Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 तास काम, कार्यालयातच केला आराम, एलअँडटी कंपनीचे चेअरमन पण उतरले वादात

Working Hours | तरुणाईने देश उभारणीसाठी आठवड्याला 70 तास तरी काम करावे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी दिला. त्यावर देशात सध्या वाद-प्रतिवाद झडत आहे. प्रत्येक उद्योजक त्यावर प्रतिक्रिया देत आहे. आता एलअँडटी कंपनीचे चेअरमन ए. एम. नाईक यांनी पण या वादात उडी घेतली आहे.

15 तास काम, कार्यालयातच केला आराम, एलअँडटी कंपनीचे चेअरमन पण उतरले वादात
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 9:55 AM

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : राष्ट्र उभारणीसाठी आणि चीनला मागे टाकण्यासाठी तरुणांनी आठवड्यात किमान 70 तास काम करायला हवे, असा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिला होता. त्यावरुन देशात मोठे वादंग उठले होते. ही भांडवलशाही मानसिकता असल्याचा ठपका अनेकांनी ठेवला होता. तरुणाईने यांच्यासाठी राबायचे आणि ‘रविवाराचा बाबा’ व्हायचे, अशी खिल्ली पण अनेकांनी केली. अनेक उद्योजकांनी, मानसतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी मूर्ती यांच्या सल्ल्याला विरोध केला. आता लार्सन अँड टूब्रोचे चेअरमन यांनी त्यांच्या कामाचा अनुभव कथन करत या वादात उडी घेतली आहे. काय म्हणाले ए. एम. नाईक?

15 तास केले काम

शुक्रवारी एका कार्यक्रमात एलअँडटीचे चेअरमन ए एम नाईक यांनी विचार मांडले. त्यांनी त्यांची संघर्षगाथा उलगडली. ऑफिसमध्येच ठाण मांडल्याचे त्यांनी सांगितले. 15 तास काम केल्यावर कार्यालयातील टेबलवर झोपण्याचा किस्सा त्यांनी सांगितला. पाच दशकापूर्वी एलअँडटीला या क्षेत्रातील दादा कंपनी करण्यासाठी त्यांनी कशी मेहनत घेतली. किती तास काम केले याविषयीची माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

वादादरम्यान वक्तव्य चर्चेत

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणाईला आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर देशभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. तरुणाईने त्यांचा सल्ला झिडकारला. हा चुकीचा पायंडा असल्याचे सांगितले. तर कार्यसंस्कृतीवर अनेकांनी उलट सल्ले दिले. कार्यसंस्कृती जितकी आरोग्यदायी असेल तितके अधिक काम चांगले होत असल्याची टिप्पणी पण अनेकांनी केली. तसेच कामगारांची पिळवणूक करण्याची ही मानसिकता असल्याचा आरोप ही अनेकांनी लावला.

काय सांगितला अनुभव

उमेदीच्या काळात नवतंत्रज्ञान शिकायला मिळावे अशी इच्छा होती. त्यासाठी एलअँडटीमध्ये मेहनत केली. सकाळच्या बैठकीसाठी रात्रभर प्रवास केल्याची आठवण त्यांनी सांगितली. 2017 मध्ये नाईक यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सोडला असला तरी कंपनीचे कामकाज ते पाहतात. सर्वांच्या मेहनतीमुळे एलअँडटी 4 हजार कोटी रुपये भांडवलावरुन 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मार्केट कॅप असलेली कंपनी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यावरुन आता या वादाला फोडणी मिळाली आहे. तरुणाई सध्या अशा सल्ल्यावर तुटून पडल्याचे दिसत आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.