इनकम टॅक्स फाईल करताना फॉर्म 16 का आहे आवश्यक? A आणि B मध्ये नेमकी काय माहिती असते जाणून घ्या
आर्थिक वर्ष 2024-25 संपण्यासाठी आता अवघ्या तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. तीन महिन्यानंतर इनकम टॅक्स फाईल करण्यासाठी नोकरदार व्यक्तींची धावाधाव सुरु होईल. फॉर्म 16 कंपन्यांकडून दिला जाईल. त्यामुळे करदात्यांना इनकम टॅक्स फाईल करणं सोपं जातं. नेमकं काय असतं ते जाणून घ्या.
आर्थिक वर्ष संपायला आलं की नोकदार वर्ग पहिल्यांदा फॉर्म 16 बाबत विचारणा करतो. नोकरी करणाऱ्या प्रत्येकला फॉर्म 16 बाबत माहिती असते. हा फॉर्म काम करत असलेल्या कंपनीकडून दिला जातो. या फॉर्ममध्ये इनकम आणि टॅक्सची माहिती असते, त्यामुळे हा फॉर्म नोकदार वर्गसाठी खूपच महत्त्वाचा असतो. आर्थिक वर्ष संपलं की असेसमेंट वर्षात म्हणजेच चालू आर्थिक वर्षात 15 जूनपूर्वी हा फॉर्म जारी करते. पण 2024-25 या आर्थिक वर्षात तुम्ही तुमची नोकरी बदलली असेल तर त्या त्या कंपन्यांकडून तुम्हाला फॉर्म 16 घ्यावा लागेल. समजा तुम्ही एखाद्या कंपनीत 30 जून 2024 पर्यंत कामं केलं आणि त्यानंतर दुसऱ्या कंपनीत रूजू झालात. तर तीन महिन्यांचा फॉर्म 16 पहिल्या कंपनीकडून, तर 9 महिन्यांचा फॉर्म दुसऱ्या कंपनीकडून घ्यावा लागेल. कंपन्यांना ज्या कर्मचाऱ्यांची मिळकत 2.5 लाखांच्या वर त्यांना फॉर्म 16 देणं आवश्यक आहे. जर कंपनी तसं करत नसेल तर दंड लागतो. इनकम टॅक्स कायद्याच्या कलम 272 नुसार दिवसाला 100 रुपयांचा दंड लागू शकतो.चला जाणून घेऊया फॉर्म 16 नेमकं असतं तरी काय?
तुमचं उत्पन्न आणि भरलेला कर याचा पुरावा म्हणून 16 कडे पाहिलं जातं. हा फॉर्म तुमच्या उत्पन्नाचा पुरावा असतो. इनकम टॅक्स रिटर्न करताना या फॉर्मचा तुम्हाला उपयोग होतो. इतकंच काय तुम्हाला एखाद्या बँकेकडून किंवा कर्ज देणाऱ्या संस्थेकडून कर्ज घ्यायचं असेल तर हा फॉर्म महत्त्वाची भूमिका बजावतो. तुम्ही भरलेला कर योग्य आहे की नाही याची इंत्यभूत माहिती या फॉर्म 16 मध्ये असते. या फॉर्मचे दोन भाग असतात. फॉर्म 16 ए आणि फॉर्म 16 बी.. या दोन भागांत नेमकं काय असतं ते पुढे समजून घ्या.
फॉर्म ए म्ध्ये संस्थेचा TAN, संस्था आणि कर्मचाऱ्याचा पॅन,पत्ता, असेसमेंट वर्ष, रोजगाराचा कालावधी आणि सरकारच्या खात्यात जमा केलेल्या टीडीएसचा संक्षिप्त अहवाल असतो. तर पार्ट बी मध्ये सॅलरी ब्रेकअप असतो. यात बेसिक सॅलरी, हाऊस रेंट अलाउंस, पीएफमधील योगदान, टीडीएस, प्रोफेशनल टॅक्स यांची माहिती असते. त्याचबरोबत कर सवलत म्हणून एचआरए मेडिकल अलाउंस आणि अन्य अलाउंसची माहिती असते. तसेच इनकम टॅक्स अॅक्ट, 1961 च्या अंतर्गत VI A नुसार तुम्ही सवलतीसाठी केलेला दावा किंवा कर निधीची थकबाकी असलेल्या कर निधीच्या रकमेसह आणि कर परताव्याची माहिती नोंदवली जाते.