नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून सोने-चांदीच्या (Gold Silver Price Today) आघाडीवर कोणताही रेकॉर्ड झाला नाही. किंमतींनी उसळी घेतली नाही. ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोने-चांदीतील ही घसरण पुढील वादळाची नांदी तर नाही ना, असा अंदाज पण वर्तविण्यात येत आहे. सोने जून महिन्यात 70 हजारांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज होता. 62,000 रुपयांचा टप्पा गाठणाऱ्या गाठल्यानंतर हा अंदाज खरा वाटत होता. मे आणि जून महिन्यात मात्र सोन्यात मोठी घसरण झाली. सोने एकदम 60,000 रुपयांच्या खाली आले. चांदीतही घसरण झाली. भावातील ताजी अपडेट जाणून घ्या..
सोन्यात अशी झाली पडझड
1 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,930 रुपये होता. 10 जून रोजी सोन्याचा भाव 60,700 रुपये होता. त्यानंतर भाव घसरले. 15 जून रोजी सोने प्रति 10 ग्रॅम 380 रुपयांनी स्वस्त होऊन 59,820 रुपयांवर पोहचले. 20 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,150 रुपयांवर आला. 27 जून रोजी सोन्याची किंमत 59,430 रुपये प्रति 10 ग्रॅम होत्या. तर 28 जून रोजी सोने 320 रुपयांनी घसरले. 24 कॅरेट सोने 59,110 रुपयांवर आले. 29 जून रोजी पुन्हा घसरण झाली. हा भाव 58,900 रुपयांवर आला. गुडरिटर्न्सनुसार या किंमती अपडेट करण्यात आल्या आहेत.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
29 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,151 रुपये, 23 कॅरेट 57,918 रुपये, 22 कॅरेट सोने 53,266 रुपये, 18 कॅरेट 43,613 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34018 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.
चांदीचा भाव काय
चांदीतही घसरण झाली. यापूर्वी चांदीत एक किलोमागे 3000 रुपयांची घसरण झाली. 21 जून रोजी एक किलो चांदी 73,000 रुपये होती. 30 जून रोजी हा भाव 71,900 रुपये किलो झाला. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास 3000 रुपयांची घसरण झाली. तर दोन दिवसांत एक हजारांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार ही किंमत आहे.
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.