L & T : या कंपनीत 670 रुपयांवर केली नोकरी, तिचेच झाले मालक, नंतर दान केली सर्व संपत्ती
L & T : लार्सन ॲंड टुब्रो (L&T) हे नाव सर्वांनाच माहिती आहे. अनेक जणांच्या करिअरची सुरुवात, इंटर्नशिप याच कंपनीतून झाली आहे. अनेक एमआयडीसीमधील छोट्या-छोट्या उद्योजकांना एलॲंडटीचा यशसागर प्रेरणा देत आहे.
नवी दिल्ली : लार्सन ॲंड टुब्रो (L&T) हे नाव सर्वांनाच माहिती आहे. अनेक जणांच्या करिअरची सुरुवात, इंटर्नशिप याच कंपनीतून झाली आहे. अनेक एमआयडीसीमधील (MIDC) छोट्या-छोट्या उद्योजकांना एलॲंडटीचा यशसागर प्रेरणा देत आहे. पण या कंपनीला खरी ओळख देण्यात एका व्यक्तीने अपार कष्ट उपसले आहे. त्यांनी याच कंपनीत अवघ्या 670 रुपयांवर नोकरी केली. त्यानंतर सीईओ (CEO) पदापर्यंत मजल मारली. एलॲंडटीला यशाच्या शिखरावर पोहचवले. खूप संपत्ती कमावली आणि वयाच्या एका टप्प्यावर येताच त्यांनी सर्व संपत्ती दान केली.
ए. एम. नाईक लार्सन ॲंड टुब्रोचे (L&T) नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन अनिल मणिभाई नाईक यांनी पदावरुन बाजूला होण्याचा निर्णय घेतला आहे. ए. एम. नाईक यांनी 30 सप्टेंर 2023 रोजी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 58 वर्षांपर्यंत त्यांनी L&T ची कमान संभाळली. आता या सर्व व्यापातून ते मुक्त होणार आहेत. कधी काळी याच कंपनीने त्यांना नोकरीसाठी नकार दिला होता. पण त्यांनी चिकाटीने नोकरी मिळवली.
670 रुपये वेतन मध्यमवर्गीय कुटुंबातून नाईक आले होते. वडील आणि आजोबा शिक्षक होते. गुजरातमधील एका शाळेत ते शिकवत होते. नाईक यांचे सुरुवातीचे शिक्षण गावातच झाले. त्यानंतर बिर्ला विश्वकर्मा महाविद्यालयात त्यांनी पदवी घेतली. नोकरीसाठी त्यांनी लार्सन ॲंड टुब्रोमध्ये (L&T) अर्ज केला. त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. कारण त्यावेळी कंपनी IIT विद्यार्थ्यांना प्राधान्य देत होती.
नंतर मिळाली नोकरी ET Panache ला त्यांनी 2018 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी Larsen & Toubro (L&T) चा हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी नेस्टर बॉयलर्समध्ये नोकरी सुरु केली. एलॲंडटीमध्ये संधी असल्याचे त्यांना कळाले. त्यांनी यावेळी कसून तयारी केली. पण इंग्रजीने गाडं आडवलं. पण तरीही कमी पगारावर कनिष्ठ अभियंता पदावर रुजू करण्यात आले. 15 मार्च 1965 मध्ये ते एलॲंडटीमध्ये दाखल झाले.
आणि झाले बॉस अवघ्या 670 रुपये प्रति महिन्यावर ते रुजू झाले. इतरांना जोरदार पगार होता. नाईक यांना वाटत होते की ते बहुधा 1000 रुपये पगारावरच निवृत्त होईतल. पण नशिबाने त्यांना साथ दिली. एकाच वर्षांत त्यांचा पगार 950 रुपये झाला. कामगार संघटनांशी करारानंतर कंपनीने पगारात आणखी 75 रुपयांची भर टाकली आणि त्यांचा पगार 1025 रुपये झाला आणि पदोन्नतीने ते सहायक अभियंता झाले.
सीईओ झाले 1965 मध्ये ज्या कंपनीते ते 670 रुपये महिन्यावर रुजू झाले. 1999 मध्ये मेहनतीच्या जोरावर ते कंपनीच्या सीईओपदी पोहचले. जुलै 2017 मध्ये L&T समूहाचे चेअरमन झाले. कामातून त्यांनी ही संधी खेचून आणली. त्यांच्या नेतृत्वात कंपनी यशाच्या शिखरावर पोहचली. 2023 मध्ये कंपनीची एकूण संपत्ती 41 अब्ज डॉलर होती. कंपनीने त्यांच्या नेतृत्वात संरक्षण, आयटी, रिअल इस्टेट आणि इतर अनेक क्षेत्रात दबदबा तयार केला. आज L&T समूहाला त्या क्षेत्रातून महसूल मिळतो, जो नाईक यांनी सुरु केला होता.
संपत्ती केली दान नाईक यांची एकूण संपत्ती 400 कोटी रुपये आहे. त्यांनी 2016 मध्ये यातील 75 टक्के संपत्ती दान केली. त्यांचा मुलगा-सून अमेरिकेत स्थायिक आहे तर मुलगी आणि जावाई पण अमेरिकेतच राहतात. मुलांना परदेशात पाठविणे ही आपली चूक असल्याचे नाईक यांना वाटते. 2022 मध्ये त्यांनी 142 कोटींची संपत्ती दान केली होती. शाळा, रुग्णालयांना ही संपत्ती जाते. आता उर्वरीत संपत्ती पण त्यांनी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.