नवी दिल्ली | 30 सप्टेंबर 2023 : क्रिकेटचा कुंभमेळा (World Cop 2023 ) सुरु व्हायला आता एक आठवड्यापेक्षा पण कमी कालावधी उरला आहे. अशात भारतीय कंपन्यांच्या कार्यालयात पण या उत्सवाची सुरुवात झाली आहे. अनेक कार्यालये क्रिकेटमय होणार आहे. कंपन्यांना हा इव्हेंट इनकॅश करायचा आहे. त्यांना कार्यालयातील वातावरण हलकं फुलकं ठेवायचे आहे. कर्मचाऱ्यांची आवड जोपासत, त्यांना कामं करुन घ्यायचं आहे. त्यासाठी काही कंपन्यांनी ऑफिस (Cricket Fever) सजवायला सुरुवात केली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी ऑफर्स सुरु केल्या आहेत. क्रिकेटमय वातावरणासाठी स्पर्धांसह बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना क्रिकेट सामन्यांचे मोफत तिकीट (Free Tickets Of Cricket Matches) देणार आहेत. आहेत की नाही हे कर्मचारी लकी?
काय आहे कंपन्यांचा प्लॅन
ईटीच्या वृत्तानुसार, कंपन्या कार्यालयात सौहार्दपूर्ण, उत्साही आणि उत्सवी वातावरण ठेवू इच्छित आहे. क्रिकेटविषयीचे प्रेम, पॉझिटिव्ह वर्क कल्चर वाढविण्यासाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे. स्टार्टअप द स्लीप ही कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये फिटनेस जागरुकता आणणार आहे. तसेच टीम भावना वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुंबईत होणाऱ्या क्रिकेट सामान्यांचे मोफत तिकीट पण देणार आहे. एडटेक स्टार्टअप फिजिक्सवाला, नवी दिल्लीतील भारत-अफगाणिस्तान सामान्यांसाठी कर्मचाऱ्यांना पास देण्याची व्यवस्था करत आहे.
प्रश्नमंजूषा, जिंका बक्षिसे
तर डेटा एनालिटिक्स फर्म TheMathCompany मध्ये क्रिकेट चाहत्यांसाठी एक खास प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे. द सिली पाईंट या नावाने त्यांनी ग्रुप तयार केला आहे. यामध्ये लाईव्ह चर्चा करण्यात येईल. कर्मचाऱ्यांसाठी प्रश्नमंजूषा आयोजीत करण्यात येईल. काही कंपन्या प्रश्नमंजुषेत जिंकणाऱ्यांसाठी बक्षिस पण देणार आहेत. गोदरेज अँड बॉयस तर सिंपल ही पेमेंट सेवा पुरवठादार कंपनी कर्मचाऱ्यांना भारतीय टीमचा ज्या दिवशी सामना असेल त्यादिवशी टीम इंडियाची जर्सी देणार आहे.
अनेकांची तयारी
अनेकांनी वर्ल्डकपचा थरार अनुभवायचा आहे. त्यासाठी पूर्व तयारी करुन ठेवली आहे. सर्वाधिक उत्सुकता अर्थातच पाकिस्तान-भारत सामन्याची आहे. यादिवशी अनेकांनी सुट्टी मंजूर करुन घेतली आहे. तर काही कर्मचारी बुट्टी मारतील. काहींनी सामन्यांची तिकीटं बूक केली आहे तर काहींनी हॉटेल्सचे बुकिंग करुन ठेवले आहे. हा सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येकाने अगोदरच नियोजन करुन ठेवले आहे.