Hindenburg अचानक का झाले बंद? गौतम अदानींशी काय कनेक्शन?
Hindenburg Research Gautam Adani : हिंडनबर्गचे संस्थापक एंडरसन यांनी ही रिसर्च फर्म बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. हिंडनबर्गने त्यांचे लक्ष्य पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. आता ते आणि त्यांचे सदस्य काय करतील, हे लवकरच समोर येईल.
अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्गने कामकाज अचानक बंद करण्याचा निर्णय घेतला. हिंडनबर्ग ही तिची कंपनी आहे, जिने 2023 मध्ये भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांच्या कंपन्यांवर गंभीर आरोप केले होते. या समूहाविरोधात फसवणुकीसह इतर आरोप केले होते. त्यामुळे शेअर बाजारात एक वर्ष गौतम अदानी यांच्या समूहाला मोठा फटका सहन करावा लागला होता. हिंडनबर्गचे संस्थापक एंडरसन यांनी ही रिसर्च फर्म बंद करण्याचा निर्णय अचानक जाहीर केला. हिंडनबर्गने त्यांचे लक्ष्य पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. आता ते आणि त्यांचे सदस्य काय करतील, हे लवकरच समोर येईल.
गौतम अदानी यांना मोठे नुकसान
अदानी समूहा विरोधात हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल आला होता. त्यावेळी केवळ गौतम अदानी यांनाच नाही तर भारतीय शेअर बाजाराला पण हादरा बसला होता. अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागेल होते. नुकसानीचा आकडा 100 अब्ज डॉलरच्या घरात पोहचला होत. त्यानंतर गेल्या वर्षी सुद्धा अदानी समूहावर आरोप करण्यात आले होते. पण त्याचा काही परिणाम दिसला नाही. तर आता अचानक ही फर्म बंद करण्याचा निर्णय नॅट एंडरसन यांनी जाहीर केला आहे.
हिंडनबर्ग का झाली बंद?
हिंडनबर्गचे संस्थापक एंडरसन यांनी एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केले आहे. हिंडनबर्गने जे लक्ष्य ठेवले होते, ते आता पूर्ण केले आहे. अनेक दिवसांपासून ही फर्म बंद करण्याची तयारी करण्यात येत होती. पण एका योजनेवर आमचे काम सुरू होते. त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीला ना पैसे ना यंत्रणा
हिंडनबर्ग सुरू करण्याविषयीच्या प्रवासाची एंडरसन यांनी माहिती दिली आहे. ज्यावेळी ही शॉर्ट सेलर फर्म सुरू करायची होती. त्यावेळी ना पैसे होते ना कोणती यंत्रणा. पण हिंडनबर्ग सुरू झाली. त्यावेळी कंपनीवर तीन खटले सुरू होते. या कोर्टकचेरीतच पैसे खर्च व्हायचे. पण या कंपनीला वकील ब्रायन वूड यांनी मदत केली आणि कंपनीने उभारी घेतली.
शॉर्ट सेलर कंपनीचे 11 सदस्य करणार काय?
शॉर्ट सेलर कंपनी Hindenburg कडे सध्या 11 सदस्य आहेत. आता ही टीम काय करणार असा सवाल विचारण्यात येत आहे. तर हे सदस्य त्यांची आर्थिक संशोधन संस्था सुरू करणार असल्याची माहिती समोर येत आहे. समारोपीय भाषणात एंडरसन यांनी पत्नी, कुटुंब, मित्र, सदस्य आणि समर्थकांचे आभार मानले.