Year Ender 2024 : संकटांची मालिका तरीही शेअर बाजार पावला; गुंतवणूकदारांची कमाईच कमाई

Share Market : जागतिक घडामोडी, अनेक संकटं, परदेशी गुंतवणूकदारांचा स्विंग मूड अशा अनेक संकटांवर मात करत भारतीय शेअर बाजाराने अनेक अचके, धक्के पचवत गुंतवणूकदारांना वर्षभरात कमाई करून दिली. गेल्या 9 वर्षांतील कमाईचा आलेख यंदाही उंचावत ठेवला.

Year Ender 2024 : संकटांची मालिका तरीही शेअर बाजार पावला; गुंतवणूकदारांची कमाईच कमाई
शेअर बाजाराची भरारी, गुंतवणूकदारांची कमाईच कमाई
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 10:11 AM

आता वर्ष संपायला उणेपुरे चार दिवस उरले आहेत. 2024 वर्ष संपून 2025 या नवीन वर्षाची सुरूवात होणार आहे. यंदा भारतीय शेअर बाजाराने अनेक आव्हानं पेलवली. जागतिक घडामोडी, अनेक संकटं, परदेशी गुंतवणूकदारांचा स्विंग मूड अशा अनेक संकटांवर मात करत भारतीय शेअर बाजाराने अनेक अचके, धक्के पचवत गुंतवणूकदारांना वर्षभरात कमाई करून दिली. गेल्या 9 वर्षांतील कमाईचा आलेख यंदाही उंचावत ठेवला. निफ्टीसह सेन्सेक्सने गुंतवणूकदारांना झटका दिला असला तरी निराश केले नाही. इतकेच नाही तर आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढून भरारीचा नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.

कोसळधार ते नवीन उच्चांक

गेल्या काही महिन्यात शेअर बाजारात मोठी उलथापालथ दिसली. सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण दिसली. तर याच वर्षात शेअर बाजाराने नवीन विक्रमाला गवसणी सुद्धा घातली. ANI मध्ये स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या एका अहवालाआधारे एक वृत्त दिले आहे. त्यानुसार, बाजारात कोसळधार असली तरी त्याने उच्चांकाला गवसणी सुद्धा घातली आहे. हे सलग 9 वे वर्ष आहे जेव्हा Sensex-Nifty ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे.

हे सुद्धा वाचा

यावर्षाच्या सुरुवातीला दमदार कमाई

या वृत्तानुसार, भारतीय अर्थव्यवस्थेतील लवचिकता आणि आर्थिक बाजाराच्या जोरदार, चमकदार कामगिरीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार फायद्यात राहिले. या वर्षाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यात जोरदार आर्थिक घौडदौड, कॉर्पोरेट विश्वातील दमदार कामगिरी, बाँड मार्केटमधील आगेकूच यामुळे सुरूवात जोरदार होती. तर नंतरच्या सहा महिन्यात बाजारात अस्थिरता दिसली. सप्टेंबर महिन्यात महागाईने डोके वर काढले. भू-राजकीय स्थिती, भारतीय शेअर बाजारापासून परदेशी गुंतवणूकदारांनी चार हात लांब धोरण राबवल्याचा परिणाम दिसून आला. बाजार कोसळला. त्याने पुन्हा उभारी घेतली.

सेन्सेक्स-निफ्टीचा जोरदार परतावा

अनेक आव्हानाचा सामना करत भारतीय शेअर बाजाराने चमकदार कामगिरी केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या 50 शेअर असणाऱ्या निफ्टी-50 इंडेक्समध्ये यंदा 9.21 टक्क्यांची वृद्धी दिसून आली. तर दुसरीकडे BSE च्या 30 शेअरच्या सेन्सेक्स निर्देशांकाने 8.62 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.