World Market : जगाचा केंद्रबिंदू बदलणार! भारत ठरणार सर्वात मोठी बाजारपेठ

World Market : देशात सध्या शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. काही मेगा सिटींचे नियोजन करण्यात येत आहे. तर काही मोठ्या शहरांचा कायापालट करण्यात येत आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यामुळे रिटेल स्टोअर्सपासून ते गल्लीबोळातील दुकानांमध्ये ग्राहकांचा राबता आहे.

World Market : जगाचा केंद्रबिंदू बदलणार! भारत ठरणार सर्वात मोठी बाजारपेठ
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 8:46 AM

नवी दिल्ली | 8 सप्टेंबर 2023 : येत्या चार वर्षांत जगात भारताचा दबदबा दिसू शकतो. चीनची आर्थिक नाडी नाजूक आहे. अनेक दिग्गज कंपन्यांनी चीनला रामराम ठोकण्याची तयारी सुरु केली आहे. या कंपन्या मलेशिया, इंडोनेशियाच नाहीतर भारतात पण प्रकल्प उभारत आहेत. भारत ही त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची बाजारपेठ आहे. अमेरिका, चीननंतर येत्या काही दिवसांत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ ठरणार आहे. जगाचा केंद्रबिंदू चीनकडून भारताकडे हालत आहे. BMI च्या एका अहवालानुसार, मध्यमवर्गाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. भारतात महागाई दर घसरला तर हा वर्ग खर्च करेल. त्यासाठी केंद्र सरकारला प्रयत्न करावे लागतील. नव मध्यमवर्ग उदयाला येत आहे. त्यामुळे भारत 2027 पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ (3rd biggest consumer country of India) असेल.

सध्या भारताचा क्रमांक कितवा

ग्राहक बाजारपेठेत भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. फिच सोल्यूशन्स कंपनीचा अंदाज आहे की, रिअल हाऊसहोल्ड स्पेडिंगमध्ये 29 टक्के वाढ झाल्याने भारत दोन क्रमांक अजून उसळी घेईल. भारताची बाजारपेठ मजबूत होईल. मध्यमवर्गाची क्रयशक्ती वाढेल. हा वर्ग महागाईवर मात करेल. महागाई कमी करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश आले तर भारत लवकर केंद्रस्थानी येईल. पण त्यासाठी केंद्र सरकारला विशेष प्रयत्न आणि सुधारणा करण्याची गरज असेल.

हे सुद्धा वाचा

या अर्थव्यवस्थांना गती

या अहवालानुसार, केवळ भारतातच सुधारणांचे वारे वाहत आहेत असं नाही. तर चीनला शह देण्यासाठी आशियातील इतर देशांनी पण चंग बांधला आहे. परदेशी कंपन्यांना पायघड्या घालण्यात येत आहे. आर्थिक स्तरावर मोठे बदल सुरु आहे. यामध्ये इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि थायलंड या देशांचा समावेश आहे. मलेशियाने पण मोठी झेप घेतली आहे.

भारत सध्या अग्रेसर

पूर्वेतील या देशांपेक्षा अर्थातच भारत ही मोठी बाजारपेठ आणि अर्थव्यवस्था म्हणून झपाट्याने पुढे येत आहे. या चारही देशांपेक्षा भारतातील प्रति व्यक्ती हाऊसहोल्ड स्पेडिंग, म्हणजे क्रयशक्ती वार्षिक आधारावर 7.8 टक्के अधिक आहे. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन्स नेशन्स (ASEAN) आणि भारत यांच्यातील ही तफावत तिप्पट वाढली आहे.

तरुण वर्गावर भिस्त

  • बीएमआयच्या रिपोर्टनुसार, भारताची क्रयशक्ती म्हणजे किरकोळसह मोठ्या वस्तू खरेदीची ताकद 3 ट्रिलियन डॉलरपेक्षा अधिक होईल. तर खरेदी शक्ती वार्षिक आधारावर 14.6 टक्क्यांनी वाढेल. 2027 पर्यंत 25.8 टक्के भारतीय कुटुंबाची वार्षिक खर्च करण्याची कुवत 10,000 डॉलरपर्यंत होईल. हा मोठा बदल घडून येईल.
  • यामध्ये तरुण वर्ग, 20 ते 33 वयोगटाची भूमिका महत्वाची ठरेल. ते या घडामोडीच्या केंद्रस्थानी असतील. त्यांच्यामुळे भारत तिसरी महासत्ता होईल. यामुळे भारतात रोजगाराची अधिक संधी उपलब्ध होईल. नवीन स्टार्टअप्स, युनिकॉर्न, कंपन्यांना, लघूउद्योगांना, गृहउद्योगांना चालना मिळेल. एक मजबूत इकोसिस्टिम उभी राहिल.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.