Gautam Adani Share : अदानी समूहातील फायर ब्रँड दणकन आपटला! तज्ज्ञ म्हणतात, संधी आहे तर सोडता कशाला

| Updated on: May 20, 2023 | 11:22 AM

Gautam Adani Share : गौतम अदानी यांच्या कंपनीचा हा स्वस्त शेअर खरेदी करणार का? 4000 हजारांहून झरझर घसरला, AGTL कंपनीच्या शेअरवर नशीब आजमावणार का, हा शेअर का आलाय इतका चर्चेत

Gautam Adani Share : अदानी समूहातील फायर ब्रँड दणकन आपटला! तज्ज्ञ म्हणतात, संधी आहे तर सोडता कशाला
Follow us on

नवी दिल्ली : अदानी समूहाला सर्वोच्च न्यायालयातून दिलासा मिळाला असला तरी हिंडनबर्गचे भूत अजूनही मानगुटीवर आहे. अदानी टोटल गॅसला (Adani Total Gas) या रिपोर्टचा सर्वाधिक फटका बसला. या शेअरला लोअर सर्किट लागले होते. सध्या हा शेअर 699.10 रुपयांवर असून त्यात 4.87 टक्क्यांची वाढ दिसून आली. सध्या हा शेअर चर्चेत आहे. अनेक गुंतवणूकदार या शेअरवर लट्टू झाले आहेत. हिंडनबर्ग अहवालानंतर (Hindenburg Report) हा शेअर एकदम जमिनीवर आला. कधीकाळी 4000 रुपयांवर असलेला हा शेअर आता 700 रुपयांच्या आतबाहेर आहे. आता कमकुवत असलेल्या या शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देण्यात येत आहे.

इतके झाले नुकसान
अदानी समूहातील हा फायर ब्रँड आहे. पण हिंडनबर्गने त्याला पुरता घायळ केले. हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 81 टक्क्यांनी आपटला. 4000 रुपयांहून हा शेअर थेट 700 रुपयांच्या घरात येऊन पोहचला. म्हणजे 3300 रुपयांचे नुकसान या शेअरला झाले आहे. 24 जानेवारी 2023 रोजी हा शेअर 3891.75 रुपयांना होता. आज तो 699.10 रुपयांवर आहे. 19 मे रोजी हा शेअर सकाळच्या सत्रात 666.65 रुपयांवर होता. दिवसभरात 4.87 टक्क्यांची भरारी घेऊन तो 700 रुपयांच्या घरात येऊन थांबला आहे.

प्राईस हिस्ट्री
गेल्या पाच दिवसांत हा शेअर जवळपास 18 टक्क्यांनी घसरला. गेल्या एका महिन्यात तो जवळपास 30 टक्क्यांनी आपटला आहे. तर गेल्या सहा महिन्यांत 81 टक्क्यांनी आपटला. 4000 रुपयांहून हा शेअर थेट 700 रुपयांच्या घरात येऊन पोहचला. रिस्क मीटर हा शेअर 77 टक्के एक्सट्रीम रिस्कवर आहे.

हे सुद्धा वाचा

SWOT Analysis चे संकेत काय
SWOT Analysis वर नजर टाकल्यावर चित्र अजून स्पष्ट होते. या शेअरची क्षमता, कमकुवतपणा, संधी आणि धोक्याचे हे विश्लेषण आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना त्यांचा निर्णय घेण्यास स्पष्टता येईल. या स्टॉकचा सकारात्मक, नकारात्मक लेखाजोखा तपासल्याशिवाय गुंतवणूक करणे वेडेपणा ठरु शकते. या स्टॉकची ताकद, क्षमता (Strengths), कमकुवतपणा (Weakness), संधी (Opportunity), आणि धोका (Threats, Risk) या वर्गीकरणातून गुंतवणूकदारांनी विश्लेषण करुन निर्णय घ्यावा.

अदानी समूहावर कर्जाचा डोंगर
हे नवीन वर्ष, 2023 गौतम अदानी आणि त्यांच्या समूहासाठी अत्यंत वाईट ठरले. हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवालाने त्यांचे पंख कापल्या गेले. गुंतवणूकदारांनी या समूहातून गुंतवणूक काढण्याचा सपाटा लावला. अद्यापही हा समूह या धक्क्यातून सावरला नाही. अदानी समूहावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत 24.1 दशलक्ष डॉलरचे कर्ज असल्याची चर्चा आहे. काही मीडियातील रिपोर्टनुसार हा आकडा 40 दशलक्ष डॉलरच्या घरात आहे.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअरच्या कामगिरीची माहिती आहे. गुंतवणूकदारांनी अभ्यास करुन तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.