TCS Krithivasanm : देवा, यालाच म्हणतात नशीब! TCS च्या नवीन सीईओची प्रेरणादायी कहाणी, वाचा के. कीर्तिवासन यांचा प्रवास

TCS Krithivasan : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेसचे (TCS) सीईओ राजेश गोपीनाथन यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता के. कीर्तिवासन हे कंपनीची जबाबदारी सांभाळणार आहे.

TCS Krithivasanm : देवा, यालाच म्हणतात नशीब! TCS च्या नवीन सीईओची प्रेरणादायी कहाणी, वाचा के. कीर्तिवासन यांचा प्रवास
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 10:15 AM

नवी दिल्ली : टाटा समूहाची (TATA Group) आयटी कंपनी टाटा कन्सल्टेंसी सर्व्हिसेस (TCS) देशातील दुसरी सर्वात मोठी मूल्यांकन असलेली कंपनी आहे. आता या कंपनीची कमान नवीन हातात जाणार आहे. टीसीएसचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन (Rajesh Gopinathan) यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळाची बैठक झाली. त्यांनी के. कीर्तिवासन (K. Krithivasan) यांना कंपनीचे नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून निवड केली आहे. कंपनीला, संचालक मंडळाला कीर्तिवासन हे नाव नवीन नाही. ते टीसीएसमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत. या कंपनीच्या सर्व बारीकसारीक बाबींविषयी त्यांना माहिती आहे. टीसीएसच्या BFSI सेगमेंटमध्ये त्यांचा हातखंड आहे. त्यांनी करिअरची सुरुवातच टीसीएसमधून केली आहे.

गोपीनाथन गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ टीसीएससोबत आहेत. टीसीएसच्या बोर्डाने गोपीनाथन यांचा राजीनामा स्वीकारला आहे. गोपीनाथन 15 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या पदावर राहतील. गोपीनाथन यांनी 22 वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर टीसीएसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. राजेश हे सर्वाधिक वेतन स्वीकारणाऱ्या सीईओंपैकी एक आहेत. त्यांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून 6 वर्षे काम केले. हा प्रवास अत्यंत रोमांचक असल्याचे गोपीनाथन यांनी सांगितले. एन.चंद्रशेखरन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले.

के. कृतिवासन 1989 मध्ये टीसीएसमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी टीसीएसमध्ये करिअरच्या सुरुवातीला डिलिव्हरी, सेल्स आणि इतर अनेक व्यवस्थापकयी जबाबदाऱ्या संभाळल्या. टीसीएसमध्ये त्यांच्या कार्याकाळात त्यांनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या. ते यापूर्वी टीसीएस बँकिंग आणि आर्थिक सेवा, या विभागाचाचे जागतिक प्रमख होते. ग्लोबल टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये कीर्तिवासन हे गेल्या 34 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी मद्रास (चेन्नई) विश्वविद्यालयात 34 वर्षे काम केले आहे. मद्रास विश्वविद्यालयातून त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली आहे. आयआयटी कानपूर येथून औद्योगिक आणि व्यवस्थापकीय अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे.

हे सुद्धा वाचा

TCS च्या BFSI सेगमेंटमध्ये त्यांनी कंपनीला मोठी कमाई करुन दिली. त्यांनी टीसीएसमध्ये डिलिव्हरी, कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंट, प्रोग्राम मॅनेजमेंट आणि सेल्स विभागाची जबाबदारी सांभाळली. त्यांचे संपूर्ण करिअर टीसीएसमध्ये गेले आहे. कीर्तिवासन यांचा TCS च्या कमाईत 35-40% योगदान आहे. गोपीनाथन हे 2001 पासून कंपनीसोबत काम करत होते. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. येत्या सप्टेंबरपर्यंत ते टीसीएसमध्ये कार्यरत राहतील.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.