Stock Market Crash: अमेरिकेने भारतीय बाजाराला दिला हादरा, हे 5 शेअर धराशायी; बाजारात त्सुनामी येणार की बाजार सावरणार?

शुक्रवारी अमेरिकन बाजारात चौफेर विक्रीच्या सत्राने S&P(500) मध्ये 2.91 टक्क्यांची घसरण झाली. तंत्रज्ञानाआधारीत कंपनी सूचिबद्ध असलेला इंडेक्स नास्डॅक कंपोझिट(Nasdaq Composite) ही या तडाख्यातून वाचू शकला नाही. या इंडेक्सला 3.52 टक्क्यांच्या नुकसानीचा फटका बसला

Stock Market Crash: अमेरिकेने भारतीय बाजाराला दिला हादरा, हे 5 शेअर धराशायी; बाजारात त्सुनामी येणार की बाजार सावरणार?
बाजाराला हादरा;गुंतवणुकदार चिंतेतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 11:58 AM

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय बाजारात (Share Market) सुरु असलेली पडझड थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. भारतीय बाजारातून पैसा काढून घेण्याचे सत्र अविरत सुरुच आहे. रेकॉर्डब्रेक महागाई आणि मंदीच्या भीतीने अमेरिकन बाजारात शुक्रवारी विक्रीचे सत्र तेजीत होते. या उलथापालथमुळे वॉल स्ट्रीट (Wall Street) मधील गुंतवणुकादारांचे चार गेले आणि पाच राहिले. त्यांना ही नुकसानीचा सामना करावा लागला. शुक्रवारी अमेरिकन बाजारात चौफेर विक्रीच्या सत्राने S&P(500) मध्ये 2.91 टक्क्यांची घसरण झाली. तंत्रज्ञानाआधारीत कंपनी सूचिबद्ध असलेला इंडेक्स नास्डॅक कंपोझिट(Nasdaq Composite) ही या तडाख्यातून वाचू शकला नाही. या इंडेक्सला 3.52 टक्क्यांच्या नुकसानीचा फटका बसला. शुक्रवारच्या या घडामोडीचा भारतीय बाजारावर आज परिणाम पहायला मिळाला. आठवडयाच्या सत्राची सुरुवातच नकारात्मक झाली. बीएसई सेंसेक्स (BSE Sensex) सुरुवातीलाच 1500 अंकांनी ढेपाळला. त्यामुळे गुंतवणुकदारांच्या तोंडचे पाणी पळाले. यामुळे नवख्या गुंतवणुकदारांना धसका बसला आहे.

असा ढेपाळला अमेरिकन भाऊ

शुक्रवारी अमेरिकन बाजारात चौफेर विक्रीच्या सत्राने S&P(500) मध्ये 2.91 टक्क्यांची घसरण झाली. तंत्रज्ञानाआधारीत कंपनी सूचिबद्ध असलेला इंडेक्स नास्डॅक कंपोझिट(Nasdaq Composite) ही या तडाख्यातून वाचू शकला नाही. या इंडेक्सला 3.52 टक्क्यांच्या नुकसानीचा फटका बसला. तर डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एवरेज(Dow Jones Industrial Average) 2.73 टक्के घसरला. या वर्षात S&P(500) 18 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर जानेवारीपासून नॅस्डॅक 28 टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या आठवडयात अमेरिकेच्या महागाईचे ताजी आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार सध्याची महागाई गेल्या चार दशकातील उच्चांकी स्तरावर आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय बाजाराला असा बसला फटका

अमेरिकन बाजारातील पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर ही दिसून आला. बीएसई सेंसेक्सने सुरुवातीच्या व्यापारी सत्रात सपशेल लोटांगण घेतले. बाजार 1500 अंकांनी घसरुन 53 हजारांच्या टप्प्यावरुन घसरला आहे. या सत्रात सेंसेक्स 52,791 अंकांच्या निच्चांकी पातळीवर पोहचला. एनएसई निफ्टीला ही 400 अंकांचा फटका बसला आहे. या सेंसेक्सच्या सूचीबद्ध 30 कंपन्यांचे शेअर सध्या धोक्याच्या पातळीवर नकारात्मक दिशेने व्यापार करत आहेत. बीएसईतील शेअर्सनी अगोदरच माना टाकल्या आहेत.

या 5 शेअरला सर्वाधिक फटका

एनएसई बाजारात सुरुवातीच्या व्यापारी सत्रात रिटेल कंपनी नंदनी क्रिएशन लिमिटेडला (Nandani Creation Ltd) फटका बसला आहे. कंपनीचे 16 टक्के नुकसान झाले आहे. तर आरबीएल बँकेचा (RBL Bank) त्यानंतर क्रमांक लागतो. बँकेच्या शेअरची 15 टक्क्यांनी घसरण झाली आहे. वी2रिटेलचा (V2Retail) स्टॉकला 10 टक्क्यांचे नुकसान सोसावे लागले. पोद्दार हाऊसिंग (Poddar Housing) आणि पर्ल पॉलीसर्म लिमिटेड (Pearl Polymers Ltd) यांचे स्टॉक 9.50 टक्क्यांनी घसरले आहे. सेक्टर प्रमाणे विचार केला तर रियल्टी, बँका आणि अर्थक्षेत्रातील स्टॉकवर थेट परिणाम दिसून आला आहे. या क्षेत्रातील शेअरवर बाजाराचे दडपण आहे. एकूण घडामोडी पाहता बाजारातील घसरणीचे चित्र कधी थांबणार याची चिंता गुंतवणुकदारांना लागली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.