Adani LIC : अदानी समूहाला फटका बसल्याने एलआयसीला धोका? काय आहे कनेक्शन
Adani LIC : अदानी समूहाला फटका बसल्याने एलआयसीलाच्या गुंतवणुकीचा विषय ऐरणीवर आला आहे.
नवी दिल्ली : भारताची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी, एलआयसीने (LIC) गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अदानी यांच्या पाच कंपन्यांमध्ये एलआयसीची 9 टक्के हिस्सेदारी आहे. अमेरिकन गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या (Hindenburg) एका अहवालाने अदानी समूहाला हादरा दिला आहे. या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार, समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात या अहवालाने अदानी समूहाची चिंता वाढवली. अदानी समूहाने अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. अदानी समूहावर फसवणुकीचे आरोप झाल्याने दोन दिवसात या कंपनीचे बाजार मूल्य 4,08,122 म्हणजे 50 बिलियन डॉलर पेक्षाही कमी झाले आहे.
एका फाईलिंग नुसार, अदानी एंटरप्राईजेज लिमिटेडने 20,406 कोटींचे (2.5 बिलियन डॉलर) नवीन एफपीओ बाजारात आणले आहेत. त्यात एलआयसी एंकर गुंतवणूकदार म्हणून जवळपास 302 कोटी रुपये (37 मिलियन डॉलर) गुंतवणूक करत आहे.
या गुंतवणुकीनंतर एलआयसी कंपनीचे शेअर होल्डिंग 4.23 टक्के होईल. या अहवालाच्या स्फोटानंतर अदानी समूहाला जोरदार फटका बसला आहे. अदानी समूहाच्या बातमीने शुक्रवारी शेअर बाजाराला हदरवले. अदानी भयकंपाने बाजार गडगडला. अशात आता एलआयसीचे काय होणार? एलआयसीचे नुकसान तर होणार नाही ना?
हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाची घोडदौड, इतिहासातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा असल्याचा ठपका ठेवला आहे. अदानी समूहाच्या एफपीओमध्ये जवळपास 33 इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्संनी गुंतवणूक केली आहे. त्यात एलआयसीचा सहभाग आहे.
एलआयसीची गुंतवणूक इतर एंकर गुंतवणूकदारांच्या मानाने कमी आहे. तर एलआयसीच्या जवळपास 43 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. परंतु, या हादऱ्यांमुळे स्थानिक वित्तीय संस्थासाठी धोक्याची घंटा आहे. त्यांनी मोठी अथवा छोटी का असेना गुंतवणूक केली असले तर त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
केजरीवाल रिसर्च अँड इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक अरुण केजरीवाल यांनी एका मीडिया अहवालात सांगितले की, एलआयसी नेहमी वेगळ्या पद्धतीने विचार करते. बाजारातील चढ-उतारातही एलआयसीने मोठी कमाई केली आहे. एलआयसी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करते.
संपूर्ण देशात एलआयसीकडे 250 दशलक्षाहून अधिक विमाधारक आहे. देशातील म्युच्युअल फंड इंडस्ट्री इतकी संपत्ती असलेली एलआयसी देशातील मोठी आर्थिक संस्था आहे. आता या गुंतवणुकीबाबत बाजारात चर्चांना उधाण आले आहे.
एलआयसीने अदानी समूहाच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. यामध्ये 1 ते 9 टक्क्यांपर्यंतची हिस्सेदारी आहे. 24 जानेवारी रोजी हिंडनबर्ग रिपोर्ट प्रकाशित होण्यापूर्वी गुंतवणुकीचा एकूण आकडा 77,268 रुपये होता. पण इतर कोणत्याही भारतीय विमा कंपन्यांनी अदाणी समूहात फारशी गुंतवणूक केलेली नाही. म्युच्युअल फंड पण अदानी समूहापासून चार हात दूर आहेत.