Scheme : म्हणजे चारही बोटं तुपात की! या सरकारी योजनेत गुंतवा रक्कम आणि व्हा मालामाल, कर्जाचीही मिळणार सवलत

Scheme : दिवाळीत खर्च भागविण्यासाठी या योजनेत केलेली गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरु शकते..

Scheme : म्हणजे चारही बोटं तुपात की! या सरकारी योजनेत गुंतवा रक्कम आणि व्हा मालामाल, कर्जाचीही मिळणार सवलत
गुंतवणुकीवर डबल फायदाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 18, 2022 | 3:57 PM

नवी दिल्ली : दिवाळी सणाला (Diwali Festivals) आता अवघा आठवडा उरला आहे. सणावारात खर्च (Expenditure) आवाक्याबाहेर जातो. आनंदासाठी अनेकदा कर्जाचेही (Loan)ओझे उचलावे लागते. त्यासाठी बँकेकडे (Bank) मिन्नतवार करावी लागते. तरीही कमी व्याजदरात कर्ज मिळेलच याची हमी नसते. अशावेळी एक योजना तुमच्या मदतीला धाऊन येऊ शकते. ही योजना कोणती ते पाहुयात..

तर ही योजना आहे, सॉव्हरेन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond). या योजनेत गुंतवणुकीवर गुंतवणूकदार मालामाल तर होतोच, पण त्याला त्याच्या गुंतवणुकीनुसार, 20 हजार ते 20 लाखांपर्यंत कर्ज ही मिळते.

भारतीयाचं सोन्यावरील प्रेम सर्वश्रूत आहे. यामधील गुंतवणूक (Gold Investment) पारंपारिक मानण्यात येते. या योजनेला अनिश्चिततेच्या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येते. ही दीर्घकालीक गुंतवणूक योजना नेहमी फायदेशी ठरते.

हे सुद्धा वाचा

सोने थेट खरेदी करुन जवळ बाळगणे अथवा घरात ठेवणे धोक्याचे ठरते. ते चोरी जाण्याची भीती असते. लॉकरमध्ये ठेवल्यास त्याचे भाडे आणि चोरी जाऊ नये यासाठी विम्याचा खर्च असं सर्व खर्चिक कामं असते. या सर्व खर्चाला सोन्यातील गुंतवणुकीचा बॉंड फाटा देतो.

सरकारी आणि खासगी बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, टपाल खाते, मान्यता प्राप्त एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यासारख्या संस्थांमध्ये तु्म्हाला सुवर्णरोखे खरेदी करता येते.

सोन्यावर जसे कर्ज काढता येते. तसेच सुवर्णरोख्यांवरही गुंतवणूकदाराला कर्ज मिळते. हे कर्जड वैयक्तिक कर्जापेक्षाही स्वस्त मिळते. कर्ज मिळवण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट-अकाऊंट असणे आवश्यक आहे. तसेच सुवर्ण रोख्यात गुंतवणूक करण्यासाठी वयाची 21 वर्षे पूर्ण करणे आवश्यक आहे.

खासगी आणि सरकारी क्षेत्रातील बँका सुवर्णरोख्यांवर गुंतवणुकीनुसार कर्ज देतात. यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया सुवर्णरोख्यांवर 20,000 ते 20 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करुन देते. तर काही खासगी बँका 50 हजार ते 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देतात. गरजेनुसार तुम्हाला दहा हजार रुपयांचे कर्जही मिळते.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.