Azim Premji | देशाचे बडे व्यावसायिक आणि दानवीर अजीम प्रेमजींनी 9000 कोटींचे शेअर विकले
शेअर बायबॅकमध्ये प्रेमजीने 9,156 कोटी रुपयांचे शेअर विकले. त्यानंतर त्यांची भागीदारी 74 टक्क्यांवरुन घसरुन 73 टक्के झाली आहे
नवी दिल्ली : देशातील मोठी आयटी कंपनी विप्रोचे (Wipro) फाऊंडर चेअरमन अजीम प्रेमजी ( Azim Premji Sells Shares Worth Rs 9000 Crore) आणि प्रोमोटर ग्रूपने 22.8 टक्के शेअर बायबॅक ऑफरमध्ये विकले आहेत. शेअर बायबॅकमध्ये प्रेमजीने 9,156 कोटी रुपयांचे शेअर विकले. त्यानंतर त्यांची भागीदारी 74 टक्क्यांवरुन घसरुन 73 टक्के झाली आहे ( Azim Premji Sells Shares Worth Rs 9000 Crore).
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विप्रोने 9,500 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक ऑफर उघडलं होतं. या प्रोग्रामअंतर्गत कंपनीने 400 रुपये प्रती शेअरच्या दराने 23.75 कोटींचे इक्विटी शेअर विकत घेतले होते.
प्रेमजी यांचे दोन परोपकारी ट्रस्ट आहेत. ‘अजीम प्रेमजी ट्रस्ट’ (Azim Premji Trust) आणि ‘अजीम प्रेमजी परोपकारी पहल’ (Azim Premji Philanthropic Initiatives) यामधून 7,807 कोटी रुपये कमावतील. यामुळे ते भारतातील सर्वात मोठं चॅरिटेबल ट्रस्ट बनेल.
हा ट्रस्ट शिक्षण, पोषण आणि अपंग व्यक्ती, स्ट्रीट चिल्ड्रेन, घरगुती हिंसाचारातून बचावलेल्यांसह असुरक्षित गटांना मदत करत आहे. या क्षेत्रात पैसा लावून अशा लोकांच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
दररोज 22 कोटी रुपयांचं दान
आयटी कंपनी विप्रोचे अजीम प्रेमजी दानधर्माच्या कामात मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यांनी गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 परोपकारी कामांमध्ये प्रत्येक दिवशी 22 कोटी रुपये म्हणजेच एकूण 7,904 कोटी रुपयांचं दान दिलं. यामध्ये ते सर्वात वरच्या स्थानावर आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्ये IIFL वेल्थ हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये प्रेमजी 1,14,400 कोटी रुपयांच्या संपत्तीसह पाचव्या क्रमांकावर होते. प्रेमजी यांनी पहिले देखील आपल्या दानधर्माच्या कामांसाठी 21 अब्ज डॉलर खर्च करण्यासाठी वचनबद्ध आहेत. त्याचं हे दान आशिया खंडातील सर्वात मोठे आणि जगातील सर्वात मोठ्या दानवीरांपैकी एक आहे.
रिशद प्रेमजींकडून आजींची आठवण
My grandmother Dr Gulbanoo Premji with my parents at Amalner. She was chairperson of Wipro from 1966-83 & a huge support for my father in the early years. She was also the most generous person I knew. Her values shaped Wipro’s philanthropy ideals. #75YearsofWipro #TheStoryofWipro pic.twitter.com/jnFDnWNoW8
— Rishad Premji (@RishadPremji) January 12, 2021
नुकतंच विप्रोचो चोअरमन रिशद प्रेमजी यांनी आपल्या आई-वडिलांसह आजीची एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला. “माजी आजी डॉ. गुलबानो प्रेमजी, माझे आई-वडील अमलनेर येथे आहेत. त्या 1966-83 ते विप्रोच्या चेअरमन आहेत आणि सुरुवातीच्या वर्षांमध्ये माझ्या वडिलांना त्यांचं मोठं समर्थन होतं. माझ्या ओळखीतल्या त्या सर्वात जास्त उदार व्यक्ती होत्या. त्यांच्या मूल्यांनी विप्रोच्या परोपकाराच्या आदर्शांना आकार दिला”, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं (Azim Premji Sells Shares Worth Rs 9000 Crore)
संबंधित बातम्या :
Corona : ना पीएम, ना सीएम फंडला देणगी, विप्रो स्वत:च कोरोना लढाईवर तब्बल 1,125 कोटी खर्च करणार