Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender | कामत बंधुपासून ते फाल्गुनी नायर; या स्टार्टअप्सने गाजवले वर्षे, खोऱ्याने ओढला पैसा

Year Ender | स्टार्टअप्सने भारतीय अर्थव्यवस्थेला आणि तरुणाईला एक आत्मविश्वास दिला. स्टार्टअप्समध्ये भारताने जगातील अनेक देशांना मात दिली. युरोपातील अनेक देश तर कधीचेच पिछाडीवर गेले. भारताने स्टार्टअप्समध्ये तिसरे स्थान पटकावले. या स्टार्टअप्सने या वर्षात जोरदार कामगिरी बजावली. कमाईत झेंडे गाडले.

Year Ender | कामत बंधुपासून ते फाल्गुनी नायर; या स्टार्टअप्सने गाजवले वर्षे, खोऱ्याने ओढला पैसा
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:10 PM

नवी दिल्ली | 17 डिसेंबर 2023 : भारतात गेल्या काही वर्षांपासून स्टार्टअप्स इकोसिस्टिम विकसीत झाली आहे. केंद्र सरकारने विविध सवलती आणि पाठबळ दिल्याने अनेक कंपन्या बाजारात आल्या. कोरोना काळापासून तर स्टार्टअप्सचे पिकच आले आहे. स्टार्टअप्सचे बुमिंग आहे. अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आणि त्यांचे मार्केट कॅप पण वाढले. आता या वर्षाकाठी, 2023 मध्ये या कंपन्यांनी त्यांचा घौडदौडीचा आलेख सर्वांसमोर मांडला आहे. आर्थिक ताळेबंद समोर आणला आहे. या स्टार्टअप्सच्या संस्थापकांचा पगार आपल्या कल्पनेपलिकडे आहे. या स्टार्टअप्सची कमाई कोटी आणि अब्जांच्या वर्गवारी पुढे गेली आहेत. अनेक स्टार्टअप्स आता युनिकॉर्न उद्योग झाले आहेत. कित्येक हजार अब्जाची ही इंडस्ट्री भारताची दमदार ओळख ठरली आहे.

टॉप -3 मध्ये कोण?

नितीन आणि निखील कामत या स्टार्टअपमध्ये सर्वाधिक कमाईचा मान नितीन आणि निखील कामत यांच्या शिरपेचात खोवला गेला. झिरोधा हे ब्रोकिंग एप तुम्ही वापरत असालच. त्याचे हे दोन्ही बंधू संस्थापक आहेत. त्यांची वार्षिक कमाई जवळपास 200 कोटींच्या घरात आहे. दोघे बंधू प्रत्येकी 72 लाखांचा पगार घेतात. तर नितीन कामतची पत्नी आणि संचालक सीमा पाटील हिचे वार्षिक पॅकेज 36 कोटी रुपये आहे. रितेश अग्रवाल OYO या स्टार्टअपचा मालक रितेश अग्रवाल हा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याची वार्षिक कमाई 12 कोटी रुपये आहे. तिसऱ्य स्थानावर नायकाची संस्थापक फाल्गुनी नायर ही आहे. ती भारतातील श्रीमंत महिला आहे. तिचा वार्षिक पगार जवळपास 2 कोटींच्या घरात आहे.

हे सुद्धा वाचा

29,000 कर्मचाऱ्यांची बोळवण

अनेक स्टार्टअप्स त्यांच्या सीईओंना कोट्यवधींचा पगार देतात. यामध्ये HealthifyMe, Lenskart, Noise आणि MamaEarth यांचा समावेश आहे. अनेक स्टार्टअप्सचे सीईओ अवघ्या 42 व्या वर्षी कोट्यवधींचे पॅकेज घेत असल्याचे समोर आले आहे. या स्टार्टअप्सला केंद्र सरकारचे बळ मिळाल्याने, त्यांच्यासाठी इकोसिस्टिम विकसीत झाल्याने त्यांनी उंच भरारी घेतली. या स्टार्टअप्सला परदेशातील फंडिंग पण मिळाली. त्यातील काही स्टार्टअप्सने तर युनिकॉर्नचा दर्जा मिळवला. काही स्टार्टअप्सच्या पडझडीच्या बातम्या अजूनही सुरुच आहे. शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गज स्टार्टअप्सला ओहोटी लागली आहे. काही कारनामे त्यांच्या अंगलट आले आहे. या आर्थिक वर्षात 29,000 कर्मचाऱ्यांची या स्टार्टअप्सने बोळवण केली आहे. तर काही स्टार्टअप्सला घरघर लागली आहे.

सर्वाधिक कमाई करणारे संस्थापक

  • निखील आणि नितीन कामत (झिरोधा) – 72 कोटी
  • रितेश अग्रवाल ( OYO) – 12 कोटी
  • दिपक सिंग अहवाट (GamesKraft) – 10.1 कोटी
  • मनिष तनेजा आणि राहुल दश (Purplle) – 6.75 कोटी
  • विजय शेखर शर्मा (Paytm) – 4 कोटी
  • साहिल बरुआ आणि कपिल भारती (RateGain) – 3.1 कोटी
  • मिथुन सचेती (CaratLane) – 2.62 कोटी
  • अमन गुप्ता आणि समीर मेहता (boAT) – 2.5 कोटी
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक
VIDEO : शेतकऱ्याचा स्वॅगच भारी, मुलाच्या लग्नात हेलिकॉप्टरनं मिरवणूक.
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं...
'हिंदी'सक्तीवरून राज्यभरात मनसैनिक आक्रमक, कुठं GR फाडला तर कुठं....
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं
'टन टन टोल' म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं.
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका
हे कायद्याचं राज्य, कुणाच्या बापाची..., सदावर्तेंची राज ठाकरेंवर टीका.
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन
ससूनचा रिपोर्ट मॅनेज? भिसे कुटुबावरच खापर? 'दीनानाथ'च्या दिरंगाईवर मौन.
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल
'दोन दिवसांत सगळं बाहेर काढू', राज्याच्या गृहखात्यावर कडूंचा हल्लाबोल.
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल
डॉ. घैसास यांना क्लीनचीट दिली त्यात नवल काय? अंधारेंचा उपरोधक सवाल.
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?
'ससून'च्या अहवालातील निष्कर्ष काय? 'दीनानाथ'वर कारवाई होणार?.
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक
'लबाडांनो पाणी द्या', संभाजीनगरात पाणी प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक.
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?
2-3 टकले सोडले तर हे सरकार.., राणेंचा रोख दादांकडे? नेमकं काय म्हणाले?.