बाबा रामदेव यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स किती? अनेकांची बंद होणार बोलती!
What India Thinks Today | काही वर्षांपूर्वी बाबा म्हटले की लोक नाकं मुरडायची, त्यांना कोण ऐकणार असा सवाल विचारला जायचा. 'बाबा का गेट और मंदिर का पेट' दुरूनच दिसायचे. पण आता बाबा काय म्हणतात, याकडे सर्वांचे लक्ष असते, असे TV9 च्या WITT सत्ता संमेलनात बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी अनुभव कथन केला.
नवी दिल्ली | 27 February 2024 : पूर्वी बाबा आणि मंदिराकडे जाण्यास अनेक जण उत्सूक नसायचे. बाबा म्हटले की अनेक जण नाकं मुराडायची. पण आता मोठा बदल झाला आहे. पूर्वी आम्हाला धक्के मिळायचे. आता माझे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत, असे योगगुरु रामदेव बाबा यांनी सांगितले. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या फॅन फॉलोअर्सची संख्याच सांगून टाकली. हा आकडा वाचून अनेकांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. TV9 च्या WITT सत्ता संमेलनात बाबा रामदेव यांनी जीवन प्रवास उलगडताना आलेले अनुभव सर्वांसोबत शेअर केले.
काय म्हणाले रामदेव बाबा
ज्यावेळी अध्यात्म आणि योग क्षेत्रात पाऊल टाकले, तेव्हा तर धार्मिक, आध्यत्मिक क्षेत्रात मोठं मोठे शंकराचार्य होते. धुरंधर व्यक्ती या क्षेत्रात होत्या. त्यावेळी लोक आपल्याला धक्के मारुन बाजूला करायचे, अशी आठवण त्यांनी सांगितली. सेवा कार्य सुरु केले. त्यानंतर आज मेन स्ट्रीम मीडिया व्यतिरिक्त सोशल मीडियावर कोट्यवधी फॅन फॉलोअर्स असल्याचे ते म्हणाले.
किती आहे फॉलोअर्सची संख्या
बाबा रामदेव यांनी जीवन प्रवास उलगडताना या घडीला त्यांचे किती फॅन फॉलोअर्स आहेत, याचा आकडा सांगितला. यासंबंधी माहिती दिली. फेसबुकवर त्यांचे सव्वा कोटी फॉलोअर्स आहेत. 1 कोटींहून अधिक लोक युट्यूबवर त्यांना फॉलो करतात. 800 कोटींहून अधिक वेळा त्यांचे व्हिडिओ पाहण्यात आले आहेत. पूर्वी बाबांना कोणी विचारत नव्हते. पण आता बाबा काही बोलले तर, लोक कान देऊन ऐकतात, असा अनुभव त्यांनी सांगितला.
असा सांगितला दिनक्रम
रामदेव बाबा यांनी त्यांची दिनचर्या समोर आणली. त्यानुसार, ते भल्या पहाटे 3 वाजता उठतात. तेव्हापासून त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. रामदेव बाबा पूर्ण दिवस त्यांचे काम करतात. रात्री 10 वाजेनंतर झोपतात. ते दिवसभर 18 तास कार्यरत असतात. त्यानंतरच ते आराम करतात असे ते म्हणाले.
शून्य ते 5 लाख कोटींची भरारी
रामदेव बाबा यांनी सत्ता संमेलनात त्यांचा जीवन प्रवास उलगडला. 35 वर्षांपूर्वी हरिद्वार येथे आलो तेव्हा आपण केवळ एक बाबा होतो. आपल्याकडे काहीच नव्हते. त्यानंतर योगाची सुरुवात केली. हळूहळू पंतजलीचे साम्राज्य उभे राहिले. त्यांनी योग, त्यानंतर आयुर्वेदिक उत्पादने तयार करुन त्यांची विक्री केली. जर एक बाबा इतके काम करु शकतो, तर लोकांनी यापेक्षा अधिक काम करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.