RBI News on 2000 Note : गुलाबी नोटेला किती भुलला शेअर बाजार! कसा होईल गुंतवणुकीवर परिणाम

RBI News on 2000 Note : गुलाबी नोटांचे कवित्व संपले आहे म्हणण्यापेक्षा संपविण्यात आले आहे, पण त्याचा शेअर बाजारावर काय परिणाम होईल माहिती आहे का

RBI News on 2000 Note : गुलाबी नोटेला किती भुलला शेअर बाजार! कसा होईल गुंतवणुकीवर परिणाम
Follow us
| Updated on: May 21, 2023 | 9:53 AM

नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनाबाहेर केली. गेल्या वर्षभरापासून या गुलाबी नोटेविषयी कवित्व सुरु होते. अखेर केंद्र सरकाने हे कवित्व अजराअमर करुन टाकलेच. 19 मे 2023 रोजी शुक्रवारी संध्याकाळी अचानक दोन हजार रुपयांची नोट बंद करण्याची घोषणा करण्यात आली. या 23 मेपासून नोटा बदलण्याची (2000 Rupees Note) धांदल सुरु होईल. बँकांसमोर पुन्हा नागरिकांची गर्दी होईल.नागरिक एकावेळी 2000 रुपयांच्या केवळ 10 नोट बदलवू शकता. पण या नोटबंदीचा शेअर बाजारावर (Share Market) किती परिणाम होईल, गुंतवणूकदारांना (Investors) फटका बसू शकतो का? याची चर्चा रंगली आहे, तज्ज्ञ काय म्हणतात..

कधी आली पहिल्यांदा नोट नोटबंदीनंतर 2017 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांची नोट चलनात आणली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नोट मुद्रण प्राधिकरण लिमिटेडने 2000 रुपयांच्या नोटेची छपाई नोटबंदी होण्याच्या 2.5-3 महिन्यापूर्वीच सुरु केली होती. त्यावेळी 500 रुपयांची नोट छापण्यात आली नव्हती.

127 दिवसांत बदला 26 लाख आरबीआयच्या परिपत्रकानुसार, 23 मे 2023 ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. ही मर्यादा एका दिवशी 20 हजार रुपायांपर्यंत आहे. म्हणजे 127 दिवसांमध्ये नागरिकांना 25,40,000 रुपये जमा करता येतील.

हे सुद्धा वाचा

इतक्या नोटा चलनात RBI च्या अहवालानुसार, 31 मार्च 2022 पर्यंत 2,000 रुपयांच्या (2000 Rupee note) एकूण 214.20 कोटी नोटा चलनात होत्या. एकूण नोटांच्या हे प्रमाण 1.6% आहे. मूल्यानुसार एकूण 4,28,394 कोटी रुपयांच्या नोटा व्यवहारात होत्या. इतक्या प्रमाणात नोटा असूनही त्या चलनात, व्यवहारात न दिसल्याने नागरिकांना पूर्वीच बंद होण्याची आशंका होती.

अशी झाली घसरण आरबीआयच्या आकड्यांनुसार, 2000 रुपयांच्या 31 मार्च, 2018 पर्यंत 6.73 लाख कोटी रुपये मुल्याच्या नोटा चलनात होत्या. एकूण नोटांपैकी ही संख्या 37.3 टक्के होती. 31 मार्च 2023 पर्यंत गुलाबी नोटा चलनातून कमी झाल्या. 10.8 टक्केच नोटा व्यवहारात होत्या. नोटा बदलण्यासाठी मोठा कालावधी दिला आहे. तसेच प्रक्रिया पण सोपी आहे. बँका आणि व्यावसायिक मध्यस्थी केंद्रातही नोटा बदलता येणार आहे.

शेअर बाजारावर काय होईल परिणाम नोटबंदीचा सर्वच क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तज्ज्ञांच्या मते शेअर बाजारावर याचा कुठलाच परिणाम दिसून येणार नाही. शेअर बाजारात ऑनलाईन व्यवहार होतात. त्यामुळे गुलाबी नोटेच्या मायाजालाचा बाजारावर परिणाम दिसणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र गुंतवणूकदारांकडे या नोटा मोठ्या प्रमाणात असतील तर त्यांच्यावर मनोवैज्ञानिक परिणाम दिसू शकतो. काळा पैसा मोठा प्रमाणात जमा केला असेल तर असे गुंतवणूकदार बाजारापासून दूर राहू शकतात.

2016 ची परिस्थिती वेगळी बाजारातील तज्ज्ञांनी 2016 मधील शेअर बाजारात परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी रोखीतील व्यवहार पण होत होते. तसेच बऱ्याच कालावधीनंतर ही नोटबंदीची गोष्ट घडल्याने नागरिक भांबावले होते. त्याचा परिणाम त्यावेळी शेअर बाजारावर पण दिसला होता. पण यावेळी शेअर बाजाराला त्यावर तात्काळ प्रतिक्रिया द्यायला, बाजारच सुरु नव्हता. आता दोन दिवसानंतर सोमवारी बाजारावर त्याचा विशेष परिणाम दिसणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.