Blue Chip Stock : ब्लूचिप स्टॉक्स आहे तरी काय? पैसा गुंतवाल तर म्हणाल..

Blue Chip Stock : ब्लूचिप स्टॉक्स म्हणजे आहे तरी काय? हा आहे एक जादुगार, नियोजन केल्यास, प्रतिक्षा केल्यास कसा होतो फायदा, इकडे तिकडे पैसे गुंतविण्यापेक्षा येथे गुंतवणूक केल्यास तुम्हाला काय मिळतो फायदा, जाणून तर घ्या..

Blue Chip Stock : ब्लूचिप स्टॉक्स आहे तरी काय? पैसा गुंतवाल तर म्हणाल..
फायद्याच फायदा
Follow us
| Updated on: Jun 25, 2023 | 1:47 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारात (Share Market) तुम्ही ब्लू चिप स्टॉक विषयी ऐकले असेलच. अनेकांनी नावं ऐकले आहे, पण ही काय भानगड आहे, हे त्यांना माहिती आहे. ब्लू चिप स्टॉक त्या मोठ्या कंपन्याचे स्टॉक असतात, ज्यांच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. या कंपन्यांची उत्पादने आणि सेवा बाजारात सर्वोत्तम मानण्यात येते. या कंपन्यांची शेअर बाजार आणि खुल्या बाजारात मजबूत पकड असते. या कंपन्यांचे धोरण, रणनीती ही इतर कंपन्यांपेक्षा अधिक जोरदार असते. या कंपन्या इतर कंपन्यांपेक्षा काकणभर पुढे असतात. ब्लू चिप या शब्दाची उत्पत्ती या खेळातून झाली आहे. या खेळात ब्लू चिपचे (Blue Chip Stock) मूल्य, किंमत सर्वाधिक असते. ब्लू चिप कंपन्यांचे शेअर्स सर्वोत्तम मानण्यात येतात. तर जाणून घेऊयात ब्लू चिप शेअरमध्ये गुंतवणुकीचे फायदे

स्थिरता शेअर बाजार हा जोखमीचाच असतो. पण ब्लू चिप स्टॉक उद्योज जगत आणि अर्थव्यवस्थेशी संबंधित इतर शेअर्सच्या तुलनेत आर्थिक मंदीचा जोरदार सामना करतात. हे स्टॉक स्थिर असतात.

गुंतवणुकीचा भरवशाचा पर्याय हे स्टॉक मध्यम आणि लहान कंपन्यांच्या स्टॉकच्या तुलनेत अधिक सुरक्षित आणि भरवशाचा गुंतवणूक पर्याय म्हणून बघतात.

हे सुद्धा वाचा

महत्वाच्या इंडेक्समध्ये नाव देशातील मोठ्या कंपन्या, देशातील मुख्य निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीत सहभागी असतात. अशा मोठ्या कंपन्यांचे नाव तुम्हाला सेन्सेक्स 30 आणि निफ्टी 100 मध्ये सहज सापडेल. या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, एचयुएल यांचा सहभाग आहे. सध्याच्या काळात स्टॉकमधील मुख्य इंडेक्स आणि म्युच्युअल फंड याच महत्वाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतात.

सेक्टरमध्ये अग्रेसर ब्लू चिप शेअर एक प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे या कंपन्या त्यांच्या सेक्टरमधील बाप कंपन्या असतात. त्या सेक्टर लीडर म्हणून समोर असतात. या कंपन्या त्यांचे उत्पादन आणि सेवेसाठी ओळखल्या जाते. या कंपन्यांचे शेअर होल्डिंग इतर कंपन्यांपेक्षा मजबूत असते. ब्रँड म्हणून या कंपन्या अग्रेसर असतात.

आर्थिक सक्षमता कर्जाचा भार कमी, वर्किंग कॅपटल कमी, हेल्दी बँलन्स शीट आणि खेळते भांडवल ही या कंपन्यांची जमेची बाजू णसते. त्यामुळे इतर कंपन्यांपेक्षा या कंपन्याची आर्थिक सक्षमता जास्त असते. आर्थिक स्थिरता, वितरणाचे मजबूत जाळे, दर्जेदार उत्पादन यामुळे या कंपन्या अग्रेसर असतात.

चढउतारात मजबूत या कंपन्या बाजारात मंदीचे सावट असेल, बाजारावर इतर कुठलेही संकट आले तरी या चढउतारात मजबूत असतात. त्यांच्यावर या घडामोडींचा मोठा प्रभाव पडत नाही. या चढउताराचा या कंपन्या चांगला पर्याय शोधतात अथवा त्यात ही टिकून राहतात. उलट अशावेळी या कंपन्या सोन्यासारख्या चमकतात.

सातत्यपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड या कंपन्यांची कामगिरी सातत्यपूर्ण असते. गुंतवणूकदारांना त्यामुळे घाबरण्याचे कोणतेच कारण उरत नाही. या कंपन्या पैसा बुडवत तर नाहीच, पण त्यात भर घालतात. त्याचा गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठा फायदा मिळतो. त्यांचा पैसा लवकर दुप्पट होतो.

जोखीम कमी ब्लू चिप कंपन्यांचे शेअर कमी जोखमीचे असतात. बाजारात अस्थिरता असली तरी नियोजन आणि धोरण यांच्या आधारे या कंपन्या जोखीमेवर मात करतात. नुकसान होतच नाही असे नाही. पण गुंतवणूकदारांना मोठा फटका बसत नाही.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.