Share Market : शेअर बाजाराची काय राहील चाल, हे शेअर दाखवतील चमक, या घडामोडींचा होईल परिणाम

Share Market : पुढील आठवड्यात शेअर बाजाराची चाल काय राहील, शेअर बाजारात कोणत्या घटकांचा, घटनांचा परिणाम होईल. शेअर बाजारात कोणते स्टॉक चमकणार, कुठे होईल फायदा, बसेल का फटका

Share Market : शेअर बाजाराची काय राहील चाल, हे शेअर दाखवतील चमक, या घडामोडींचा होईल परिणाम
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 8:49 PM

नवी दिल्ली : पुढील आठवड्यात शेअर बाजार (Share Market) कोणता राग आवळेल? तुमचा काय होईल फायदा, काय बसेल फटका. पुढील आठवड्यात सुट्यांमुळे शेअर बाजारात जास्त दिवस कामकाज होणार नाही. केवळ तीन दिवस शेअर बाजारात काम होणार आहे. आरबीआयचे महागाई (Inflation) धोरण शेअर बाजारावर मोठा परिणाम करु शकते. बाजारातील तज्ज्ञानुसार, भारतीय रिझर्व्ह बँक महागाई आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे रेपो दरात वाढ होईल. आंतरराष्ट्रीय बाजारातील अमेरिकेसह युरोपमधील घाडमोडींचा मोठा परिणाम होऊ शकतो. परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (FPI) बाजाराची दिशा ठरवतील. मंगळवारी महावीर जयंती आणि शुक्रवारी गुड फ्रायडेमुळे बाजाराला सुट्टी राहील.

ऑटो कंपन्यांचे स्टॉक करतील कमाल बाजारातील तज्ज्ञानुसार, गुंतवणूकदारांचे लक्ष एफपीआय आणि घरगुती संस्थागत गुंतवणूकदारवर असेल. एफपीआय आता शुद्ध खरेदीदार झाले आहेत. बाजाराचे लक्ष आरबीआयच्या धोरणाकडे आहे. पतधोरण समितीची बैठक तीन दिवस होत आहे. त्यात रेपो दर किती वाढतो, यावर बाजार प्रतिक्रिया जरुर नोंदवेल. यंदा वाहन विक्री जोरदार झाली आहे. मारुती सुझुकी, हुंदायी आणि टाटा मोटर्सने गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक विक्री झाली. वाहन उद्योगने चांगले प्रदर्शन केले आहे.

ही आकडेवारी करेल परिणाम येत्या आठवड्यात जास्त सुट्या आहेत. मॅक्रो इकॉनॉमिक आघाडीवर, उत्पादन पीएमआय आणि सेवा पीएमआय डेटा 3 आणि 5 एप्रिल रोजी जाहीर होईल. 6 एप्रिल रोजी पतधोरण समितीच्या बैठकीच्या निकालाचा परिणाम बाजारावर दिसून येईल. परदेशी गुंतवणूकदारांचा परिणाम पण दिसून येईल.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी काय होती दिशा गेल्या आठवड्यात बीएसई 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1,464.42 अंकांनी अथवा 2.54 टक्क्यांनी वधारला. शुक्रवारी सेन्सेक्स 1,031.43 अंकांच्या अथवा 1.78 टक्क्यांच्या वाढीसह 58,991.52 वर बंद झाला. येत्या आठवड्यात भविष्यात रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीकडे बाजाराचे लक्ष असेल. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना फायदा झाला. शुक्रवारी आशिया, युरोप आणि अमेरिकेतील बाजार फायद्यात बंद झाले होते.

पीएसयु सेक्टरची जोरदार सलामी केवळ खासगी कंपन्यांच नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील या कंपन्यांनी (PSU stock) पण गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. शेअर बाजारात अनेक कंपन्या चांगला परतावा देतात. पण पीएसयू शेअर्सनी त्यांना सुरक्षित गुंतवणुकीसह त्यांना जोरदार परतावा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून, 2011 पासून या कंपन्यांनी लाभांश दिला आहे. काही पीएसयू स्टॉक्सने तर 32 वेळा लाभांश दिला आहे. जोरदार परतावा, सरकारी कंपनी, लाभांश असा हा कमाईचा पॅटर्न अनेक वर्षांपासून सुरु आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.