Twitter Blue Tick : खुशखबर, छदाम ही न देता ब्लू टिक आली की परत! या युझर्सला ट्विटरने दिले खास गिफ्ट

Twitter Blue Tick : एलॉन मस्कने पुन्हा एकदा सर्वांनाच धक्का दिला. ब्लू टिकसाठी पैसे मोजा, असा सांगणाऱ्या ट्विटरने या युझर्सला ब्लू टिक छदाम ही न घेता परत केले आहे. पण हा चमत्कार झाला कशाने?

Twitter Blue Tick : खुशखबर, छदाम ही न देता ब्लू टिक आली की परत! या युझर्सला ट्विटरने दिले खास गिफ्ट
आलं की गिफ्ट!
Follow us
| Updated on: Apr 23, 2023 | 5:35 PM

नवी दिल्ली : आजची सकाळ, रविवारची सकाळ अनेक युझर्ससाठी हैराण करणारी होती. ट्विटरने (Twitter) जगभरातील युझर्सकडून पैसा वसुलीसाठी त्यांचे ब्लू टिक (Blue Tick) काढून घेतले, त्याला आता आठवडा उलटला. या नवीन धोरणांचा जवळपास सर्वांनाच फटका बसला. पण 23 एप्रिल रोजी त्यातील काही युझर्सचे ब्लू टिक ट्विटरने पुन्हा बहाल केले, तेही कोणताही मोबदला न घेता. या युझर्सने त्यासाठी सब्सक्रिप्शन (Subscription) घेतले नव्हते की एलॉन मस्क महाशयांना कसली ही विनंती पण केली नव्हती. पण हा चमत्कार झाला. ट्विटरने छदाम ही न घेता ब्लू टिक परत केली.

कोणाला दिले हे गिफ्ट ट्विटरने त्यांच्या नियमाला मुरड घातली. त्यांनी काही पुढारी, मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटी आणि खेळाडूंना त्यांचे ब्लू टिक परत केले. हा जागतिक स्तरावरील मोठी माणसं आहेत. या नावाजलेल्या व्यक्तींना ब्लू टिक परत करण्यात आली. त्यांच्याकडून त्यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात आले नाही. गेल्या आठवड्यात त्यांचे ब्लू टिक काढण्यात आले होते.

ही अट ठेवली कायम या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मने जगातील नावाजलेल्या व्यक्तींना त्यांचे ब्लू टिक परत केले. पण त्यासाठी एक अट कायम केली. ज्या सेलिब्रिटींचे 1 मिलियन म्हणजे 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. त्यांना ब्लू टिक परत करण्यात आली. त्यांच्या अकाऊंटला ही ब्लू स्टिक री-स्टोअर करण्यात आली. त्यासाठी या सेलिब्रिटींच्या खिशाला कोणतीही झळ बसलेली नाही.

हे सुद्धा वाचा

या भारतीयांना मिळाले परत ब्लू स्टिक रविवारी, सचिन तेंडूलकर, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि महेंद्र सिंह धोनी आणि इतर अनेक सेलिब्रिटींना त्यांच्या ट्विटर खात्यात ब्लू स्टिक परत मिळाले. यामध्ये Kobe Bryant, Chadwick Boseman आणि सुशांत सिंह राजपूत यासारख्या खात्यांना पण 10 लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स असल्याने ब्लू स्टिक परत री स्टोअर करण्यात आली. हे तीनही स्टार सध्या जगात नाहीत.

सब्सक्रिप्शन प्लॅन आहे तरी काय यापूर्वी गुरुवारी ट्विटरने सरकार, सेलिब्रिटी, बिझनेस टायकून, उद्योजक, पुढारी आणि अन्य दिग्गजांच्या खात्यावरुव ब्लू टिक काढली होती. भारतात ट्विटरच्या सब्सक्रिप्शनसाठी दर निश्चित करण्यात आले आहे. वेब प्लॅटफॉर्मसाठी 650 रुपये तर मोबाईलसाठी हे शुल्क 900 रुपये प्रति महिना आहे. सब्सक्रिप्शन शुल्क हे वैयक्तिक ट्विटर खात्यसााठी आहे.

संस्था, ब्रँडसाठी असे आहे शुल्क याशिवाय संस्था, ब्रँडसाठी ट्विटरचे व्हेरिफिकेशन शुल्क आहे. त्यासाठी 82,300 रुपये प्रति महिना सब्सक्रिप्शन शुल्क आकारण्यात येत आहे. या खात्यांना सोनेरी रंगाचं, गोल्डन कलरचं ब्लू स्टिक देण्यात येते. त्याच्याजवळ संस्थेच्या नावाचा एक स्टॅम्प पण असेल. एलॉन मस्क यांनी ऑक्टोबर 2022 मध्ये जवळपास 44 अब्ज डॉलरला ट्विटर खरेदी केले होते.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....