विधानसभा निवडणूक होताचा इंधन दरवाढीचा झटका; मार्चमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महागणार?

सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशसह (UP Assembly Elections) पाच राज्यातील विधानसभेसाठी मतदान होत आहे. दहा मार्चला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणूक होताचा इंधन दरवाढीचा झटका; मार्चमध्ये पेट्रोल 8 रुपयांनी महागणार?
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 1:12 PM

मुंबई : सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. उत्तर प्रदेशसह (UP Assembly Elections) पाच राज्यातील विधानसभेसाठी मतदान होत आहे. दहा मार्चला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. एकीकडे कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. मात्र दुसरीकडे भारतात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. तब्बल 115 दिवसांपासून भारतात पेट्रोल-डिझेलचे (Petrol Diesel Price) दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे काही प्रमाणात का होत नाही सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु हा दिलासा आता जास्त दिवस टिकणार नाहीये. डोमेस्टिक रेटिंग एजंसी आयसीआरने (ICRA) आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सध्या ज्याप्रमाणात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत, त्या तुलनेत भारतात लिटर मागे आठ रुपयांनी पेट्रोल स्वस्त मिळत आहे. जेव्हा भारतामध्ये पाच राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झाली होती तेव्हा कच्च्या तेलाचे दर 87 डॉलर प्रति बॅरल इतके होते. ते आता प्रति बॅरल 100 डॉलरच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे निकालानंतर पेट्रोल दरवाढीचा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

काय आहे इक्राचा रिपोर्ट?

इक्राच्या एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, सरकार आता पेट्रोल, डिझेलवरील कर आणखी कमी करू शकत नाही. कर कमी केल्यास सरकारी तिजोरीवर कोट्यावधी रुपयांचा बोजा पडेल. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमती तर सातत्याने वाढतच आहेत. त्यामुळे दहा मार्चनंतर पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये वाढ होऊ शकते, असा अदाज इक्राच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

8 वर्षात प्रथमच कच्चे तेल 100 डॉलरवर

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. अर्थात त्याला कारण देखील तसेच आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव कडाडले आहेत. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 98 रुपयांवर पोहोचले आहेत. यापूर्वी चार डिसेंबर 2014 रोजी कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलरच्या आसपास पोहोचल्या होत्या. त्यानंतर आता तब्बल आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या दराने शंभर डॉलरचा टप्पा गाठला आहे. कच्च्या तेलाच्या किमती बघता येणाऱ्या काळात पेट्रोल, डिझेलची दरवाढ निश्चित मानण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

कच्च्या तेलाच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचा पेट्रोल, डिझेलचा भाव

Russia-Ukraine war, बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; महागाई भडकण्याची शक्यता

रशिया – युक्रेन युद्धाबाबत अर्थमंत्र्यांची चिंता; अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होण्याची भीती

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.