GADGET INSURANCE : गॅझेट विमा का आहे महत्त्वाचा; जाणून घ्या विमा काढताना काय काळजी घ्यावी?
सध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर (INSURANCE) फायद्याचं ठरतं.
नुकतीच करिअरची सुरुवात केलेल्या रमेशनं कर्ज (loan) घेऊन आयफोन खरेदी केलाय. आयफोनसाठी (iPhone) त्याला दोन वर्ष महिना 3000 रुपये इतका EMI भरावा लागणार आहे. फोन घेऊन एकच महिना झाला असताना फोन मेट्रोच्या प्रवासात चोरीला गेला. रमेशला फोन चोरीला गेल्याच्या दु:खासोबतच आता दोन वर्ष हप्ता भरण्याची चिंता सतावत आहे. रमेशने फोन खरेदी करतानाच विमा (INSURANCE) घेतला असता तर ही वेळ आली नसती. आतापर्यंत त्याच्या हातात नवीन फोन आला असता. सध्या तंत्रज्ञानाच्या जगात स्मार्टफोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तूंना जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.या वस्तू खरेदी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. या गॅझेटची चोरी, तुटणे किंवा इतर नुकसानीची नेहमीच जोखीम असते. या जोखिमेपासून वाचण्यासाठी एक चांगला विमा कव्हर फायद्याचं ठरतं. इतर वस्तूंवरील विम्याप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप सारख्या वस्तूंवर देखील विमा संरक्षण मिळते. तुमचा मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास विमा कंपन्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतात.
विमा संरक्षण का महत्त्वाचे?
जेव्हा महागडा मोबाइल किंवा लॅपटॉप खरेदी कराल तेव्हा विमा संरक्षण घेण्याचा नक्की विचार करा. सहसा या वस्तू खरेदी केल्यानंतर पाच दिवसांच्या आतच विमा पॉलिसी खरेदी केली जाऊ शकते. विमा संरक्षण एका वर्षासाठी असते. पण काही विमा कंपन्या दोन किंवा तीन वर्षासाठी विमा संरक्षण देतात. स्मार्टफोनचा विमा असताना फोन चोरी झाल्यास विमा कंपनी भरपाई करून देते. तसेच परदेशात असताना देखील तुमच्या वस्तूचे नुकसान झाल्यासही भरपाई मिळते. एवढच नव्हे तर एखाद्या अपघातात फोन डॅमेज झाल्यास, पाण्यात खराब झाल्यास किंवा इन्स्टॉलेशनच्या वेळेस बिघडल्यानंतरही विमा कंपन्या नुकसानीची भरपाई देतात.
विमा कसा काढावा?
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू निर्मिती करणाऱ्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आणि अन्य काही बाबींवर प्रत्येक वस्तूवर एका वर्षांची वॉरंटी देतात. मात्र जर एखादे प्रोडक्ट चोरी किंवा खराब झाल्यास त्याचा खर्च स्वतःलाच करावा लागतो. त्यामुळे एखादी महागडी वस्तू खरेदी करत असाल तर इन्शुरन्स कव्हर घेणे गरजेचे आहे. यामुळे वस्तूची चोरी किंवा नुकसान झाले तरीही त्याला कव्हर मिळते.विमा केवळ नवीन गॅझेटसाठीच घेतला जाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा. गॅझेट खरेदी करतेवेळी शोरूममध्येच विमा खरेदी करता येतो. सहसा हा विमा कंपन्यांच्या एजंटद्वारे किंवा ब्रँचद्वारे विकला जात नाही. पण एको, ICICI, लोमबार्ड, बजाज फीनसर्व्ह सारख्या कंपन्या फोन सोबत इलेक्ट्रॉनिक गॅझेटसाठी ऑनलाइन इन्शुरन्सचा पर्याय देतात. सरकारी कंपनी न्यू इंडिया इन्शुरन्स देखील अशा प्रकरचा विमा देत आहे.
किती खर्च येतो
गॅझेटचा विमा हा त्याच्या किंमतीवर अवलंबून असतो. 10,000 रुपयाच्या स्मार्टफोनसाठी 600 रुपयांचा प्रीमियम असतो. 10,000 ते 75,000 रुपयांपर्यंतच्या विमा संरक्षणासाठी 3000 रुपयांपर्यंत रक्कम मोजावी लागते. महागड्या लॅपटॉपसाठी ही रक्कम 10 ते 12 हजारापर्यंत जाते. स्मार्ट टीव्ही,स्मार्ट अप्लायन्समध्ये सुद्धा विम्याचे पर्याय उपलब्ध आहेत. या वस्तूंचा विमा प्रीमियम विविध घटकांवर अवलंबून असतो.