Stree Shakti Yojana : महिला उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी! विना तारण मिळवा लाखोंचे कर्ज, व्याजदर ही आगदी माफक, मग वाट कसली पाहता..

Stree Shakti Yojana : महिला सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारने जोरदार योजना आणली आहे..

Stree Shakti Yojana : महिला उद्योजिकांसाठी सुवर्णसंधी! विना तारण मिळवा लाखोंचे कर्ज, व्याजदर ही आगदी माफक, मग वाट कसली पाहता..
चला उद्योजिका घडवूयातImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 19, 2022 | 4:19 PM

नवी दिल्ली : महिला सशक्तीकरणासाठी (Women Empowerment) केंद्र आणि राज्य स्तरावर अनेक योजना आहेत. पण व्यवसायात महिलांची संख्या वाढविण्यासाठी आता केंद्र सरकारने (Central Government) जोरदार योजना आणली आहे. त्यामुळे महिला उद्योजिका (Women Entrepreneurs) वाढण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे.

महिला उद्योगात पुरुषांपेक्षा अत्यंत पिछाडीवर आहेत. त्यांची संख्या वाढविण्यासाठी केंद्र सरकारने स्त्री शक्ती योजना (Stree Shakti Package Yojana) आणली आहे. त्यामुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता येणार आहे.

महिलांसाठी ही मोठी संधी आहे. या योजनेतंर्गत महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे योजनेतंर्गत काही लाखांच्या कर्जापर्यंत महिलांना तारण ठेवण्याची गरज नाही.

हे सुद्धा वाचा

या योजनेसाठी केंद्र सरकारने भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया(SBI) सोबत सहकार्य करार केला आहे. त्यामुळे देशभरातील महिलांना वेळीच कर्ज पुरवठा करणे शक्य होणार आहे.

स्त्री शक्ती पॅकेज योजनेत महिला उद्योजकांना अल्प व्याज दराने कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. तसेच या कर्जासाठीची प्रक्रियाही साधी सरळ आहे. या योजनेसाठी एसबीआयच्या कोणत्याही शाखेत अर्ज सादर करता येईल.

या योजनेसाठी अर्ज सादर करताना, कोणत्याही उद्योगात संबंधित महिलेची कमीत कमी 50 टक्के तरी मालकी असणे आवश्यक आहे. उद्योग आणि संबंधित कागदपत्रे महिलेच्या नावे नसतील तर तीला योजनेचा लाभ मिळणार नाही.

दोन लाखांपर्यंत व्याजदरात 0.5% टक्के सवलत मिळेल. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी नोंदणीकृत कंपन्यांना 50 हजारांपासून 25 लाखांपर्यंत कर्ज मिळेल. या योजनेसाठी केवळ 5 टक्के व्याजदर असेल.

5 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवण्याची गरज नाही. या योजनेमुळे देशात महिला उद्योजिकांची संख्या वाढत आहे. ही योजना केवळ महिलांसाठी आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, तसेच उद्योगसंबंधीची सर्व आवश्यक कागदपत्रे द्यावी लागतील.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.