आता एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच पैसै काढता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

आता एटीएम कार्ड नसले तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. (withdraw money without atm card)

आता एटीएम कार्डची गरज नाही, मोबाईलद्वारेच पैसै काढता येणार, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस
ATM
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 6:43 PM

मुंबई : देशात बँकिंग क्षेत्रात रोज अनेक बदल होत आहेत. तंत्रज्ञानाच्या जोरावर बँकिंग व्यवहार रोज साधा आणि सोपा होत चालला आहे. यापूर्वी बँक अकाऊंटमधून पैसे काढायचे असतील तर एटीएम किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन पैसे काढावे लागायचे. एटीएममधून पैसे काढायचे असतील तर एटीएम मशीनवर जाऊन ते आधी स्वाईप करावे लागायचे. मात्र, आता एटीएम कार्ड नसले तरी एटीएम मशीनमधून पैसे काढता येणार आहेत. (you can withdraw money from ATM card without any card know all process)

सुरुवातीला ही अशक्य असणारी गोष्ट आहे असे वाटेल. मात्र, भारतात सध्या एटीएम कार्डविना एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची सुविधा येणार आहे. यानंतर आता जवळच्या फोनमध्ये असलेल्या यूपीआय अ‌ॅपच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील.

पैसे कसे काढता येणार?

मिळालेल्या माहितीनुसार एटीएम मशीनमधून पैसे काढण्यासाठी यूपीआय आयडी असणे गरजेचे आहे. यूपीआय पेमेंट अ‌ॅपच्या माध्यमातून कोणत्याही एटीएम मशीमधून पैसे काढता येतील. उदाहरण सांगयचं झालं तर BHIM, PayTM किंवा गूगल पे या यूपीआय अ‌ॅपचा वापर एटीएममधून पैसे काढण्यासाठी होणार आहे. त्यासाठी एटीएम मशीनमध्ये अपग्रेडेशन केले जात आहे. एटीएम तयार करणारी कंपनी एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे त्यांनी ICCW म्हणजेच इंट्रोपरेबल कार्डलेस कॅश विदड्रॉवल सोल्यूशन लॉन्च केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून यूपीआईच्या माध्यमातून एटीएममधून पैसे काढता येतील. यूनियन बँकेने एनसीआरमध्ये अशा प्रकारची सुविधा असणारे काही खास एटीएम इन्स्टॉल करणे सुरु केले आहे. बँकेने आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त एटीएम अपग्रेड केले आहेत.

असे काढा पैसे 

एटीएममधून कोणत्याही कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी यूपीआय आयडी आणि कोणतेही यूपीआय अ‌ॅप असणे गरजेचे आहे. अपग्रेड केलेल्या एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढायचे असतील तर त्यासाठी आधी एटीएम मशीनकडे जावे लागेल. त्यानंतर यूपीआय अ‌ॅप्लिकेशनच्या माध्यमातून एटीएमवर असलेला क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर फोनद्वारे कमांड दिल्यानंतर एटीएम मशीममधून पैसे निघतील आणि तुमच्या बँक अकाऊंटमधून पैसे कापले जातील.

इतर बातम्या :

Gold Silver Price Today : आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने चांदीच्या किंमती वाढल्या, वाचा आजचे ताजे दर

GST Collection मध्ये बंपर उसळी, मार्चमध्ये जीएसटीचा इतिहासातील सर्वाधिक कर वसूल

फक्त 9 रुपयांमध्ये बुक करा घरगुती गॅस, Paytm वर अशी करा बुकिंग

(you can withdraw money from ATM card without any card know all process)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.