आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय LPG सिलिंडर खरेदी करता येणार, जाणून घ्या प्रोसेस

पूर्वी ज्यांच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ नाही त्यांना घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करता येत नव्हता. परंतु सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

आता अ‍ॅड्रेस प्रूफशिवाय LPG सिलिंडर खरेदी करता येणार, जाणून घ्या प्रोसेस
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 11:06 PM

मुंबई : एलपीजी गॅस सिलिंडर खरेदी करायचा असल्यास आपल्याकडे रहिवासी दाखला (अ‍ॅड्रेस प्रूफ) असणं आवश्यक असतं. ज्यांच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ नाही त्यांना घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करता येत नव्हता. परंतु सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आता ज्याच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ नसेल ती व्यक्तीदेखील घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करु शकते. (You can buy LPG cylinder without address proof; check gas agency rules)

अ‍ॅड्रेस प्रूफविना केवळ 5 किलो वजन असलेला घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करता येईल. ज्यांच्याकडे अ‍ॅड्रेस प्रूफ नाही त्यांना मोठे (पाच किलोपेक्षा अधिक वजन असलेले) घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करता येणार नाहीत. मोठ्या गॅस सिलिंडरसाठी जुने नियमच लागू आहेत. दरम्यान ज्यांच्याकडे कोणतेही अ‍ॅड्रेस प्रूफ नाही, राहण्याची व्यवस्था नसलेले, सातत्याने स्थलांतर करणारे, ज्यांच्याकडे स्वतःचे घर नाही अशा लोकांना या नव्या ऑफरमुळे दिलासा मिळणार आहे.

छोटे गॅस सिलिंडर (पाच किलोपर्यंत वजन असलेले) खरेदी करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे नसते. अनेक दुकानदार असे सिलिंडर भरमसाठ किंमतीत विकतात तसेच रिकामे सिलिंडर मोठ्या किंमतीत भरून देतात. परंतु हे सिलिंडर विश्वासार्ह नसतात. कारण कोणत्याही गॅस कंपनीचा त्यावर शिक्का नसतो. जर तुम्हाला अधिकृत गॅस सिलिंडर खरेदी करायचा असेल तर तुम्ही गॅस एजन्सीमध्ये जायला हवं. पूर्वी गॅस एजन्सीकडून असे सिलिंडर खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे रहिवासी दाखला असणं गरजेजं होतं. परंतु आता त्याची गरज पडणार नाही. त्यामुळे तुम्ही आता थेट गॅस एजन्सीकडून गॅस सिलिंडर खरेदी करायला हवेत.

तुम्ही आता केवळ तुमचं ओळखपत्र दाखवून छोट्या आकाराचे घरगुती गॅस सिलिंडर खरेदी करु शकता. त्यासाठी तुम्हाला रहिवासी दाखल्याची गरज भासणार नाही. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी आता रहिवासी दाखला नसणाऱ्यांनाही घरगुती गॅस सिलिंडर विकत आहे. त्यांच्या गॅस एजन्सी या छोट्या गॅस सिलिंडर्सची डिलीव्हरीदेखील करतात. या पाच किलोपर्यंतच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास हा सिलिंडर सध्या दिल्लीत 257 रुपयांमध्ये विकला जात आहे. इतर शहरांमध्येही जवळपास याच किंमतीत हा गॅस सिलिंडर विकला जात आहे. यामध्ये थोडासा फरक असू शकतो. विद्यार्थी, वसतीगृहात राहणारे, एकटे राहणाऱ्या लोकांसाठी हा सिलिंडर उपयुक्त आहे.

एकदा हा सिलिंडर खरेदी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एजन्सीत जाण्याची आवश्यकता नाही. सिलिंडर संपल्यानंतर रिफिल करण्यासाठी (सिलिंडर पुन्हा भरून आणण्यासाठी) गॅस एजन्सीकडे जाण्याची आवश्यकता नाही. घरी बसून छोटा सिलिंडर बुक करता येईल. इंडेन कंपनीने यासाठी खास नंबर जारी केला आहे. 8454955555 या नंबरवर कॉल करुन तुम्ही गॅस सिलिंडर बुक करु शकता. अगदी व्हॉट्सअॅपद्वारेही हा छोटा सिलिंडर बुक करता येईल. refill असं टाईप करुन 7588888824 या व्हॉट्सअॅप नंबरवर मसेज केल्यास तुमचा सिलिंडर बुक होईल. तसेच 7718955555 या नंबरवर कॉल करुनही सिलिंडर बुक करता येईल.

हेही वाचा

सोन्यात गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ लक्षात ठेवा, अन्यथा तुमच्यावरही पडू शकते इन्कम टॅक्सची धाड

Gold Silver Price Updates : आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीला झळाळी, वाचा आजचे दर…

(You can buy LPG cylinder without address proof; check gas agency rules)

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.