हल्दीरामवर का आली कंपनी विकण्याची वेळ, खरेदी करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्यांमध्ये चढाओढ

| Updated on: Dec 11, 2024 | 10:52 PM

हल्दीराम हे नाव ऐकल्यावर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते. या ब्रँडने मध्यमवर्गाला 5 आणि 10 रुपयांची पाकिटे पोहोचवली. देशातील सर्वसामान्यांचा ब्रँड बनला. त्या कंपनीला खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्या आता शर्यतीत आहेत.

हल्दीरामवर का आली कंपनी विकण्याची वेळ, खरेदी करण्यासाठी अनेक परदेशी कंपन्यांमध्ये चढाओढ
Follow us on

हल्दीरामचे प्रोडक्ट खूपच चविष्ट असतात. या ब्रँडने मध्यमवर्गाला प्रीमियम अशी क्वालिटी दिली. 5 आणि 10 रुपयांची पाकिटे देशातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. पण आता ही कंपनी विकण्याच्या मार्गावर असल्याची बातमी येत आहेत. मिठाई आणि स्नॅक्स बनवणारी देशातील सर्वात मोठी कंपनी हल्दीरामच्या खरेदीसाठी आणखी एका परदेशी कंपनीने स्वारस्य दाखवले आहे. भारतीय सॉल्टी ब्रँड हल्दीराम कंपनी विकली जात असल्याच्या बातम्या येत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अल्फा वेव्ह ग्लोबल या अमेरिकेच्या टायगर ग्लोबल मॅनेजमेंटच्या युनिटने हल्दीराममधील भाग खरेदी करण्यासाठी रस दाखवला आहे. कंपनीने $1 बिलियनची ऑफर दिली आहे. यापूर्वी आणखी दोन परदेशी कंपन्यांनी हल्दीराममधील 15 ते 20 टक्के भागभांडवल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

ब्लॅकस्टोन व्यतिरिक्त अबू धाबी गुंतवणूक प्राधिकरण आणि सिंगापूर स्टेट फंड जीआयसी यांनीही हल्दीरामसाठी बोली लावली आहे. पण हल्दीरामकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

देशातील ही सर्वात मोठी पॅकेज्ड स्नॅक्स आणि मिठाई कंपनी आहे. हल्दीराम खरेदी करण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. हल्दीराम स्नॅक्स फूडमध्ये 15 ते 20% हिस्सा मिळविण्यासाठी आतापर्यंत 3 कंपन्या पुढे आल्या आहेत. ब्लॅकस्टोन आणि बेन कॅपिटलनंतर आता अल्फा वेव्ह ग्लोबलही या शर्यतीत आहे. विदेशीच नव्हे तर देशी कंपन्यांकडूनही ती खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. टाटा, पेप्सिको यांनीही हल्दीराम यांच्याशी बोलणी सुरु केलीये, मात्र मूल्यांकनाच्या मुद्द्यावर बोलणी पुढे सरकू शकली नाहीत अशी माहिती आहे.

भारतातील नमकीन आणि स्नॅक्स व्यवसायात हल्दीरामचा मोठा वाटा आहे. युरोमॉनिटर इंटरनॅशनलच्या मते, $6.2 अब्ज भारतीयांच्या या बाजारात हल्दीरामचा वाटा सुमारे 13% आहे. आधुनिक पिढीशी जुळवण्याची कला कंपनीकडे आहे. देशातील आघाडीच्या या स्नॅक्स ब्रँडने वारसा तर जपलाच पण त्यात तंत्रज्ञानाचा ही समावेश केला. कंपनीचे मूल्यांकन 66400 कोटी ते 70500 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सर्व काही सुरळीत सुरू असताना ही 87 वर्षे जुनी कंपनी का विकली जात आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याआधीही हल्दीरामला विकण्याचा प्रयत्न झालाय. टाटा, पेप्सिकोसारख्या कंपन्यांनी ती विकत घेण्याचा प्रयत्न केला होता. पण डील होऊ शकली नाही. आता हल्दीरामच्या चवीची मालकी घेण्यासाठी परदेशी कंपन्या प्रयत्न करत आहेत.

हल्दीरामची सुरुवात 1937 मध्ये झाली. गंगा बिशन अग्रवाल यांनी बिकानेरमधून एका छोट्याशा दुकानात याची सुरुवात केली होती. बिशन अग्रवाल यांनी आपल्या मावशीकडून बेसनाचा भुजिया कशी बनवायच्या ते शिकले. त्यानंतर रस्त्याच्या समोरच त्यांनी छोटेसे दुकान उघडले. हळूहळू लोकांना त्याची चव आवडू लागली. बिशनलाल यांची आजी त्यांना हल्दीराम म्हणायची, त्यामुळे त्यांनी नमकीन भुजियाचे नावही हल्दीराम असे ठेवले.