गरज भासल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर, या परिस्थितीत काढू शकता पीएफ खात्यातून पैसे

आपण पीएफमधून किती रक्कम काढू शकता हे आपल्या पीएफ खात्याच्या स्थितीवर अवलंबून असते. (You can use the retirement fund if needed, in this case you can withdraw money from the PF account)

गरज भासल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर, या परिस्थितीत काढू शकता पीएफ खात्यातून पैसे
गरज असल्यास निवृत्ती निधीचा करु शकता वापर
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 6:37 PM

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ खाते निवृत्तीसाठी सर्वात विश्वसनीय फंडांपैकी एक मानला जातो. एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन (ईपीएफओ) च्या नियमांनुसार ईपीएफओ ग्राहक आणि त्यांच्या रिक्रूटरसाठी कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनाचा 12 टक्के वाटा देणे अनिवार्य आहे. आवश्यक असल्यास ईपीएफओ आपल्या ग्राहकांना पीएफ खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देतो. पीएफ काढण्याच्या नियमांनुसार ईपीएफ खातेदार नोकरी गेल्यास, गृहकर्जाचा हफ्ता देणे, घर खरेदी करणे किंवा घराचे नूतनीकरण करणे इत्यादी विशिष्ट परिस्थितींसाठी तुम्ही पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो. आपण पीएफमधून किती रक्कम काढू शकता हे आपल्या पीएफ खात्याच्या स्थितीवर अवलंबून असते. (You can use the retirement fund if needed, in this case you can withdraw money from the PF account)

अशा परिस्थितीत काढू शकता पीएफमधून पैसे

आपण नोकरीदरम्यान पाच वर्षे पूर्ण केली असतील तर आपण पीएफ खात्यातून काही अटींसह पैसे काढू शकता.

– स्वत: ची पत्नी, मुले किंवा अगदी पालकांच्या उपचारासाठी पीएफमधून पैसे काढता येतात. – घर किंवा जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही पीएफकडून 90 टक्के रक्कम काढू शकता. – स्वत:च्या किंवा मुलांच्या लग्नासाठी 50% रक्कम काढता येते. – एका महिन्यापेक्षा जास्त काळ नोकरी गेल्यास 75% पीएफ काढता येतो. ईपीएफमधील उर्वरित 25 टक्के ठेवी नोकरी सोडल्यानंतर दोन महिन्यांनंतर काढता येते.

जर आपण नोकरीदरम्यान 5 वर्षापूर्वी पीएफ काढू इच्छित असाल तर यावर कर लागू होईल. म्हणजेच 5 वर्षांपूर्वी काढलेल्या रकमेवर कर भरावा लागेल.

पैसे कसे काढायचे?

पीएफमधून पैसे काढण्यासाठी ईपीएफओ कार्यालयाला भेट देण्याची गरज नाही. आपण यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

– प्रथम आपण ईपीएफओ https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ च्या वेबसाइटवर जा. – आपला यूएएन नंबर, संकेतशब्द आणि कॅप्चा प्रविष्ट करा आणि लॉग इन करा. – नंतर मॅनेजवर क्लिक करा आणि आपले केवायसी तपासा. – त्यानंतर Online Services वर CLAIM (FORM-31, 19 आणि 10C) वर क्लिक करा. – आपला क्लेम अर्ज सादर करण्यासाठी Proceed For Online Claim वर क्लिक करा. (You can use the retirement fund if needed, in this case you can withdraw money from the PF account)

इतर बातम्या

Business Ideas : घरबसल्या केवळ 5 हजार रुपयात करा हे दोन उद्योग, लाखोंची होईल कमाई

रेमडेसिवीर, ऑक्सिजन, बेड आणि प्लाझ्माची गरज आहे?; वाचा, या ठिकाणी मिळणार संपूर्ण माहिती

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.