Millioniares Migration : या 3 शहरांत ही कसली भुताटकी! जगभरातील अब्जाधीशांची येथेच धाव, कारण तरी काय

Millionaires Migration : जगभरातील अब्जाधीश, कोट्याधीशांनी या तीन शहरांकडे धाव घ्यायला सुरुवात केली आहे. श्रीमंत न्यूयॉर्क सारखे शहर सोडून चालले आहेत. तर भारतातील उद्योजकांनी पण या नवीन शहरांना पसंती दिली आहे, कारण तरी काय आहे.

Millioniares Migration : या 3 शहरांत ही कसली भुताटकी! जगभरातील अब्जाधीशांची येथेच धाव, कारण तरी काय
Follow us
| Updated on: Mar 18, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : जगभरातील अब्जाधीशांनी (Millionaires Migration) , कोट्याधीशांनी राहण्यासाठी आणि त्यांच्या उद्योगाची कार्यालये सुरु करण्यासाठी नवीन डेस्टिनेशन हुडकले आहे. या श्रीमंतांचा न्यूयॉर्क, मॉस्को, बीजिंग, मुंबईत जीव रमत नसल्याने त्यांनी नवीन शहर निवडले आहे. जगभरात या नवीन ट्रेंडची जोरदार चर्चा सुरु आहे. या कोट्याधीशांना अशी काय ऑफर मिळाली, असे काय गवसले की त्यांना त्यांचा देश सोडून या तीन शहरांची भूरळ पडली याविषयी जगभरात चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून हा स्थलांतराचा ट्रेंड (Migration Trends) सुरु आहे. यापूर्वी ब्रेन ड्रेनची चर्चा होत होती, आता या मायग्रेशन ट्रेंडचं वारं आलं आहे.

BQ PRIME यांनी याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यानुसार, जगभरातील अब्जाधीश आता त्यांच्या देश सोडून या तीन शहरात येण्यासाठी उत्सूक आहेत. काहींनी या शहरात स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. काहींनी त्यांची कार्यालये थाटली आहेत. या शहरातील स्वच्छता, स्वच्छ हवा, प्रदूषणविरहीत जीवन, समुद्र किनारे, सौंदर्य यामुळेच हे श्रीमंत या शहराकडे आकर्षीत होत नाहीये, तर आणखी पण कारणे आहेत.

कोविडनंतर जगभरात कामाची पद्धत बदलली आहे. रिमोट ऑफिसचे कल्चर आता अंगवळणी पडले आहे. अनेक जण दूरवरुनही काम करत आहेत. ऑफिस सांभाळत आहेत. काम संपले की आयुष्य जगात यावे. कमी वाहतूक समस्या असावी. सुंदर समुद्र किनारी फिरता यावे, कुटुंबियांना वेळ देता यावा, या विचाराने जगभरातील श्रीमंतांनी त्यांचे नवीन डेस्टिनेशन निवडले आहे.

हे सुद्धा वाचा

या अहवालानुसार जगभरातील मिलियेनर्स आणि बिलियेनर्स सिंगापुर, मयामी आणि दुबई या देशांना आणि तिथल्या शहरांना पहिली पसंती दिली आहे. या शहरात त्यांना पुढील आयुष्य मजेत घालवायचे आहे. पण येथे स्थायिक होण्यासाठी सोयी-सुविधा एवढीच कारणे नाहीत. त्यासाठी अजूनही काही गोष्टी कारणीभूत आहेत.

12% अब्जाधीशांचा टाटा

एका अहवालानुसार, 2022 मध्ये 12% अब्जाधीशांनी न्यूयॉर्क शहर सोडले आहे. 14% श्रीमंतांनी हाँगकाँग सोडले. 15% अब्जाधीशांनी मॉस्कोला शेवटचा रामराम केला. यातील काहींनी सिंगापुर (Singapore), दुबई (Dubai) तर काही श्रीमंत मीयामी (Miami) मध्ये राहण्यास गेले आहे. एका अहवालानुसार, भारतातील दोन तीन हजार श्रीमंतांनी देश सोडला आहे. ते पण याच ठिकाणी अथवा इतर काही ठिकाणी स्थायिक झाले आहेत.

ही आहेत कारणे

  1. अत्यंत सुंदर देश आहेत. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेली आहे.
  2. स्वच्छ हवा, स्वच्छता, सुंदर समुद्र किनारे हे आकर्षण स्थळे आहेत.
  3. या ठिकाणी सरकार स्थिर आहेत. राजकीय अनागोंदी कमी आहे.
  4. वातावरण एकदम आरोग्यदायी आणि जीवनशैला शानदार आहे.
  5. या तीन ही देशांनी उद्योजकांसाठी सोयी-सुविधांचे रेड कार्पेट अंथरलं आहे.
  6. कर अत्यंत माफक आहेत. याशिवाय येथील तिजोरीत भर टाकल्याने टॅक्स इन्सेटिव्ह देण्यात येतो.
  7. भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव, गुंडगिरी नसल्याने श्रीमंत या शहरांकडे धाव घेत आहेत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.