भारतातील कुटुंबांनी अधिक कर्ज कोणत्या कारणासाठी घेतले आहे ?
या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे.
कोरोनाचा काळ सरला आणि देशातील कर्जाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे आरबीआयच्या आकडेवारीवरुन आणि मनी 9 च्या पल्स पर्सनल फायनान्स सर्व्हेमधून समोर आले आहे. गेल्या वर्षभरामध्ये देशात कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. या वर्षी ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्याने केलेल्या सर्वेक्षणात भारतातील 22 % कुटुंबांनी कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. ही संख्या 2022 मध्ये 11 % इतकी होती.
अधिक कर्ज कोणी घेतले ? :
या 11 % मधील 8 % लोकांनी गृहकर्ज , 4 % लोकांनी वाहन कर्ज आणि 2 % लोकांनी शैक्षणिक कर्ज घेतले आहे. यामध्ये तमिळनाडू , कर्नाटक,मध्यप्रदेश, ओडिसा आणि राजस्थानमध्ये वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे. तसेच महाराष्ट्र,चंदीगड, हरियाणा , पंजाब आणि दिलीमध्ये वाहन कर्ज सर्वाधिक घेण्यात आली आहे.
किती कर्ज घेतले जाऊ शकते ? :
तसेच आता सुमारे 21 % भारतीय कुटुंबं पुढील वर्षभरात कर्ज घेऊ शकतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामध्ये 10 % भारतीय कुटुंबं गृहकर्ज घेण्याच्या विचारात असून यामध्ये दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड,जम्मू-काश्मीर आणि हिमाचल या राज्यांचा समावेश आहे. तसेच येत्या वर्षात 5 % लोक हे वाहन कर्ज घेण्याच्या विचारात असून महाराष्ट्र, दिल्ली,कर्नाटक,छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार या वर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंत वैयक्तिक कर्जामध्ये सुमारे 30 % वाढ झाली आहे. यामध्ये गृहकर्ज, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्ड कर्जांमध्ये अधिक वाढ दिसून आली आहे.
सर्वेक्षण कुठे करण्यात आले ? :
ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये देशातील 20 राज्यांमध्ये 115 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण 10 वेगवेगळ्या भाषांमध्ये केले असून देशातील 1140 गावे , शहरी वाड्यांचा समावेश केला होतं.