Investment : महिलांसाठी ही गुंतवणूक योजना राहील फायदेशीर, मिळेल जोरदार परतावा

Investment : महिलांसाठी या गुंतवणूक योजनेत गुंतवणूक करणे फायदेशीर राहील.

Investment : महिलांसाठी ही गुंतवणूक योजना राहील फायदेशीर, मिळेल जोरदार परतावा
गुंतवणुकीवर चांगला परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 06, 2022 | 10:50 PM

नवी दिल्ली : जर भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करायची असेल, तर त्यासाठी एक मोठा फंड आवश्यक राहील. गुंतवणूकीत पुरुष साधारणतः स्टॉक मार्केट (Stock Market), रिअल इस्टेट आणि म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक करतात. मग महिलांना गुंतवणुकीचा पर्याय काय आहेत आणि त्यांचा कुठे गुंतवणूक (Investment) करण्याचा कल आहे ते पाहुयात..

सुरक्षित आणि ज्याठिकाणी परताव्याची विना जोखिम हमी मिळते, अशा ठिकाणी महिला गुंतवणूक करतात. त्यामध्ये बँकेतील ठेव, मुदत ठेव (Fixed Deposit) , आवर्ती ठेव योजना, सराफा बाजारातील गुंतवणूक योजनांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पण महिलांनीही गुंतवणुकीसाठी चोखंदळ राहणं आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना ही जोखिमेसह गुंतवणुकीतून चांगला परतावा ही मिळवू शकतात. त्यामुळे त्यांनीही स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंडाकडे मोर्चा वळविणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

काही महिलांनी गुंतवणुकीचा ट्रॅक बदलविला आहे. गोल्ड आणि फिक्स्ड डिपॉजिटपेक्षा ही त्या गुंतवणुकीचा पर्याय शोधत आहेत. त्यांचा म्युच्युअल फंडाकडे ओढा वाढला आहे.अनेक महिला गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूकही वाढवली आहे.

महिलांना गुंतवणुकीसाठी इक्विटी फंड हा चांगला पर्याय आहे. हा महागाईला मात देण्यासाठी सर्वोत्तम म्युच्युअल फंड मानण्यात येतो. यामध्ये जोखिम असली तरी अधिक फायदा होतो. या फंडात दीर्घ गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते.

म्युच्युअल फंडमधील इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) चांगली योजना आहे. या गुंतवणुकीत प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत सूट मिळते. यामध्ये 3 वर्षांची लॉक-इन कालावधी असतो. इक्विटी फंडसारखा फायदा मिळतो.

Debt Funds बाँड, कॉर्पोरेट बाँड, गव्हर्मेंट सिक्युरिटी, मनी मार्केट इंस्ट्रुमेंट्स यामध्ये गुंतवणूक करतो. गुंतवणूकदारांना स्थिर आणि नियमीत कमाई करता येते.

डेट फंडमध्ये परतावा कमी मिळतो. पण यामध्ये जोखीम फार कमी असते. योजनेत मुदत ठेवीपेक्षा अधिकचा परतावा मिळतो. कमीत कमी 1 ते 3 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक फायद्याची ठरते.

Liquid Funds हा डेट फंडमध्येच येते. या फंडात 1-60 दिवसांसाठी तुम्हाला गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे या योजनेतंर्गत जास्त परतावा मिळत नसला तरी, शनिवार अथवा रविवारी तुम्ही गुंतवणूक रक्कम काढू शकतात.

Hybrid Funds नावाप्रमाणेच हा फंड असतो. इक्विटी आणि डेट फंड या दोन्हीमध्ये या फंडातंर्गत गुंतवणूक केली जाते. यामध्ये जोखिमही कमी असते. त्यामुळे यामधील गुंतवणूक फायद्याची ठरते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.