‘येस बँक’ निर्बंधमुक्त, 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा

सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात 'येस बँके'ने आश्वस्त केलं. Yes Bank resume banking

'येस बँक' निर्बंधमुक्त, 50 हजारांवरील रक्कम काढण्यास मुभा
Follow us
| Updated on: Mar 18, 2020 | 7:50 AM

मुंबई : ‘येस बँके’च्या खातेधारकांवरील निर्बंध आजपासून हटवण्यात येणार आहेत. संध्याकाळी सहा वाजल्यापासून ‘येस बँक’ संपूर्ण बँकिंग सेवा पुन्हा सुरु करणार आहे. त्यामुळे खातेधारकांना 50 हजार रुपयांवरील रक्कमही काढता येणार आहे. (Yes Bank resume banking)

पाच मार्च रोजी ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने (आरबीआय) येस बँकेवर निर्बंध आणत 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढण्यास मज्जाव केला होता.

आतापर्यंत केवळ एक तृतीयांश ग्राहकांनी 50 हजार रुपये काढले आहेत. ‘येस बँके’च्या सर्व सेवा बुधवारी सुरु होतील, अशी माहिती बँकेने पत्रकार परिषद घेऊन दिली. सर्व एटीएममध्ये पुरेशी रोकड असून ग्राहकांना घाबरुन जाण्याची गरज नाही, अशा शब्दात ‘येस बँके’ने आश्वस्त केलं.

एसबीआय पुढील तीन वर्षापर्यंत बँकेचा एकही हिस्सा विकणार नाही. एनईएफटी (NEFT), आरटीजीएस (RTGS), आयएमपीएस (IMPS) या सेवा बुधवारपासून सुरु होणार आहेत. आठ बँकांची गुंतवणूक या येस बँकेची ताकद दाखवते, असं ‘एसबीआय’चे अध्यक्ष रजनीश कुमार म्हणाले. (Yes Bank resume banking)

एसबीआय व्यतिरिक्त इतर बँकांनी येस बँकेत 10,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. बुधवारी संध्याकाळी सर्व प्रकारच्या स्थगिती बँकेकडून हटवल्या जातील, असं ‘येस बँके’च्या नव्याने स्थापन झालेल्या मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले.

आपण देशभरातील आमच्या 1,132 शाखांमध्ये कुठेही जाऊन 19 मार्चपासून बँकिंग व्यवहार करु शकता, असंही बँकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं.

आर्थिक संकटात सापडल्यामुळे येस बँकेला रिझर्व्ह बँकेने 30 दिवसांची तात्पुरती स्थगिती दिली होती. 3 एप्रिलपर्यंत ग्राहकांना 50 हजारापर्यंत रक्कम काढण्याची मुभा होती

काय होते निर्बंध?

कुठल्याही खातेधारकाला बचत, चालू किंवा इतर कुठल्याही खात्यातून 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्याची परवानगी नव्हती. जरी  बँकेत एका खातेधारकाची एकापेक्षा जास्त खाती असली, तरी बँकेतून एकूण 50 हजाराची रक्कमच काढू शकता, अशी माहिती आरबीआयकडून जारी करण्यात आली होती. (Yes Bank resume banking)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.