Share Market : Nifty 50 मधून HDFC गायब, आता या कंपनीची एंट्री

Share Market : एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर महत्वाची अपडेट समोर येत आहे. Nifty 50 मधून एचडीएफसी हटणार आहे तर त्या जागी ही कंपनी एंट्री घेणार आहे. कोणती आहे ही कंपनी..

Share Market : Nifty 50 मधून HDFC गायब, आता या कंपनीची एंट्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 6:17 PM

नवी दिल्ली : गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी लिमिटेड (HDFC Ltd) आणि मोठी खासगी बँक एचडीएफसीचे (HDFC Bank) विलिनीकरण झाले आहे. या विलिनीकरणामुळे एचडीएफसी आता जगातील चौथी सर्वात मोठी बँक झाली आहे. 1 जुलै पासून दोन्ही संस्था एकत्र आल्या. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला. एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणानंतर महत्वाची अपडेट समोर येत आहे. Nifty 50 मधून एचडीएफसी हटणार आहे तर त्या जागी ही कंपनी एंट्री घेणार आहे. कोणती आहे ही कंपनी?

सर्वात मोठा सौदा देशातील दोन संस्था विलिनीकरणाची ही मोठी घटना आहे. हा व्यवहार 40 अब्ज डॉलरचा आहे. या विलिनीकरणामुळे 168 अब्ज डॉलरची बँक उभी राहणार आहे. या विलिनीकरणाचा परिणाम देशातील लाखो ग्राहक आणि शेअर्सहोल्डर्सवर दिसून येईल. एचडीएफसी लिमिटेडच्या प्रत्येक शेअरधारकाला 25 शेअर्सच्या मोबदल्यात एचडीएफसी बँकेचे 42 शेअर्स मिळतील.

Nifty 50 बदल या विलिनीकरणाचा आणखी एक परिणाम दिसून आला. Nifty 50 मोठा बदल झाला. या विलिनीकरणामुळे एचडीएफसी लिमिटेडचा शेअर 13 जुलैपासून Nifty 50 मधून हटविण्यात येईल. कारण ही कंपनी आता एचडीएफसी बँकेत विलीन झाली आहे. त्यामुळे टॉप 50 शेअर्समधून हा शेअर हटविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

या कंपनीची एंट्री Nifty 50 इंडेक्समध्ये एचडीएफसी लिमिटेड हटविल्यानंतर LTI मायडट्री चा शेअर त्याजागी असेल. निफ्टी 50 इंडेक्समध्ये आता फेरबदल होणार आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकाच्या उपकंपनीने 13 जुलैपासून निफ्टी 50 इंडेक्स मध्ये एचडीएफसी लिमिटेडच्या जागी एलटीआई मायडट्रीची एंट्री होईल.

निफ्टी 100, निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्समध्ये बदल माहितीनुसार, निफ्टी 100 आणि निफ्टी मिडकॅप 150 इंडेक्समध्ये एचडीएफसीच्या जागी आता जिंदल स्टील अँड पॉवरचा समावेश होईल. निफ्टी नेक्स्ट 50 इंडेक्समध्ये एलटीआई मायडट्री सहभागी होईल. निफ्टी 500, निफ्टी 200, निफ्टी लॉर्ज मिडकॅप 250 आणि निफ्टी टोटल मार्केट इंडेक्समध्ये मॅनकाईंड फार्मा ला एचडीएफसीऐवजी स्थान देण्यात येईल. याशिवाय निफ्टी फायनेन्शियल सर्व्हिसेज इंडेक्समध्ये एचडीएफसीच्या जागी एलआयसी हाऊसिंग फायनान्स कंपनीचा समावेश करण्यात येईल.

या कंपन्यांचा समावेश फिनिक्स मिल्स या कंपनीला निफ्टी हाऊसिंग इंडेक्समध्ये आणि ब्रिगेड एंटरप्रायजेजला एचडीएफसीच्या ऐवजी संधी देण्यात येईल. निफ्टी 100 ईएसजी, निफ्टी 100 एंहान्स्ड ईएसजी आणि निफ्टी 100 ईएसजी सेक्टर लीडर्स इंडेक्समधून एचडीएफसीला बाहेर करण्यात आले आहे. तर निफ्टी मिडकॅप लिक्विड 15 मध्ये जिंदल स्टील अँड पॉवरऐवजी कमिंस इंडिया कंपनीचा समावेश करण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.