती. भारतात ट्विटरच्या सब्सक्रिप्शनसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. वेब प्लॅटफॉर्मसाठी 650 रुपये तर मोबाईलसाठी हे शुल्क 900 रुपये प्रति महिना आहे. सब्सक्रिप्शन शुल्क हे वैयक्तिक ट्विटर खात्यसााठी आहे.
संस्था, ब्रँडसाठी असे आहे शुल्क याशिवाय संस्था, ब्रँडसाठी ट्विटरचे व्हेरिफिकेशन शुल्क आहे. त्यासाठी 82,300 रुपये प्रति महिना सब्सक्रिप्शन शुल्क आकारण्यात येत आहे. या खात्यांना सोनेरी रंगाचं, गोल्डन कलरचं ब्लू स्टिक देण्यात येते. त्याच्याजवळ संस्थेच्या नावाचा एक स्टॅम्प पण असेल. एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये जवळपास 44 अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी केले होते.