सोन्याचे दर वाढणार की कमी होणार? भाव आता तुम्हाला आधीच कळणार, ‘ही’ सोपी ट्रीक गुंतवणूकदारांना करेल मालामाल

सोन्याच्या दरामध्ये सुरू असलेल्या अनिश्चिततेच्या मोठा फटका हा गुंतवणूकदारांना बसतो. मात्र सोन्याचे दर कमी होणार की वाढणार याबाबत आता तुम्हाला आधीच कळू शकते, ते कसं पाहूयात.

सोन्याचे दर वाढणार की कमी होणार? भाव आता तुम्हाला आधीच कळणार, 'ही' सोपी ट्रीक गुंतवणूकदारांना करेल मालामाल
सोने
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 6:58 PM

दिवसेंदिवस सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ सुरू असल्याचं पाहयला मिळत आहे. चांदीचे दर देखील गगनाला भिडले आहेत. आजच्या दराबाबत बोलायचं झाल्यास आज मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा 80 हजार 400 रुपये एवढा आहे तर 22 कॅरट सोन्याचा दर हा 73 हजार 700 रुपये प्रति तोळा आहे. मात्र सोन्याच्या दरामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळते. सोनं हा मौल्यवान धातू असल्यामुळे अनेकदा सोन्याचे दर कमी झाल्यास त्याचा मोठा फटका हा गुंतवणूकदारांना बसतो. गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होतं. मात्र जर आपल्याला आधीच सोन्याच्या दराबाबत माहिती मिळाली तर? म्हणजे उद्या सोन्याचे दर कमी होणार आहेत की वाढणार आहेत? याबाबत तुम्हाला जर आधीच माहिती मिळाली तर तुम्ही त्यानुसार सोन्यामधील गुंतवणूक कमी-जास्त करू शकतात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा तुम्हाला होऊ शकतो.

सोपी ट्रीक  

सोन्याचे दर तुम्हाला जर आधीच जाणून घ्यायचे असतील म्हणजे पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये सोन्याचे दर वाढणार आहे की कमी होणार आहेत? याबाबत माहिती हवी असल्यास एक सोपी ट्रीक आहे. ती म्हणजे तुम्ही शेअर मार्केटवर लक्ष ठेवा. ज्या दिवशी शेअर्स मार्केट कोसळं त्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण अनेक गुंतवणूकदार हे शअर्स मार्केटमधून काढलेला पैसा हा सोन्यामध्ये गुंतवतात. दुसरीकडे ज्यावेळी शेअर्स मार्केट हे मजबूत स्थितीमध्ये असेल त्यावेळी असे समजावे की सोन्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे. कारण सोन्यामध्ये गुंतवलेला हा पैसा गुंतवणूकदार पुन्हा शेअर्स मार्केटमध्ये गुंतवतात.

थोडक्यात काय तर दुहेरी नुकसानं टाळण्यासाठी अनेक गुंतवणूकदारांकडून पर्यायी गुंतवणुकीची सोय केली जाते. म्हणाजे जर एखाद्या गुंतवणूकदाराला शेअर्स मार्केटमध्ये फटका बसला तर सोन्यामधील गंतवणुकीमध्ये त्याला फायदा होतो. जर सोन्यामधील गुंतवणुकीत त्याचं नुकसान झालं तर शेअर्स मार्केटमधील गुंतवणूक त्याला तारून नेते  असं हे समीकरण आहे.

(टीप वरील माहिती ही केवळ माहितीच्या उद्देशानं दिलेली आहे. त्यामुळे कुठलेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच मग ते करावेत.)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.