Azim Premji Birthday | प्रचंड मेहनतीने उभारला विप्रो ब्रँड, त्याचे अमळनेर कनेक्शन माहिती आहे का? आज अझीम प्रेमजी यांचा वाढदिवस

Azim Premji Birthday | जगातील प्रमुख आयटी कंपन्यांपैकी (IT complies)एक विप्रो (Wipro) कंपनीची स्थापना ज्या वर्षी झाली त्याच वर्षी अझीम प्रेमजी यांचा जन्म झाला होता. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील शिक्षण अर्ध्यावर सोडून त्यांनी त्यांच्या वडिलांचा कारभार बघायला सुरुवात केली. आज त्यांचा 77 वा वाढदिवस आहे.

Azim Premji Birthday | प्रचंड मेहनतीने उभारला विप्रो ब्रँड, त्याचे अमळनेर कनेक्शन माहिती आहे का? आज अझीम प्रेमजी यांचा वाढदिवस
Azim Premji BirthdayImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 12:49 PM

Azim Premji Birthday | 11 ऑगस्ट 1966. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात (Stanford University) अझीम प्रेमजी (Azim Premji) शिक्षण घेत होते. गेल्याच महिन्यात त्यांचा 21 वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तर पुढच्या सहा महिन्यांत ते पदवीधर होणार होते. पण या दिवशी आलेल्या एका फोनमुळे त्यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांच्या आईने फोन केला आणि त्यांच्या वडिलांच्या मृत्यूची वार्ता त्यांना दिली. त्यामुळे ते लागलीच भारतात परत आले. भारतात आल्यावर त्यांनी वडिलांचा कारोबार सांभाळायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता प्रचंड मेहनतीने त्यांनी त्यांचं साम्राज्य उभं केलं. त्यांनी अनेक उद्योगात हात घातला. काहींमध्ये प्रचंड यश आले तर काहींमध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला. पण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांचे नशीब चमकले. त्यांच्या विप्रो (Wipro) कंपनीने जोरदार घौडदोड केली आणि जगातील श्रीमंतांच्या (Richest Person) यादीत त्यांना स्थान मिळवून दिली. त्यांची ओळख केवळ उद्योग सम्राटच नाही तर एक दानशूर आणि नम्र व्यक्ती म्हणून ही त्यांचे वेगळ व्यक्तिमत्व अधोरेखित करते. बडे उद्योजक अझीम प्रेमजी यांचा आज वाढदिवस आहे. ते आज 77 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 24 जुलै 1945 रोजी झाला होता.

अमळनेर कनेक्शन

त्यांच्या जन्माच्यावेळीच, जगातील प्रमुख आयटी कंपनी विप्रोची सुरुवात झाली होती. त्यावेळेच्या ब्रह्मदेश आणि आताच्या मान्यमार या देशातून अझीम प्रेमजी यांचे वडील हुसैन हाशिम प्रेमजी आले होते. त्यांना त्यांचा परंपरागत तांदुळ विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागला होता. इंग्रजांच्या काही नियमांमुळे हे गंडांतर आले होते. त्यामुळे त्यांचे वडील नवीन व्यवसायाच्या शोधात होते. त्याचवेळी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे त्यांना एका व्यापाऱ्याला भेटायला जायचे होते. त्यांनी त्याला कर्ज दिले होते. व्यापाऱ्याने कर्ज बदल्यात त्यांना त्याची ऑईल मिल खरेदीचा प्रस्ताव दिला आणि येथूनच त्यांच्या नव्या उद्योगाची मुहूर्तमेढ रचली गेली. तांदुळ व्यापारातून त्यांचा वनस्पती तेलाचा व्यवसाय सुरु झाला. हाशिम यांनी या कंपनीचे नाव ठेवले, वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्ट, ही कंपनी 25 डिसेंबर 1945 रोजी स्थापन झाली. पुढच्याच वर्षी ती मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. त्यानंतर हा व्यवसाय जोमाने सुरु राहिला. फारूख एम एच हे त्यांचे मोठे बंधु वडिलांसोबत व्यवसायाचा गाडा हाकत होते. पण 1965 ते पाकिस्तानात स्थायिक झाले. वडिलांच्या निधनानंतर अझीमजींनी कंपनीचा कारभार हातात घेतला आणि त्याचा विस्तार केला. अमळनेर येथे तीन दिवस नंतर मुंबईसह इतर शहरात त्यांचा प्रवास सुरु झाला. त्यानंतर त्यांनी 1975 साली इतर व्यवसायात नशीब आजमावले. 1979 साली त्यांनी सरकारच्या विदेशी कंपन्यांविषयीच्या धोरणाचा अभ्यास करुन भारतातील संगणक युगात प्रवेश केला आणि कम्प्युटर क्षेत्रात कंपनी स्थापना केली आणि 1982 साली वेस्टर्न इंडिया व्हेजिटेबल प्रोडक्टचं नाव विप्रो करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

30 वर्षानंतर पुन्हा शिक्षण

वडिलांच्या मृत्यूमुळे अपूर्ण राहिलेले शिक्षण त्यांनी जिद्दीने पुन्हा सुरु केले, ते ही 30 वर्षानंतर 1995 साली अझीम प्रेमजी यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात पुन्हा अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करुन पदवी मिळवली. 2019 मध्ये त्यांनी 52,750 कोटींचे शेअर त्यांच्या फाऊंडेशनला दान केले. त्यामाध्यमातून गरीबांचे कल्याण आणि धार्मिक कार्यावर खर्च करण्यात येतो.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.