Year End | गुंतवणूकदारांचे चमकले नशीब, सूसाट धावले हे मिड कॅप फंड

Year End | या सरत्या वर्षात म्युच्युअल फंड हाऊसने पण कमाल दाखवली. मिड कॅप श्रेणीतील सर्व 29 म्युच्युअल फंडने 2023 मध्ये दमदार कामगिरी केली. केवळ तीन मिड कॅप फंड गुंतवणूकदारांच्या अपेक्षेवर उतरु शकले नाही. सर्व म्युच्युअल फंडने ईअर टू डेट रिटर्न 30-30 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे.

Year End | गुंतवणूकदारांचे चमकले नशीब, सूसाट धावले हे मिड कॅप फंड
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली | 16 डिसेंबर 2023 : शेअर बाजारातील तेजीचे सत्र या वर्षात म्युच्युअल फंडासाठी पण लाभदायक ठरले. जवळपास प्रत्येक क्षेत्रातील म्युच्युअल फंडाने यावर्षात जोरदार कामगिरी बजावली. गुंतवणूकदारांना बेंचमार्कपेक्षा अधिकचा परतावा दिला. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील गुंतवणुकीपेक्षा कमी जोखमीचे असते. या वर्षात अनेक म्युच्युअल फंडने ईअर टू डेट रिटर्न 30-30 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा परतावा मिळाला.

या फंडने दिला जवळपास 50 टक्के रिटर्न

ईअर टू डेट म्हणजे 2023 मधील सुरुवातीपासून ते आतापर्यंत काही मिड कॅप म्युच्युअल फंडने दमदार कामगिरी केली. GM Mid Cap Fund ने उंच झेप घेतली. या फंडने गुंतवणूकदारांना जवळपास 48 टक्के रिटर्न दिला. टॉप-10 मधील काही मिडकॅप फंडने या वर्षभरात गुंतवणूकदारांना जवळपास 40 टक्के परतावा दिला. बेंचमार्क पेक्षा हा कामगिरी अत्यंत दमदार आहे.

हे सुद्धा वाचा

सेन्सेक्स-निफ्टीपेक्षा दुप्पटीहून अधिकचा परतावा

BSE Sensex शुक्रवारी 15 डिसेंबर रोजी बाजार बंद झाल्यानंतर यावर्षी आतापर्यंत 16.87 टक्के नफ्यात आहे. निर्देशांकाने यंदा आतापर्यंत 10 हजार अंकांहून अधिकची तेजी नोंदवली. तर NSE Nifty 50 ने या वर्षाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 17.91 टक्क्यांचा परतावा दिला. त्याआधारे टॉप-10 मिड कॅप फंडांनी आतापर्यंत दुप्पटीहून अधिकचा परतावा दिला.

केवळ 3 फंडाचा रिटर्न 30 टक्क्यांपेक्षा कमी

सध्या बाजारात मिड कॅप कॅटेगिरीतील 29 म्युच्युअल फंड स्कीम उपलब्ध आहेत. यामध्ये सर्वात वाईट कामगिरी पीजीआईएम इंडिया मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंडची राहिली. पण हा फंड बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टीपेक्षा चांगला राहिला. या फंडने यावर्षीत 21.64 टक्क्यांचा रिटर्न दिला. याशिवाय एक्सिस मिड कॅप फंड आणि युटीआय मिड कॅप फंड यांना दमदार कामगिरी करता आली नाही. या वर्षभरात अनुक्रमे त्यांची कामगिरी 28.60 टक्के आणि 29.61 टक्के आहे. या तीन फंडनी गुंतवणूकदारांना मोठा परतावा देण्यात खच खाल्ली. त्यांना 30 टक्क्यांच्या आताच दम लागला.

या वर्षातील 10 सर्वात दमदार मिड कॅप फंड

  • जेएम मिड कॅप फंड : 47.42%
  • निप्पॉन इंडिया ग्रोथ फंड : 46.89%
  • महिंद्रा मॅनुलाईफ मिड कॅप फंड: 46.04%
  • एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्यूनिटी फंड : 44.01%
  • व्हाईट ओक कॅपिटल मिड कॅप फंड : 43.57%
  • मोतीलाल ओसवाल मिड कॅप फंड : 42.31%
  • आयसीआयसीआय प्रुडेंशियल मिड कॅप 150 इंडेक्स फंड : 41.59%
  • आयटीआय मिड कॅप फंड : 41.45%
  • टाटा मिड कॅप ग्रोथ फंड : 40.76%
  • सुंदरम मिड कॅप फंड : 40.06%
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.